Author: editor desk

मेष राशी  श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे मन आनंदी राहील. तुमच्‍या नवीन उपक्रमांना कुटुंबातील सदस्‍यांचा पाठिंबा असेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाहन खरेदीसाठी कर्ज घेण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्‍या. तुमच्या कामांमध्‍ये गोपनीयता राखणे महत्वाचे आहे. पती-पत्नीमधील सुसंवाद कायम राहील. वृषभ राशी  श्रीगणेश सांगतात की, आर्थिकदृष्ट्या हा काळ सर्वोत्तम आहे. एखाद्या आध्यात्मिक कार्यात असलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्यावर जबाबदाऱ्या अधिक असतील. वेळ अनुकूल नाही आज कुठेही पैसे गुंतवू नका. कोणाशीही वाद घालू नका. कार्यक्षेत्रात सहकारी आणि कर्मचाऱ्यांचे तुम्‍हाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी जोरदार लावून धरल्यानंतर आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यास कडाडून विरोध केला आहे. मनसे हिंदीची सक्ती कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही. या प्रकरणी आम्ही सरकारचे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा देताना म्हटले आहे. खाली वाचा राज ठाकरेंची भूमिका जशास तशी राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात तापमान वाढले असतांना अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना आता पुण्यातील खेड शिवापूरजवळ अचानक बसला आज भरदुपारी आग लागण्याची घटना घडली. या आगीत बस पूर्णत: जळून खाक झाली असून फक्त सांगाडा उरला आहे. प्रवाशांनी आग लागल्याचे समजताच जीव वाचवण्यासाठी बसबाहेर उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने ही बस जात होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बस नवीन कात्रज बोगदा शिंदेवाडी येथे आली असता, बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. या बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. वाहन चालकाने प्रसंग अवधान…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांच्या केस गळतीचा प्रकार समोर आला होता. आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. केस गळतीनंतर आता नागरिकांच्या नखांची गळती होत आहे. मागील आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. जे केस गळतीचे रुग्ण होते, त्यांच्यातच नखे गळतीचे समस्या जाणवत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यापासून अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केस गळती झालेल्या रुग्णांना नखे गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. राज्यातील शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून ठाकरेंकडून करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी ठाकरे गटाकडून निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुरवातीला एआयचा वापर करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात संदेश दाखविण्यात आला. हाच धागा पकडत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाही म्हणून आता आपले विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकविण्याचा पोरकटपणा फक्त ‘उबाठा’ गटच करू शकतो. ज्या…

Read More

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातीलसांगोला येथे आई-वडिलांना दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करत असल्याचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केला. यामध्ये कार्तिक नामदेव यादव (वय 28, रा. चिंचोली, ता. सांगोला) हा ठार झाला आहे. तर संशयित आरोपी तुषार यादव (वय 25) यास सांगोला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (दि. 16) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास कार्तिक नामदेव यादव हा दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करीत असल्याचा राग मनात धरून लहान भाऊ तुषार नामदेव यादव याने शिवरत्न पेट्रोल पंपाच्या समोरून घराकडे जाणार्‍या रोडवर मनोहर नामदेव घाडगे यांच्या शेतातील रस्त्याच्या बाजूला चाकूने भोसकून कार्तीक नामदेव यादव याचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातून निघालेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन राजेंद्र बन्सी भालेराव (वय ४५, रा. गेंदालाल मिल) या सफाई कर्मचाऱ्याला लोखंडी फायटरने मारहाण केली. ही घटना दि. १४ रोजी रात्री दहा वाजेता फुले मार्केट समोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राजेंद्र भालेराव हे सफाई कर्मचारी वासतव्यास आहे. दि. १४ रोजी शहरातून निघालेल्या मिरवणुकीत नाचत होते. यावेळी मिरवणुक फुले मार्केट समोरुन जात असतांना नाचण्याच्या कारणावरुन त्यांचे धम्मा किशोर जाधव रा. गेंदालाल मिल यांचयसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने धम्मा जाधव याने लोखंडी फायटर सारख्या वस्तूने राजेंद्र भालेराव यांना मारहाण…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील मोठा वाघोदा रोडलगत असलेल्या शेतातील विहिरीतून देवेंद्र भागवत सोनवणे (वय २७, रा. निंभोरा, ता. रावेर) या तरुणाचा मृतदेह काढत होते. यावेळी विहिरीतून आणखी एक मानवी सांगाडा मिळून आल्याचा प्रकार दि. १४ रोजी उघडकीस आला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा गावातील मोठा वाघोदा रोड लगत असलेल्या उज्वल नरेंद्र पाटील यांच्या मालकीच्या विहरीत दि. १४ रोजी गावातील देवेंद्र सोनवणे या तरुणाने आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच सपोनि हरिदास बोचरे, सफौ अभय ढाकणे, अविनाश पाटील, किरण जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने विहरीत काम करणाऱ्यांकडून मृतदेही काढण्यासाठी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील नेताजी चौक परिसरातील गवळी वाडयामधील बाळाप्पा सिदाप्पा गवळी यांच्या घरात तब्बल ४३ साप निघाल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले असून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी चौकातील गवळी वाडयात माजी नगरसेवक सुरेश स्वार यांच्या घरासमोर बाळाप्पा सिदाप्पा गवळी हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्या घरात गेल्या १५ दिवसापूर्वी दोन सर्पाचे जोडपे नळाबाहेर तोंड काढत आल्याचे बाळप्पांच्या कुटुंबीयांनी पाहिले होते. तेव्हापासून ते त्या नळावर लक्ष ठेवून होते. दरम्यान, १५ एप्रिलला दोन सर्प नळातून बाहेर निघाले. त्यापाठोपाठ एक- एक करून सर्प बाहेर निघत असल्याचे पाहून बाळप्पा गवळी यांचे कुटुंबीय भयभयीत झाले. त्यानी लागलीच वाघळी येथील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आजारातून बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत वृद्धेच्या गळ्यातील पोत घेत तिला दगड बांधलेली पुडी देऊन एक तोळ्याची सोनपोत दोघांनी लांबविली. हा प्रकार १५ एप्रिल रोजी भजे गल्ली परिसरात भरदिवसा घडला. जिल्हापेठ पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील जामनेगाव येथील कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०) या १५ एप्रिल रोजी जळगावात त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी आल्या. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भजे गल्लीतून जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आल्या व वृद्धेला मंदिराचा पत्ता विचारला. याविषयी माहिती नसल्याचे वृद्धेने सांगितले असता ५५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तीने ‘तू आजारी होतीस, तुझ्याकडून…

Read More