Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी सुरु असणा आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप आ.रोहित पवार यांच्यावर केला आहे. आ.गोपीचंद पडळकर म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार तथा धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी पुरावा म्हणून एका व्यक्तीलाही हजर केले. त्याच्या छातीवर शरद पवारांचा फोटो गोंदलेला होता. पडळकर यांच्या या आरोपामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. गोपीचंद पडळकर बुधवारी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी 2021 मध्ये माझ्यावर हल्ला घडवून आणला. वर्षभरापूर्वी एक व्यक्ती…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता अजित पवारांनी विरोधकांसह अनेकांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले कि, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पाया पडायच्या नादात पडू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची लायकीच काढली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार बोलत होते. काम करताना चुकीचे वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, असा सल्लाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला. नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश झाले. त्यानंतर आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मद्यपीपतीने कौटुंबिक वादातून सना अजीज शेख (वय २५, रा. बीड, जि. परळी, वैजनाथ) या विवाहितेची हत्या करीत पळ काढला होता. ही घटना वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर रविवारी मध्यरात्री घडली होती. पसार झालेल्या संशयित अजीज सलीम शेख (वय ३५) याच्या पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सविस्तर वृत्त असे कि, किशोर डिगंबर पाटील यांचे वेल्हाळे शिवारातील शेत गट क्रमांक ६५१ मध्ये शेत असून या शेतात अली हुसेन इसाक कुरेशी हे वीटभट्टी चालवतात. या वीटभट्टीवर कामासाठी परळी जिल्ह्यातील काही कुटूंब आले आहेत व तेथेच त्यांचा कुटूंबातील सदस्यांसह रहिवास आहे. अझहर नियोजोद्दीन शेख (वय २४, जुने स्टेशन परळी वैजनाथ,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलाचे लग्न आटोपून पुण्याहून ट्रॅव्हल्सने घरी परतणाऱ्या आशा विकास कुलकर्णी (वय ५०, रा. त्र्यंबकनगर) यांच्या बॅगेतून प्रवासात ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाले. ही घटना दि. १६ ते दि. २३ फेब्रुवारीदरम्यान घडली. महिनाभरानंतर हा प्रकार लक्षात आल्याने या प्रकरणी दि. २४ मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील त्र्यंबकनगरात आशा कुलकर्णी या वास्तव्यासय आहेत. त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीला असून त्याचे पुणे येथे लग्न कुलकर्णी दाम्पत्य पुणे येथे गेले होते. दि. ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाल्यानंतर महिलेने २ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र, २ लाखाच्या पाटल्या, ३२…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रहिवासी व रेल्वेत नोकरीला असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिची सोशल मिडीयावर बदनामी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर एका विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहिता ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका भागात वास्तव्यास असून रेल्वेत नोकरीला आहे. संशयीत अब्दुल रहिम शेख (वय २७, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) याने दि. १ मार्च रोजी दुपारी साडेतीन ते दि. १५ मार्च व दि. १७ मार्च रोजी सकाळी साडेसहा दरम्यान विवाहितेचा पाठलाग केला व माझ्याशी संबंध ठेव म्हणत गळ घातली, तसे न केल्यास फोटो व्हायरलची धमकी देत पैशांची मागणी केली. पैसे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मालवाहू वाहनाने अनिता राजू गवळी (वय ४५, रा. कांचनगर) यांना धडक देण्यासह पायावरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना दि. १९ मार्च रोजी सुभाष चौक परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर परिसरात अनिता गवळी या वास्तव्यास आहे. त्या दि. १९ रोजी घरी परतत असताना त्यांना (एमपी ४६, झेडई ९९६४) क्रमाकाच्या मालवाहू वाहनाने धडक दिली. तसेच या वाहनाचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने जबर दुखापत झाली. या प्रकरणी महिलेने दि. २४ मार्च रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ…

Read More

मेष राशी राजकीय क्षेत्रातील लोकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल. तुमचे काम करत राहा. इतरांची दिशाभूल करू नका. व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत. नवीन लाभाची शक्यता आहे. वृषभ राशी आज मित्राच्या मदतीने प्रेमसंबंधांमध्ये विशेष यश मिळेल. तुमच्या जोडीदाराला भेटण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधातील समस्या कमी होतील. आनंद आणि सौहार्द वाढेल. वैवाहिक जीवनात आर्थिक महत्त्वाकांक्षेमुळे समस्या वाढू शकतात. मिथुन राशी आज काही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर झाल्यास तुमचे मनोबल वाढेल. धाडस आणि शौर्याच्या जोरावर सुरक्षा जवान महत्त्वाचे यश मिळवतील. सामाजिक जनसंपर्क वाढेल. सत्तेतील लोकांशी जवळीक वाढेल. राजकीय क्षेत्रातील लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. कर्क…

Read More

त्यामुळे आमच्यातली युती तुटली ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान ! मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा शिवसेना – भाजप युती कशी तुटली? यावर टीका टिप्पणी सुरु झाली आहे. यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना – भाजप युती कशी तुटली? याविषयी मोठे विधान केले आहे. तत्कालीन शिवसेनेच्या युवराजांनी आधीच 151 जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचा पक्ष 151 जागांवर अडून बसला होता. आम्ही त्यांच्याकडे 147 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र कौरवांप्रमाणे ते पाच गावे देखील देण्यास तयार नव्हते. त्यामुळे आमच्यातली युती तुटली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपचे ज्येष्ठ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई येथील धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाला असून काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नौ पार्किंगमध्येच पार्क करण्यात आला होता. आणि रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे ट्र्कमधील इतर सिलेंडर्सचाही एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. एकूण 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा भडका उडाला आणि आजूबाजूच्या शंभर मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्या तसेच ट्रकही आगीत भस्मसात झाले. 24 तासांपूर्वी भडकलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात उडलेले सिलेंडरचा शोध घेऊन सिलेंडर वर पाणी मारत कुलिंग करायचं काम सुरु आहे. मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील तरुण पोलीस भरती होण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या तरुण-तरुणीसाठीं महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार, एकूण १०,००० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. सध्या उन्हाळ्याचे तीव्र तापमान आणि जूनपासून सुरू होणारा पावसाळा यामुळे भरती प्रक्रिया गणेशोत्सवानंतर १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून सुमारे ११ ते १३ लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. मागील एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या पोलिस भरतीत १७ हजार ४७१ जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज आले होते. त्यामुळे यावेळीही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतील, असा…

Read More