मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर ठाकरे गट हल्लाबोल करण्यासाठी एक हि संधी सोडत नसताना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. कुणाल कामराने सरकारवर योग्य गाणं केलं आहे. देशातील मोदींची सत्ता ही “सौगत ए मोदी नाही, सौगत ए सत्ता” आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारची स्थिती ही ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, अशी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केली आहे. ते आज (दि.7) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, शिवरायांचा अपमान करणारा सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळा संचालक आपटेवर अद्याप कारवाई नाही? मात्र कॉमेडियन…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. दरम्यान प्रशांत कोरटकरने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपण मंचरियाल येथून चेन्नईला जाणार होतो असेही पोलिसांना सांगितले आहे. कोरटकरला न्यायालयाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बुधवारी त्याचे फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात आले. तत्पूर्वी रात्रभर केलेल्या चौकशीत कोरटकरने कोल्हापूर पोलिसांना ही माहिती दिल्याचे वृत्त आहे. तब्बल महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकर याची चौकशी केली जात…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगावजवळ दुचाकी आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ६२ वर्षीय अशोक यशवंत सपकाळे या वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. जखमी अशोक सपकाळे यांना तत्काळ किनगाव रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनगावजवळ जळगाव येथून एसटी बस (एमएच १४ बीटी २१४४) घेऊन चालक यावलकडे येत असताना किनगाव गावाच्या बाहेर कृषी विद्यालयाच्या समोर एसटी बस आणि मोटारसायकलची (एमएच १९ एटी ८५८८) धडक झाली. या अपघातात…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील साकळी येथील प्रकाश गणेशमल जैन (वय ६५) हे कुटुंबासह केरळ राज्यात फिरायला जात असताना रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २३ मार्च रोजी मध्यरात्री घडली. सविस्तर वृत्त असे कि, जैन व मित्राचे कुटुंब केरळ राज्यात फिरायला गेले होते. २१ मार्चला रात्री भुसावळ येथून मंगला एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान २३ मार्चला मध्यरात्री एक ते दीड वाजता प्रकाश जैन यांनी नातू पार्श याच्याशी गप्पागोष्टी करून मोबाईल त्याच्या जवळ दिला व लघुशंकेच्या निमित्ताने ते रेल्वे बोगीतील शौचालयाकडे गेले असता पुढील येणारे स्टेशन किती दूर आहे ? हे पाहण्यासाठी दाराजवळ गेले असता अचानकपणे तोल जाऊन ते रेल्वेतून खाली…
भुसावळ : प्रतिनिधी गोरखपूर-बंगळुरू एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा तिकीट निरीक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार २२ मार्च रोजी घडला. पोलिसांनी संशयित रेल्वे तिकीट निरीक्षक प्रदीपकुमार तिवारी यास ताब्यात घेतल्यानंतर नोटीस बजावत त्याची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील १९ वर्षीय तरुणी २२ रोजी गोरखपूर-बंगळुरू विशेष ट्रेनने पुण्याकडे निघाली होती. तिचे सेकंड एसीचे तिकीट आरएसी असल्याने तिने तिकीट निरीक्षकाची भेट घेत त्यांना बर्थ देण्याची मागणी केली. गाडीतील तिकीट निरीक्षक तिवारी याने फर्स्ट एसीमध्ये सीट दिले. तरुणी सीटकडे गेल्यानंतर तिकीट निरीक्षकाने तिचा विनयभंग केला. तसेच तरुणी वॉश रूममध्ये गेल्यानंतरही संशयित बाहेर थांबून राहिला. भुसावळ स्थानक येईपर्यंत हा प्रकार घडल्याने पीडितेने वडिलांना प्रकार…
जामनेर : प्रतिनिधी मुलगा डॉक्टर व्हावा, यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर पालकाचीच साडेसात लाखांत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फत्तेपूर (ता. जामनेर) पोलिसांत महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे जामनेर तालुक्यात डॉक्टर आहेत. मुलगा डॉक्टर व्हावा या अपेक्षेने त्यांनी त्यांच्या अंबरनाथ येथील मित्राशी संपर्क साधला. या मित्राने त्यांना महेश शांताराम वाघमारे (नवी मुंबई) व राहुल शर्मा (रा. गाझियाबाद) यांचे संपर्क क्रमांक दिले. त्यांच्याशी संपर्क केल्यावर वाघमारे याने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी नवी मुंबईतील कार्यालयात बोलावून शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट यासाठी २ लाख रोख घेतले. कोणतीही पावती न देता इन्व्हीटेशन पत्र दिले. या पत्रासाठी ४ डिसेंबरला २० हजार, व्हिसा मिळविण्यासाठी…
मेष राशी आज दिवसाची सुरुवात बरी नसेल. काही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. घरगुती जीवन सुखकर राहील. चैनीच्या कामांवर पैसा खर्च होईल. कार्यक्षेत्रात व्यस्तता राहील. तुमच्या नोकरीत तुम्हाला खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते. अनावश्यक वादविवाद टाळा. वृषभ राशी आज चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसा खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांशी भांडण झाल्यामुळे अधिक उत्पन्न मिळणार नाही. कर्ज घेऊन जमीन, इमारत, वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. बिझनेस ट्रिपमध्ये अपेक्षित नफा न मिळाल्याने तुम्ही दु:खी व्हाल. मिथुन राशी आज बँकेत जमा होणाऱ्या भांडवलात वाढ होईल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होईल. व्यवसायात एखाद्या प्रिय व्यक्तीचे सहकार्य, पाठिंबा मिळेल. नोकरीच्या शोधात तुम्हाला इकडून तिकडे भटकावे लागेल.…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी उज्ज्वल निकम कोर्टात युक्तिवाद केला. संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाइड केले, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर केला आहे. वाल्मीक कराडे या घटनेला गाईड केल्याचे सीडीआरमधून समोर आल्याचेही उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान आरोपींना व्हिसीद्वारे हजर करण्यात आले. दरम्यान, सुनावणी पार पडल्यानंतर अॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत सुनावणीबाबत माहिती दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी सुरु असणा आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप आ.रोहित पवार यांच्यावर केला आहे. आ.गोपीचंद पडळकर म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार तथा धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी पुरावा म्हणून एका व्यक्तीलाही हजर केले. त्याच्या छातीवर शरद पवारांचा फोटो गोंदलेला होता. पडळकर यांच्या या आरोपामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. गोपीचंद पडळकर बुधवारी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी 2021 मध्ये माझ्यावर हल्ला घडवून आणला. वर्षभरापूर्वी एक व्यक्ती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता अजित पवारांनी विरोधकांसह अनेकांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले कि, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पाया पडायच्या नादात पडू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची लायकीच काढली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार बोलत होते. काम करताना चुकीचे वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, असा सल्लाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला. नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश झाले. त्यानंतर आज…

