Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खुन्नसने देवून पाहिल्याने महिलेवर धारदार शस्त्राने वार !
    क्राईम

    खुन्नसने देवून पाहिल्याने महिलेवर धारदार शस्त्राने वार !

    editor deskBy editor deskMay 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ‘खुन्नस देऊन बघितल्याच्या’ कारणावरून शिवाजीनगरात एका ५८ वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना २५ मे रोजी मध्यरात्री २:०० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, शहर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी सायंकाळी ७:०० वाजता मंगला संजय राठोड यांचा मुलगा विजय घराबाहेर बसलेला असताना, प्रेम सांगोरे दुचाकीवरून जाताना त्याने खुन्नस देऊन बघितल्याचा आरोप विजयने केला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन प्रेम सांगोरेने आपल्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. प्रेम विलास सांगोरे, विलास रमेश सांगोरे, अमोल रमेश सांगोरे आणि ओम कैलास सांगोरे (सर्व रा. शिवाजीनगर) यांनी विजयला शिवीगाळ करत मारहाण केली. मात्र, याच घटनेनंतर रविवारी मध्यरात्री २:०० वाजता ओम कैलास सांगोरे दारूच्या राठोड यांच्या घराजवळ आला. मंगला राठोड यांनी दार उघडताच हत्याराने त्यांच्या बोटावर वार केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुषण गॅस एजन्सी कडून ग्रामीण भागातील भारत गॅस ग्राहकांना सिलिंडर साठी असामाधानकारक उत्तर !

    April 17, 2026

    महावितरणच्या तारांमुळे शेतात भीषण आग; मका पीक जळून खाक, शेतकऱ्याची भरपाईची आर्त मागणी

    April 17, 2026

    वर्दळीच्या भागात चोरट्यांचा कहर; जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.