Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
    क्राईम

    माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

    editor deskBy editor deskJune 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एरंडोल येथे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठा खुलासा करत, अपघाताचा बनाव करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि,  माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन यांनी १४ जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचे पती दशरथ महाजन हे एरंडोल नगरपालिकेत माजी उपनगराध्यक्ष असल्याने त्यांचे शहरातील अनेक राजकीय लोकांशी मतभेद होते. त्यामुळे, त्यांच्यावर झालेला हल्ला हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वर्तवली होती.

    या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग केला. त्यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार केली. या पथकांनी घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करून, तेथून ये-जा करणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

    विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल कोसळले होते, त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, तपास पथकातील प्रवीण मांडोळे आणि राहुल कोळी यांनी एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजचे सलग ८ तास परीक्षण केले. या अथक प्रयत्नांमधून त्यांनी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले आणि हा अपघात नसून घातपात असल्याचे उघडकीस आणले.

    या प्रकरणी उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), शुभम कैलास महाजन (वय १९), आणि पवन कैलास महाजन (वय २०) (सर्व रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी उमेश सुतार याने पूर्व वैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी आरोपी उमेश सुतार याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.