Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ही कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला. १९७१ च्या युद्धानंतर भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या ९ ठिकाणी हवाई हल्ले केले त्यापैकी काही ठिकाणे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर आहेत. विशेषतः जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे बहावलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुरीडके ३० किमी आणि गुलपूर ३५ किमी अंतरावर आहे. या कारवाईत एकूण 9…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज सकारात्‍मक विचारसणी असणार्‍या लोकांसोबत वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्क क्षेत्रातही वाढ होईल. कुटुंबासोबत खरेदी करत वेळ घालवू शकता. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आज घेतलेले घाईघाईचे निर्णय बदलावे लागतील. वैयक्तिक कामांसाठी वेळ काढता येणार नाही, त्यामुळे मन थोडं अस्वस्थ वाटेल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहील. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही सामाजिक कामात व्यस्त राहाल. तुमच्या भविष्याच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे योग्य वेळ आहे. विशेषतः स्त्रिया आपल्या कार्याविषयी जागरूक असतील. कधीकधी छोट्या गोष्टींवर राग आल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. आज आपल्या वर्तनाची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा कारण त्यामुळे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज आहे, अशा सर्व संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ((दि.६) महाराष्ट्र सरकारला दिला आहे. यावर आता राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मणिपूरच्या इम्फाळ पूर्व, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमधून विविध बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. या सर्व अटक सोमवारी करण्यात आल्या. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मंत्रीपुखरी फ्रेंच कॉलनीतून बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे. खोऱ्यातील विविध ठिकाणी ग्रेनेड टाकून सर्वसामान्यांना धमकावण्याच्या घटनांमध्ये या संघटनांचा सहभाग होता. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन मॅगझिन आणि दारूगोळा जप्त केला. एका वेगळ्या कारवाईत, सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील केराव वांगखेम आणि आसपासच्या भागातून त्याच संघटनेच्या इतर तीन सक्रिय सदस्यांना अटक केली. त्यांच्याकडून पाच शस्त्रे, दारूगोळा आणि एक वायरलेस…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांजवळ एकाच कुटुंबातील तिघांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतांमध्ये एका पुरुषासह एक महिला आणि सुमारे तीन वर्षांचा चिमुकला यांचा समावेश आहे. ही भीषण घटना सोमवारी (दि.5) उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह पाहणी करून तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही कुटुंबाने जीवनयात्रा संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अद्याप या तिघांची ओळख पटलेली नाही. ते कोणत्या गावातील आहेत, हेही अस्पष्ट आहे. त्यामुळे पाचोरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित तिघांबाबत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुका थांबवण्याचे आम्हाला काही कारण नाही वाटत, असं मतही सुप्रीम कोर्टाने नोंदवले. गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहे. कोरोना काळ आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणबाबतची याचिका यामुळे निवडणुका खोळंबल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितींमध्ये प्रशासनराज सुरू आहे. मंगळवारी सुप्रिम कोर्टात न्या.सूर्यकांत आणि न्या. एन. के सिंह यांच्या पीठासमोर महाराष्ट्रातील निवडणुकासंदर्भात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला अधिसूचना काढून…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ मे ते ४ मे दरम्यान मुंबईतील वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ असे म्हणत आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. अजित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रावेर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे 5.73 लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रावेर-चोरवड मार्गावर मौजे लोणी गावाजवळ करण्यात आली. दिनांक 5 मे 2025 रोजी गस्तीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रावेर-चोरवड रस्त्यावर संशयित वाहने अडवण्यात आली. यात MH04CU5418 क्रमांकाचा आयशर ट्रक व MH19Z7862 क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आले. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता पंचरास जातीचे एकूण 31 घनमीटर लाकूड आढळून आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 5,73,400 रुपये इतकी होते. सदर गुन्हा हा मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घडलेला असल्याने रावेर वनविभागाने तत्काळ मध्य प्रदेश वनविभागाशी…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर ते सावदा रस्त्यावरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ बस व दुचाकीच्या २७रोजी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तांदलवाडी येथील दोघे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले होते. यातील दुचाकीमागे बसलेले विजय तुकाराम पाटील (वय ५३) यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. विवरे गावाकडून रावेरकडे येणारी बस (एमएच- २०, बिएल ३००६) ही २७ रोजी रावेर ते सावदा रस्त्यावरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ आली. या वेळी दुचाकी स्वार पंपावर पेट्रोल भरून रस्त्यावर येत असताना बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला होता. यात तांदलवाडी येथील सार्थक विजय पाटील (वय २०) व विजय तुकाराम पाटील (वय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच आत्महत्या केली. ममुराबाद व पाचोरा येथे झालेल्या या घटनांमुळे दोघांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. भावेश मधुकर महाजन (वय १९, रा. एरंडोल) आणि ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील (१८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना अनुक्रमे ४२ व ४९ टक्के गुण मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथे राजीव गांधी काॉलनीत बहिणीकडे आलेल्या भावेश याने बहिणीच्या घरीच गळफास घेतला. तो एरंडोल येथे डीडीएसपी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. बहीण आणि मेहुणे विशाल महाजन हे पुणे येथे लग्नानिमित्त गेले होते. भावेशची दुसरी बहीण…

Read More