मुंबई : वृत्तसंस्था स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आणलेल्या ‘संचार साथी’ अॅपमागे मुळात हेरगिरीसाठी वापरले जाणारे पेगासस तंत्रज्ञानच वापरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न आहे,” अशी टीका त्यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना केली. ठाकरे म्हणाले, “लोकांनी ज्यांना मतदान केले, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर पाळत ठेवावी. दिल्लीतील बॉम्बस्फोट, पहलगाममधील घुसखोरी – या प्रश्नांवर सरकारचे मौन चिंताजनक आहे.” ठाकरे यांच्या शिवसेनेत आज पुन्हा अनेक कार्यकर्त्यांनी पुनर्प्रवेश केला. “गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. त्यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, बाचाबाची सुरू आहे. त्यामुळे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मतदानांची प्रक्रिया झाली असून निकाला आता २१ रोजी लागणार असून आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकत्र आणि एकाच दिवशी जाहीर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणं तयार होताना दिसत आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर आज निकाल जाहीर होणार होता. मात्र, काही ठिकाणी मतदान पुढे ढकलल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे न्यायालयाने हस्तक्षेप करत 21 डिसेंबरला एकत्रित निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. परिणामी, 20 डिसेंबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू राहणार असून या काळात कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मनाई आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगावातील होलेवाड्यात भाडेतत्वावर राहणाऱ्या गजानन येडूबा गावंडे (वय – ४० रा. शेंगोळा ता. जामनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. – १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावातील रहिवाशी असलेला गजानन गावंडे हा जूने जळगावातील होलेवाडा परिसरात वास्तव्याला होता. सराफ दुकानावर मजूरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी ही माहेरी गेलेली होती. त्यामुळे तो घरात एकटाच राहत होता.…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सुजदे येथे घराच्या बाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्या ठिकाणी खेळत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता घडली. याची जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम नरेंद्र सोनवणे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तो दुपारी घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये खेळत होता. त्यावेळी मुख्य विद्युत प्रवाह असलेली वायर तुटल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला शॉक लागून गंभीर जखमी झाला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषीत केले. प्रेमचे वडील नरेंद्र सोनवणे हे शेती करता, तर आई दीपाली सोनवणे या…
जळगाव : प्रतिनिधी यावल शहरात तरुणाला बेदम मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, जळगावच्या शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील समता नगर येथील तरुण तुषार चंद्रकांत तायडे (वय १८) परिवारासह समता नगर येथे राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याचे काही लोकांशी वाद झाले होते. असी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली. दरम्यान तुषार हा मंगळवारी यावल तालुक्यातील वड्डी परसाडे या गावात आजीचे निधन झाले होते. या अंत्यविधीसाठी गेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो जळगाव परत…
आजचे राशिभविष्य दि.३ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला काही कामासाठी प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे भविष्यात सकारात्मक परिणाम मिळतील. निष्काळजीपणामुळे सरकारी काम अपूर्ण सोडू नका, कारण तुम्हाला दंड होऊ शकतो. वृषभ राशी तुम्ही खूप दिवसांपासून अथक परिश्रम करत असलेले काम आज पूर्ण होईल. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. आज तुमचे विचार कोणाशी तरी शेअर करा आणि ते नक्कीच समजून घेतील. तुम्हाला सामाजिक किंवा धार्मिक कार्यात रस असेल. मिथुन राशी आज, तुम्ही तुमच्या मित्राला आर्थिक मदत कराल. आज कठोर परिश्रम आणि एकाग्रतेने काम करण्याची वेळ आहे; यश क्षितिजावर आहे. तुमचे आरोग्य सुधारत असताना, तुम्हाला सर्जनशील काम करण्याची इच्छा वाटेल. कर्क राशी…
मुंबई : वृत्तसंस्था माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कुठलेही वाद नाहीत. आपल्या घरातही दोन भावांची मते ही काही प्रमाणात वेगवेगळी असतात. प्रखरतेने दोन्ही भाऊ आपापली मते मांडत असतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आमचे एकमत झाले असते, तर आम्ही एकाच पक्षात असतो, तर मग आम्ही वेगवेगळ्या पक्षात का आहोत? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या निवडणूकांच्या प्रचारा दरम्यान दोन्ही नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे देखील मतभेदांच्या चर्चांना खतपाणी मिळाले. एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मुंबईत असताना, माध्यमांनी थेट शिंदेंसोबत…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील जामनेर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रभाग क्र. १० मधील एकलव्य शाळा मतदान केंद्रावर आज (सोमवार, दि. २) मोठा गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदानासाठी आल्याचा संशय असलेल्या एका तरुणाला थेट मतदान केंद्रावरच पकडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मतदान केंद्र परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणावर लक्ष ठेवले. त्याच्या वर्तनावर शंका आल्यानंतर त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी संबंधित तरुणाने कॅमेऱ्यासमोरच बोगस मतदानासाठी आल्याची कबुली दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी संशयित…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत सुरू असताना बुलढाण्यात बोगस मतदानाचे गंभीर आरोप काँग्रेसने केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलावर पोलिसांशी दमदाटी व शिवीगाळ करून बोगस मतदारांना पळवून लावल्याचा आरोप केला आहे. राज्यात आज विविध नगरपरिषद व नगरपंचायतींचे मतदान होत आहे. सकाळी काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या असल्या, तरी त्यानंतर प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. मात्र याचदरम्यान बुलढाण्यात सर्रास बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचा दावा काँग्रेसने केला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड ग्रामीण भागातून लोकांना आणून नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान करून घेत आहेत.”…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश सोमवार, 1 डिसेंबर रोजी रात्री 10.05 वाजेपासून मंगळवार, 3 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहेत. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (2) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. निवडणूक 2025 च्या मतदान व मतमोजणी दरम्यान कोणताही गोंधळ, अव्यवस्था किंवा गुन्हेगारी कृती होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. आदेशानुसार मतदान केंद्र परिसरात पाचपेक्षा अधिक लोकांचा अनधिकृत जमाव,…

