Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील भडगाव रोडवरील पोलीस वसाहतीमधील एका युवकाचा विजेचा जोरदार शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, येथील पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या व नांदेड येथे अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. कर्मचारी अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव आदित्य अशोक महाजन हा गेल्या पाच दिवसांपूर्वी नांदेड येवून गणपतीसाठी घरी आला होता. शहरातील भडगाव रोडवरील पोलिस लाईन या राहत्या घरी सायंकाळी ७ वाजता पिण्याचे पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पष्टाणे आणि कल्याणे होळ गावातील बंद घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यानुसार चोरट्यांनी तबब्ल ३ लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. सविस्तर वृत्त असे की, या प्रकरणी पहिली फिर्याद वर्षाबाई वनसिंग पाटील (वय ४६, व्यवसाय – शेती रा.कल्याण होल ता.धरणगाव) यांनी दिली आहे. त्यानुसार त्याच्या राहते घरास कुलुप लावुन त्या माहेरी गेलेले होते. दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजीचे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर ४६…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेदालाल मिल परिसरातील रिक्षा थांब्याजवळ एका प्रौढाच्या हातावर चाकूसारख्या पट्टीने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील गेदालाल मिल परीसरातील मुख्य रस्त्यावरील रिक्षा थांब्याजवळ अशोक रामचंद्र कोळी (वय ४५, धंदा नोकरी ह.मु.राधारमण अपार्टमेंट नवीन कानळदा रोड) यांना दि ७ रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या दरम्यान काहीही कारण नसताना दीपक भोसले याने त्यांच्या हातावर पट्टी मारत दुखापत केली आहे. याप्रकरणी अशोक कोळी यांनी शहर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोना.ओमप्रकाश सोनी हे करीत आहेत.

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनी परिसरातून एकाची दुचाकी चोरी झाल्याची घटना दि ३१ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी चोपडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील रहिवासी कैलास रामदास बारी (वय ५६) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. हे दि ३१ रोजी रात्री आपले काम आटोपून घरी येवून झोपून गेले. घराबाहेरील अंगणात लावलेली एम.एच.१९.बी.एच.३६२० दुचाकी रात्री कुणी तरी चोरून नेल्याची घटना १ रोजी उघडकीस आली. त्यांनी परिसरात व मित्र परिवारामध्ये शोध घेतला पण दुचाकी मिळून न आल्याने चोपडा शहर पोलिसात धाव घेवून चोरीचा गुन्हा नोंद केला आहे . पुढील तपास पोना. किरण गाडीलोहार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील मातृभूमी चौकातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेची सोन्याची पोत लांबल्याची घटना घडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की, उषा श्रीकृष्ण चाटे (वय २५, धंदा गृहिणी रा. पोलीस वसाहत भुसावळ) यांनी बाजार पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या दि. ६ सप्टेंबर रोजी ५ वाजेच्या सुमारास शहरातील मातृभूमी चौकात एका बेन्टेक्स ज्वेलरीच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. बेन्टेक्स ज्वेलरी खरेदी करत असतांना तेथे जमलेल्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने सौ. चाटे यांच्या गळ्यातील १७ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोना शशिकांत तायडे हे करीत…

Read More

निंभोरा : प्रतिनिधी तुमचे क्रेडीट कार्ड आजच अपडेट करा, अन्यथा तुमचे कार्ड बंद होऊन जाईल, अशी थाप मारून अज्ञात भामट्याने एकाची ६४ हजार ६९३ रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात प्रवीण बाबुराव पाटील (वय ४२, धंदा – शेती रा.निंभोरा,ता. रावेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रवीण पाटील यांचा मोबाईल त्यांच्या मुलाच्या हातात होता. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर ९८८३१४९६२३ या नंबरवर फोन आला. समोरून बोलणाऱ्या भामट्याने मुलाला सांगितले की, तुमचे क्रेडीट कार्ड आजच अपडेट करा, अन्यथा तुमचे कार्ड बंद होऊन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था येत्या सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या विक्रीमुळे येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 2 ते 3 रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे. सध्या जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $92 च्या खाली आहे. त्याच वेळी .’ क्रूडच्या किमतीत सुमारे 5 टक्के घसरण देखील वर्चस्व गाजवते. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील. त्यामुळे किरकोळ महागाईचा दरही खाली येईल. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणुका होणार असल्याने सगळेच राजकीय पक्ष जोर लावणार आहे. त्यामुळे या निवडणुका मोठ्या रंगतदार होणार असल्याचा अंदाज आहे. निवडणूक कार्यक्रम काय? 13 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज शिवसेना कुणाची यावर निकाल लागणार होता पण निकालाची तारीख आता २७ सप्टेबर झाली असून यावर राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागल्या असून आज सकाळी शंभुराज देसाई यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, ‘बाळासाहेब ठाकरे’ ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर विचार आहेत. आणि आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वासदार जरूर असतील. पण आम्ही वैचारिक वारसादार आहोत. चिन्हं रुजवायला वेळ जाईल. पण आमची शिवसेना शाखांपर्यंत जाईल”, असं शंभुराज देसाई म्हणालेत. “चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडे आहे. आमदार खासदार नगरसेवक सरपंचाचं बहुमत आमच्याकडे आहे. लोकांमधून आलेले लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्हं मिळेल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगावातून चोपडा येथे जात असताना मॅक्झीमो व आयसरच्या धडकेत १० प्रवासी जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. यात जखमी रुग्णांना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मिळालेली माहिती अशी की, चोपड्यावरून जळगावकडे एम.एच.६३सी.४७४७ ही आयशर येत असताना धानोरा गावाजवळ जळगावहून चोपड्याकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झीमो क्रमांक एम.एच‌.१९बी.यु.४९७७ यांच्यात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहे. तर यातील ६ प्रवासीना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत तर अन्य प्रवाशांना शहरातील खाजगी रुग्णालयात नेले असल्याची माहिती आहे. शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल असेलेल रुग्णामध्ये नितीन सोनवणे(वय…

Read More