जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नाचणखेडा येथे स्टेट बॅकेचे एटीएम मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दीपक दौलत तिवारी (वय ३८, रा.सोपान नगर, सत्यम पार्क, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी शिवाजी चौक, शिवाजी नगर, नाचणखेडा ता. जामनेर येथील स्टेट बॅकेचे एटीएम. नं. CFBA०००५५९०१३ याक्रमाकांचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी कॅबीनचा उघड्या दरवाज्यातून आत येत एटीएम मशीनचा कॅबीनचा दरवाजा तोडला. त्यानंतर मशीन कॅबीनमधुन बाहेर काढुन मशीनची तोडफोड करुन चोरुन नेण्याचा प्रयत्न करून नुकसान केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप.निरीक्षक संजय बनसोड हे करीत…
Author: editor desk
परभणी : वृत्तसंस्था शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही सचिन पाटील यांच्या खुनाची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार सचिन पाटील आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात बसलेले असताना त्यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एका पदाधिकाऱ्यानं सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूनं वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. सचिन पाटील यांना सहकऱ्यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाला. एका उमद्या नेतृत्व गमावल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून आंतरजिल्हा तसेच ग्रामीण भागात जळगाव बस डेपो येथून जात असलेल्या बसेससाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करीता नियमीत बसेस सुरू करणे तसेच याठीकाणी बसेस थांबण्यासाठी थांबा देण्याची मागणी आज राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने आगार प्रमुखांना निवेदन देवून मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करीता नियमीत बसेस सुरू करणे तसेच नियमित जाणारे बसेसला सकाळी ९ वाजता दुपारी २ वाजता आणी दूपारी ५ वाजेला विद्यार्थी हित लक्षात घेवून बस सुरू करावी, तसेच धुळे व नंदुरबार येथून विद्यापीठ करता येणारे विद्यार्थी यांना विद्यापीठ थांबा न देता आपल्या बसेस सरळ निघून जातात त्यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वसंतवाडी येथे आदर्श गणेश मित्र मंडळ यांनी सार्वजनिक गणपतीजींची स्थापना केली आहे व या गणेश उत्सवानिमित्त आदर्श मित्र मंडळाच्या नव युवकांनी स्तुत्य उपक्रम रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतला आहे व यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दि ५ रोजी आज सायंकाळी ५:००वाजता रक्तदान शिबिर वसंतवाडी येथे ठेवले आहे तरी जास्तीत जास्त रक्तदान करुन सहकार्य करण्याचे आवाहन आदर्श गणेश मित्र मंडळ यांनी केले आहे . यात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनसाठी रेड प्लस ब्लड बँक यांच्या तर्फे विशेष सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यात रक्तदान करणाऱ्यांसाठी ५०हजाराचा अपघात विमा, रक्तदान करणाऱ्यास स्वतः रक्ताची…
धरणगाव : प्रतिनिधी येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शिक्षण क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन व विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुड शेपर्ड स्कुलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर स्कुल हेड बॉय -…
धरणगाव : प्रतिनिधी येथील ना. गुलाबराव पाटील गणेश मित्रमंडळच्या वतीने गणेशोत्सव निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. ना. गुलाबराव पाटील गणेश मित्रमंडळच्या वतीने गणेशोत्सव निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सोलो – २००, कपल-३०० आणि ग्रुपसाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. तर प्रथम बक्षीस ११ हजार, द्वितीय ८ हजार, तृतीय बक्षीस ५ हजार तर उत्तेजनार्थ बक्षीस ३ हजार रुपये असणार आहे. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ होणार असून अधिक माहितीसाठी जॉनी महाजन (मो.८८८८९६०२७७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील स्टेट बँकेजवळ महामंडळाच्या बसने १२ वर्षाच्या विद्यार्थिनीला उडवल्याने ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, आज दि ५ रोजी सकाळी शहरात स्टेट बँक जवळ बारा वर्षाच्या मुलीस बसने धडक दिली, यात त्या मुलीची सायकल चक्काचूर झाली असून विद्यार्थिनीही जखमी झाली आहे. एम एच 14 बीटी ४१० या क्रमांकाची शेगाव ते नवापूर बस ही वेगाने जात असताना ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यार्थिनीला बसने धडक दिली. यात सदर विद्यार्थिनीची सायकल पूर्णपणे चक्काचूर झाले असून ऋतुजा ही जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजाला…
जळगाव : प्रतिनिधी समता नगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिर हे रेड प्लस ब्लड बँक आणि समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समता नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते . तरुण आणि जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 42 बॅग रक्तदान केले. त्यात तरुणांचा मोठा सहभाग होता. त्यात आशुतोष बहुउद्देश्य प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी, समता समाज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, जनकल्याण युवा फाउंडेशनच्या पदाधिकारी ई. उपस्थित होते. रेडप्लसचे पदाधिकारी अमोल शेलार, वीरेंद्र बिराडे, सुरज पाटील, ज्योत्स्ना मोरे, शिवदास राठोड, राहीब शेख आदी. उपस्थित होते.
पारोळा : प्रतिनिधी शेतकरी ला संघटीत होण्याशिवार पर्याय नाही कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे व शेतकरी हा अख्खा जगाचा पोशिंदा आहे असं मोठ्या कौतुकाने म्हटले जाते परंतु शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती पाहता असे दिसून येत नाही,शेतकरी ची चोहोबाजूंनी फसवणूक केली जात आहे म्हणून शेतकरींनी संघटतीत झाले पाहिजे नाहीतर परिस्थिती भयंकर असेल असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी पुढे बोलताना सांगितले की शाखेच्या माध्यमातून शेती, आरोग्य,पाणी व पुर्णपणे शेतकरी हितासाठी कार्य केले जाणार आहे गोरगरीब शेतकरी पर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ते तालुक्यातील सांगवी येथे महाराष्ट्र…
चोपडा : प्रतिनिधी सेवानिवृत्त आर्मी जवान पंकज दिलीप पाटील (रा. घुमावल) यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंकज पाटील हे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शारदानगर भागात राहत असलेले सेवानिवृत्त पंकज दिलीप पाटील हे आपल्या मुलाला घेऊन बाजारासाठी गेले होते. तहसील कचेरीच्या खाली चावळी जवळ फुलहार घेत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पंकज पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी रस्त्यावर थांबून अरेरावी व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत पुन्हा मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा लहान मुलगा तहसील कार्यालय…

