पुणे : वृत्तसंस्था लोक पैशासाठी काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही पुण्यातील पिंपरी भागात अवघ्या ७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला आहे. एका बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा होता त्याचा मृतदेह भोसरी औद्योगिक वासाहतीतील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर सापडला आहे. मुलाच्या वडिलांना आरोपींनी तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्याने आरोपींनी चिमूकल्याला ठार मारले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य ओगले (वय 7) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पिंपरीतील मसुलकर कॉलनी येथे राहत होता. आदित्यच्या अपहरणाबाबत वडील गजानन श्रीकांत ओगले (वय 49) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली होती. मात्र, शोध लागण्यापूर्वीच…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रींच्या मुंर्तीचे संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर जळगाव शहरातील 4284 घरगुती श्रींचे संकलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक येऊन स्वत:च्या घरची श्रींची मुर्ती विसर्जनासाठी अर्पण केली. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर संकलन केंद्र नागरीकांच्या सेवेत सुरू होते. ट्रक व ट्रॅक्टर यांच्या 9 फेऱ्या करून या मुर्तींचे विधीवत मेहरूण तलावावर विसर्जन करण्यात आले. यावेळी 5 ट्रॅक्टर निर्माल्य संकलीत झाले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष पियुष हसवाल, गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रितम शिंदे, हर्षल तेली, समिर कावडीया, भवानी अग्रवाल, सयाजी जाधव, संस्कृती नेवे,…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका महिलेस मुलगी झाल्यामुळे तसेच रसवंतीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावे, या कारणासाठी नेहमी पैशाची मागणी करीत पिडीतेला नेहमी मारहाण व शिवीगाळ तर मानसिक त्रास दिल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील अकुलखेडा येथील माहेरवाशीण असलेल्या सौ.माया सोमनाथ नन्नवरे (वय ३३,धंदा- घरकाम रा. पुणतांबा ता.राहाता जि अहमदनगर ह. मु. अकुलखेडा ता चोपडा) यांचा २०१६ मध्ये पुणतांबा येथील सोमनाथ शांताराम नन्नवरे यांच्याशी रीतीरीवाजाप्रमाने विवाह झालेला आहे. त्यानंतर पहिली मुलगी झाल्याचा राग मनात ठेवून सोमनाथ नन्नवरे पती, शांताराम पांडुरंग नन्नवरे सासरे, मथुराबाई शांताराम नन्नवरे…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला कुणी तरी पळवून नेले आहे. या तरुणीचे वर्णन रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, उंची ४ फुट ३ इंच, अंगात आकाशी रंगाचा टॉप तर पांढऱ्या रंगाची पेन्ट परिधान केले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या राहत्या घरातून दि ८ रोजी १० वाजता पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आबेहोळ येथील एका घरात चोरट्यांनी १ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील आबेहोळ येथील रहिवासी विठ्ठल हंसराज चव्हाण (वय ३५) धंदा मजुरी, रा.आंबेहोळ ता.चाळीसगाव यांच्या घराची भिंत दि ९ रोजी रात्रीच्या सुमारास फोडून चोरट्यांनी घरात घुसून कानातील सोन्याच्या २ रिंग २५ हजार रुपये किमतीच्या, हातातील चांदीचेकडे १५ हजार रुपये किमतीचे, ५०० रुपयाच्या १२० नोटा ६०००० रुपये असा एकूण १ लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी विठ्ठल हंसराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील एका अंगणवाडीतून चोरट्यांनी ३ हजार रुपयाचा मुलांना आणि गरोदर महिलांना देण्यात येणारा कच्चा आहाराची चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने गावातील अंगणवाडी क्रमाक १८ मधील दि ८ रोजी दुपारी १ ते ९ रोजीच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंगणवाडीच्या खोलीचा दरवाजाच्या कडीकोयडा तोडून लहान मुलं व गरोदर महिलांना वाटप विना शुल्क वाटप करण्यात येणारा कच्चा आहार कुणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. त्यामध्ये गहूचे १० पाकीट १ हजार रुपयाचा, हरभऱ्यांचे १० पाकीट ५०० रुपयांचा, साखरेचे ५ पाकीट २०० रुपयाचे, मिठाचे ५ पाकीट १०० रुपयाचे, मिरची पावडर…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली आज. जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी (9 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती. दरम्यान याबाबत आमदार लताताई सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री चांगलाच राडा झाला. विसर्जन मिरवणुकीत चक्क महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडल्यामुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेली माहिती अशी की, मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ महापौर जयश्रीताई महाजन यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास ‘एक गाव एक गणपती’ व जय श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक जात होती. यावेळी एक गाव एक गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते जय श्रीराम मंडळाच्या मिरवणूक सहभागी झाले. यानंतर त्यातील काही तरुणांनी महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल व दगडफेक करायला सुरुवात केली. यामुळे दोन…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात काही ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राम सुरक्षा दलाला सतर्क करून कुठलाही संशयित व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी तात्काळ धरणगाव पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यातून पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे. तालुक्यातील पष्टाणे, सोनवद, कल्याने होळ या गावांमध्ये मागील विसर्जनाच्या दिवशी घरफोडी गुन्हे झालेले आहेत. तेच मोटर सायकलस्वार आज रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाचा फायदा घेऊन पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी आपल्या ग्राम सुरक्षा दलाला सतर्क करून आज कोणत्याही परिस्थितीत रात्रग्रस्त करून आपले गाव सुरक्षित ठेवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारे…
जळगाव : प्रतिनिधी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या समता नगरातील तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंब रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती. भगवान नामदेव राठोड (वय-१८) रा. समता नगर जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राठोड हा आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्याला होता. भावासोबत बांधकामाचे स्टाईल बसविण्याचे काम करत होता. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत गिरणा नदिवरील कांताई बंधारा येथे गेला होता. यावेळी तरूणासांबत भगवान देखील पाण्यात उतरला.…

