भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे नेहमी सांगून वारंवार मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात भुसावळ तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात असे की, तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन तरुणीस सुमारे ०६ महिन्यापासून व दि. ४ सप्टेबर २०२२ रोजीच्या मध्यरात्री ९:४५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन तरुणीच्या राहते घरासमोर तसेच परीसरात वेळोवेळी संशयित आरोपी सचिन पाटील याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन हात धरुन माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडते असे म्हणून बळजबरीने मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच त्याने त्याच्याजवळ असलेल्या…
Author: editor desk
भारतीय रेल्वेने 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी कोणत्याही परीक्षेविना थेट भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया स्पोर्टस् कोट्यातून करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे. तेव्हा वाट कसली पाहता, लगेचच अर्ज करा.. इथं करा अर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीन आठवड्यांहून अधिक दिवस मिळणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. https://www.rrc-wr.com/ या लिंक, संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अट जाहीर करण्यात आली आहे. पदवीच्या दुसऱ्या अथवा…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात एकाच मध्यरात्री ३ घरे चोरट्यांनी फोडली तर एक किराणा दुकान फोडण्यात मात्र अपयशी झाल्याने चोरटे फरार झाले आहे. या घरफोडीमध्ये लाखो रुपयाचा चोरट्यांनी डल्ला मारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याप्रकणी धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीसपथक घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरु आहे. मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथील ३ घरातील परिवार बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी या घरावर डल्ला मारत लाखो रुपयाचा ऐवज तर एक किराणा दुकान फोडण्याचा धाडसी प्रयन्त करण्यात आला आहे. या तीनही घराच्या चोरीत लाखो रुपये व सोने चांदीचे दागिने लंपास झाल्याची खात्रीलायक वृत्त आहे. येथील रहिवासी वना धोंडू पाटील, दिलीप…
बुलढाणा : वृत्तसंस्था ज्यांच्या बापानं कधी शेकाेट्या पेटविल्या नाहीत ते महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करीत आहेत. ज्यांनी कधी थप्पड मारली नाही ना खटमल मारलं. तुम्ही काय करणार बघूनच घेताे. आम्ही ठरवलं असतं तर त्याच दिवशी दाेनशे तीनशेंचा बंदाेबस्त झाला असता. ज्यांना … आली असेल त्यांनी या त्याची व्यवस्था करताे मी असा प्रहार व इशारा आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांना आज पुन्हा एकदा दिला आहे. आमदार गायकवाड यांनी नुकतेच चून चून के मारेंगे अशी धमकी ठाकरे गटास अप्रत्यक्ष दिली हाेती. त्यास ठाकरे गटानं प्रत्युत्तर देताना आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या नादाला लागू नकोस असं उत्तर दिलं हाेते. तसेच…
पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक चित्तथरारक घटना घडली. एका बिबट्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. पण हा हल्ला परतावून लावण्यात धाडसी महिलेला यश आलंय. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथे ही घटना घडली. घराबाहेर असलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून जोरदार प्रतिकार केला आणि बिबट्याला परतावून लावलं. कलाबाई देविदास मते असं या धाडसी महिलेचं नाव आहे. या धाडसी महिलेचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. बिबट्याच्या हल्ला परतावून लावून ही महिला बचावली. मात्र या प्राणघातक हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या महिलेच्या डोक्याला टाके पडलेत. कलाबाई यांच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरातील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे “पर्यावरण पूर्वक गणपती विसर्जन’ महापौर महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.प्रसंगी गणेशोत्सव 2022 च्या शालांतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी संस्थेचे सचिव ललीत धांडे, मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत होती.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील एका विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे प्रकरणी शहर पोलिसात अक्स्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील लाकूड पेठ मधील रहिवासी उमेश भास्कर मोघे यांच्या पत्नी संगिता उमेश मोघे (वय ४०) यांनी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. पती उमेश मोघे हे घरी आल्यावर पत्नीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. शेजारचांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील प्रताप महाविद्यालयात विद्यार्थाकडून प्रवेश प्रक्रीये दरम्यान विविध सुविधेच्या नावाखाली शुल्क आकारले जात असल्याचा निषेध आज राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने आज सकाळपासून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांच्या नेतृत्वाखाली य्या आंदोलन सुरु केले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहातील प्रताप महाविद्यालयात सुमारे साडे पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण याच गणित केलं तर आपल्याला लक्षात येईल की एका वर्षाला महाविद्यालयाकडे जिमखानेच्या नावाखाली दर वर्षी साडेआठ ते नऊलाख रुपये गोळा होतात. सदर जिमखाना तीन ते चार वर्षांपासून बंद आहे धुळीत माखलेला आहे. राष्ट्रवादीने याच प्रश्नवर बोट ठेवत महाविद्यालय प्रशासनाला आहे की तीन ते चार वर्ष…
नशिराबाद : प्रतिनिधी जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयातील शिपायाने येथील अवघ्या ७ वर्षाच्या बालिकेच्या विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आजीने फिर्याद दिली असून त्यानुसार जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयातील शिपायाविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीची आजी तिच्यासोबत घेऊन तलाठी कार्यालय, जळगाव खुर्द, ता. जळगाव येथे माहीती घेणेकामी गेली होती. त्यावेळी तलाठी ऑफिस उघडे होते. ऑफिसमध्ये शिपाई भैय्या व एक इसम बसलेले होते. फिर्यादी हीने कार्यालयात बसलेल्यांना तलाठी मॅडम आहे का? याबाबत विचारपुस केली असता, शिपाई भैय्या यांने तलाठी मॅडम आताच बाहेर गेल्याचे सांगितले.…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जाणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. शिंदे गटाकडून यासंदर्भात सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, निवडणूक आयोग प्रक्रियेसंदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल देण्याची मागणी शिंदे गट आज कोर्टात करणार आहे. शिंदे गटाकडून त्यांचे वकील आज सुप्रीम कोर्टामध्ये तशी विनंती करणार आहे.…

