Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.२४ जानेवारी २०२६ मेष राशी आज, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाने, तुमच्या नात्यांमधील गैरसमज दूर होतील. तुमचे वर्तन सुधारण्याची आणि भूतकाळातील चुका सुधारण्याची हीच वेळ आहे. तुम्ही ताकदीने नवीन सुरुवात कराल. नव्या प्रोजेक्टसाठी मस्त आयडिया सुचेल. वृषभ राशी आज कुठेतरी अडकलेले जुने पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. या राशीखाली जन्मलेल्या कला विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही एखाद्या मित्रासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. मिथुन राशी आज व्यवसायातील बारकावे समजून घेणे महत्वाचे आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. आज तुमची खास इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून मिळणारा पाठिंबा तुमचा उत्साह वाढवेल.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधान इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण करण्यात तज्ञ असल्याचा आरोप करत, गेल्या महिन्यात संसदेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान राष्ट्रगीताच्या इतिहासाचा अपलाप करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदी पद्धतशीरपणे महात्मा गांधींच्या स्मृती आणि वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेत राष्ट्रगीतावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी ‘उघड’ झाल्याचा दावाही त्यांनी केला. आज, २३ जानेवारी २०२६ रोजी देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था २२ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापौर बसवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून अनेक नावांची चर्चा रंगू लागली आहे. तर उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. “एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गरजूंची सेवा करणे हेच खरे आमचे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचत आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस आरोग्य संपन्न होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच पाळधी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले .या प्रसंगी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हमीभाव योजनेंतर्गत नाफेडकडून भोकरदन तालुक्यातील आन्वा, वाकडी, भिवपूर, दानापूर व पिंपळगाव रेणुकाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र खासगी बाजारात दराने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नाफेड व खासगी व्यापाऱ्यांच्या दरात १०० ते २०० रुपयांचा फरक असून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर स्कूल व्हॅनच्या चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या जखमा ताज्या असतानाच, या नवीन प्रकरणाने संपूर्ण बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुकली नेहमीप्रमाणे शाळे सुटल्यानंतर स्कूल व्हॅनने घरी परतत होती. याच प्रवासादरम्यान नराधम चालकाने तिला आपल्या पाशवी वासनेचे शिकार बनवले. घरी पोहोचल्यानंतर या घाबरलेल्या चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी काहीही कारण नसतांना अक्षय शरद सकट (वय २२, रा. अर्जुन नगर, हरिविठ्ठल नगर) या तरुणासह त्याच्या मित्राला तिघांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड त्याच्या डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. २० जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजीवगांधी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारे अक्षय सकट हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २० जानेवारी रोजी राजीव गांधी नगरात रात्री ११ वाजेच्या सुमारास तेजस लोंढे, सितेश लोंढे व गणेश लोंढे या तिघांनी काहीही कारण नसतांना अक्षय व त्याच्या मित्राला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत सासुरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. सागर दिलीप बिऱ्हाडे (वय ३६, रा. राजमालती नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गेल्या सात वर्षांपासून पत्नी व चार मुलांसह आव्हाणे येथील सासुरवाडीला राहण्यासाठी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिऱ्हाडे याचा गावातील काही तरुणांसोबत किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील ओम नगर परिसरातील एका तरुणाला बनावट ‘एसबीआय योनो’ लोगो असलेल्या फाईलद्वारे ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांना गंडविण्यात आले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय धर्मराज चव्हाण (३५, रा. ओम नगर, जुना खेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दि.१७ जानेवारी २०२६ रोजी एका अनोळखी व्यक्तीने ‘आधार केवायसी अपडेट’ नावाने एक संशयास्पद फाईल पाठवली होती. ही फाईल इन्स्टॉल करताच सायबर चोरट्याने विजय यांच्या बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती प्राप्त करून खात्यातील शिल्लक रक्कमच चोरली नाही, तर त्या खात्याशी संबंधित असलेली एफडीदेखील परस्पर मोडून सर्व रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. एकूण ५ लाख…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी चारचाकी वाहनाचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार डिव्हायडर तोडून उलटली. त्याचवेळी ही कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर धडकली. यात भुसावळ येथील तरुणीचा मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद टोलनाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, झोया नदीम पठाण (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे तर वाहनचालक अरबाज खान (२६, रा. खडका रोड, रजा टॉवर परिसर, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. जळगावहून भुसावळकडे येणारी कार नशिराबाद टोलनाक्याजवळ पोहोचली असता अचानक वाहनाचे पुढील टायर फुटले. त्यावेळी हा अपघात घडला. जखमी तरुणास गोदावरी…

Read More