Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२६  मेष राशी आज, तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांकडून कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात मदत मिळेल. एखादा वर्गमित्र तुमच्याशी काही वैयक्तिक गोष्टी शेअर करू शकतो. तुम्ही तुमच्या मित्राला मदत करण्यास नेहमीच तयार असाल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वृषभ राशी आज दिवस बरा जाणार नाही. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तुमचे महत्वाचे काम पूर्ण होत आहे, परंतु संध्याकाळपर्यंत ते रखडू शकते. आज कोणतेही महत्त्वाचे काम हाती घेण्यापूर्वी, वडीलधाऱ्यांचा किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने, आज तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात करू शकाल. मिथुन राशी परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आजमहत्वाची अपडेट मिळू शकते. आज आर्थिक…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा पेच आणि काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरून भाजप नेते व आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “चंद्रपुरात सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. सध्या वडेट्टीवारांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी झाली आहे,” असा खोचक टोला फुकेंनी लगावला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तास्थापना करण्यात अपयशी ठरल्याने फुकेंनी काँग्रेसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वडेट्टीवार ना स्वतःच्या पक्षश्रेष्ठींचे ऐकतात, ना त्यांचे नगरसेवक त्यांचे ऐकतात. मोठा पक्ष असूनही सत्ता उभी करता न येणे, हे काँग्रेसच्या अपयशाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेसवर टीका…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत केली आहे. प्रदर्शित होताच हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून एक्स (ट्विटर)वर ट्रेंडमध्ये आहे. ‘मातृभूमी’ या गाण्यात सलमान खान भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दमदार आर्मी लूकमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह प्रमुख भूमिकेत असून, गाण्यात एक साधं पण आनंदी कौटुंबिक जीवन दाखवण्यात आलं आहे. शांत, प्रेमळ क्षणांना गलवान खोऱ्यातील तणावपूर्ण युद्धप्रसंगांशी प्रभावीपणे जोडण्यात आले असून कर्तव्य, प्रेम, त्याग आणि देशभक्तीचा भावनिक संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय वातावरण तापले असतानाच, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संशयातून नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाचे अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील रहिवासी संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपाच्या आधारे काही व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेले. तेथे त्यांना…

Read More

ठाणे : वृत्तसंस्था ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIMला मुंब्रा परिसरात मिळालेल्या यशानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सहार शेख यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पोलिस चौकशीनंतर सहार शेख यांनी लेखी माफीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, माफीनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीतील विजयानंतर केलेल्या भाषणात सहार शेख यांनी, “अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है,” असे वक्तव्य केले होते. या विधानाचा अर्थ धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारा असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार विरोध दर्शवला असतानाच, आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना थेट आव्हान देत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बिहार भवन बांधणारच. बिहार भवन बांधण्याचं काम थांबवण्याइतकी ताकद कुणामध्येही नाही,” असे स्पष्ट शब्दांत अशोक चौधरी यांनी सांगितले. तसेच, “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का? फालतू गोष्टी सुरू आहेत. उपचारांसाठी महाराष्ट्रात येणाऱ्या बिहारमधील लोकांसाठी हे भवन उभारले जात आहे. हा देश आहे की कुणाची जबरदस्ती चालणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशोक चौधरी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने त्याला आळा घालण्यासाठी ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले होते. अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेतील लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्याची मोठी घोषणा…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था अभिनेता कमाल रशीद खान ऊर्फ केआरके याला ओशिवरा येथील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तो मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा संध्याकाळी केआरकेला ओशिवरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत केआरकेने गोळीबार त्याच्या परवानाधारक बंदुकीतूनच झाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्याची बंदूक जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. १८ जानेवारी रोजी अंधेरीतील ओशिवरा परिसरातील नालंदा सोसायटीतील एका निवासी इमारतीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोन गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, एक गोळी दुसऱ्या मजल्यावरून तर दुसरी चौथ्या मजल्यावरून मिळाली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेमधील दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी मोहीम आता तीव्र झाली असून, दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत मोठी तफावत आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आतापर्यंत १३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन निश्चित मानले जात असून, यामध्ये शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निलंबनाबाबतचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे सादर करण्यात आले असून, यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात अनेकजण प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. तपासणी प्रक्रियेनंतर संबंधितांचे अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त होत असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे. प्रशासनाची कारवाई केवळ निलंबनापुरती मर्यादित राहणार नसून,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेले आव्हाणे येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादातून सागर अरुण बिन्हाडे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना, २२ जानेवारी रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सुमीत उर्फ टक्या उमेश सपकाळे (वय २०) याला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेत इतरही काहींचा सहभाग असल्याचा दावा करत मयताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. यावेळी संशयित आरोपी सुमीत उर्फ टक्या सपकाळे याने सागर बिन्हाडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने सागर यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मयताची…

Read More