जळगाव : प्रतिनिधी नवीन कारच्या लकी ड्रॉमधील बक्षिसाची माहिती घेऊन परतत असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवसेनेचे तळई उत्राण गट प्रमुख देशमुख चुन्नीलाल राठोड (५५, रा. निपाणे तांडा, ता. एरंडोल) व त्यांचा नातू परेश दिनेश राठोड (६) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात राठोड यांच्या पत्नी बेबीबाई राठोड (५०) गंभीर जखमी झाल्या. हा अपघात रविवारी (२५ जानेवारी) दुपारी बायपासवर पाळधीनजीक सावदे–रिंगणगाव फाट्यावर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, निपाणे तांडा येथील देशमुख राठोड यांनी महिनाभरापूर्वी नवीन कार खरेदी केली होती. या कारच्या लकी ड्रॉमध्ये त्यांना बक्षीस लागले होते. त्याची माहिती घेण्यासाठी ते पत्नी बेबीबाई व नातू परेश याच्यासह दुचाकीने (क्र.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी खरेदीचा बहाणा करून सोन्याची चेन लांबविणाऱ्या तेलंगणातील चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भास्कर किसन बानोथ (२२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष चौक परिसरातील रतनलाल बाफना ज्वेलर्स (नयनतारा अॅड सन्स) या सराफा दुकानातून ९ जानेवारी रोजी सोन्याची चेन चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तपास सुरू असताना चोरी तेलंगणातील चोरट्याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, मुबारक देशमुख व पंकज खडसे यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील सायबराबाद येथून भास्कर बानोथ याला ताब्यात…
आजचे राशिभविष्य दि. २६ जानेवारी २०२६ मेष राशी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना लवकरच स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. वृषभ राशी आज ऑफिसमध्ये कामाचा मोठा ताण असेल, म्हणून आळस टाळा. आज तुमचे संपर्क अधिक मजबूत करा, कारण हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मिथुन राशी आज, कुटुंबातील मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवली जाऊ शकते आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून मदत मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाढत्या खर्चामुळे मन गोंधळू शकतं, पण लवकरच उपाय सापडेल. कर्क राशी सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज खूप काम असेल. वरिष्ठांकडून दबावही असेल. नवीन…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ सालचे प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि निष्कलंक सेवेचा हा सन्मान मानला जात आहे. पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे आदर्श उदाहरण म्हणून संजय शेलार यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात तब्बल ३५ वर्षे अखंडपणे कर्तव्य बजावले असून, या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २४२ बक्षिसे मिळाली आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण सेवाकाळात त्यांना एकदाही शिक्षा, दंड अथवा ताकीद देण्यात आलेली नाही. त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गावांमधील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ (Panchayat Assistance & Messaging Chatbot) हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या नव्या डिजिटल उपक्रमामुळे आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरून ग्रामपंचायतीशी संबंधित विविध कामे, दाखले तसेच शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘पंचम’ या चॅटबॉटची रचना केली असून तो ग्रामपंचायतींसाठी एक ‘डिजिटल सोबती’ म्हणून कार्य करणार आहे. दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करण्यासोबतच मार्गदर्शन व महत्त्वाची माहिती सोप्या स्वरूपात पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पंचम’च्या माध्यमातून केंद्र सरकार आणि देशभरातील ३०…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यंदा देशभरातील ४५ मान्यवरांना विविध पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे. राज्याच्या मातीतील लोककला जिवंत ठेवणारे लोकनाट्य तमाशा महर्षी रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ सेवा बजावणाऱ्या डॉ. अर्मिडा फर्नांडिस, कापूस संशोधनात क्रांती घडवणारे परभणीचे शेतकरी संशोधक श्रीरंग लाड तसेच पारंपरिक वाद्यसंस्कृती जपणारे तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींचा समावेश आहे. कला,…
जळगाव : प्रतिनिधी जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी दोन तरुणांवर सिमेंटचा ब्लॉक फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुलाखालील चहाच्या टपरीसमोर घडली. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरात राहणारा दिनेश माने हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतो. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तो शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असताना मागील भांडणाच्या कारणावरून अयान शरिफ पटेल, अनिस रेहमान पटेल व त्यांच्या आणखी एका साथीदाराशी त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि तिघांनी…
जळगाव : प्रतिनिधी सहा महिन्यापुर्वी भाडेतत्वावर घेतलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एएचटीयू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. तर कुंटणखाना चालविणाऱ्या विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक केली. ही कारवाई दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास केली. या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खेडी शिवारातील हनुमान नगरात विजय याने भाडेतत्वावर घर घेतल होते. त्याठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तेथे कुंटणखाना चालवित असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यांनी दि. २३…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांचा संयुक्त कारवाईत प्रतिबंधित असलेला गुटख्याचा कंटेनर पाठलाग करून पकडल्याने पाळधी परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांना आज दुपारी महामार्गावरून एक कंटेनर प्रतिबंधित असलेला गुटख्याची वाहतूक करत आहे, अशी माहिती मिळाली. यानुसार त्यांनी पाळत ठेवली. तर कंटेनर येताच तो थांबवण्यास सांगितले. मात्र तो कंटेनर न थांबताच पुढे गेला. त्यामुळे पाठलाग करून एरंडोल तालुक्यातील सावदे शिवारात या कंटेनरला पकडण्यात यश आले. त्यानंतर हा कंटेनर ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणला. या वेळी त्या कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार…
जळगाव : प्रतिनिधी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती घेतांना मोबाईलवर आलेली लिंक चुकून क्लिक झाल्याने माधवदास खिल्लुमल शुगानी (वय ७९, रा. अमळनेर) यांची ७लाख ८९ हजारात तर खासगी वाहन चालक शेख शरीफ शेख खलील (वय ३१, रा. मेहरुण) यांना फ्रेन्चाईसी मिळवून देतो असे म्हणत त्यांची ५ लाख ३७ हजारात ऑनलाईन गंडविले. या दोघ घटनांध्ये एकूण १३ लाख २७ हजारात फसवणूक झाल्याने याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथून निवृत्त झालेले शिक्षक माधवदास शुगानी हे अमळनेर येथे वास्तव्यास आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती ऑनलाईन शोधली. जास्त रात्र झाल्याने झोप येत असताना मोबाईलवर…

