मुंबई : वृत्तसंस्था अंधेरी पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट क्षणाक्षणाला वाढत असून भाजपने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भावनिक आवाहनानंतर भाजप आपला उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.शिंदे गट व ठाकरे गट ज्या विधानसभेसाठी लढत आपले चिन्ह हि गोठविले होते, त्याच विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला आता विजय मिळविणे सोपे झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा आपल्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली असून त्यामध्ये उमेदवारीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवेल की मागे घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था कोरोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस तसेच अॅडव्हान्स न दिल्यामुळे नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. राज्यात दिवाळी सन येत्या आठवड्यात येवून ठेपला असून आतापर्यत सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी सरकारच्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे. प्रवासी आणि गणवेश भत्ताही मिळालेला नाही. मागच्या दिवाळीमध्ये केवळ सातशे पन्नास रुपयांची कुपन देऊन तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी तर गोड होईल अशी आशा वाटत होती मात्र, दिवाळी तोंडावर येऊनही अॅडव्हान्स पगार नाही. कोरोनाकाळी पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली मात्र पोलिसांनी…
मुंबई : वृत्तसंस्था इंदूर येथील राहत्या घरी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री वैशालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अचानक समोर आलेल्या या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. https://www.instagram.com/reel/CjkKpocLMUu/?utm_source=ig_web_button_share_sheet मृत्यूच्या 5 दिवसांपूर्वी वैशाली टक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मजेदार व्हिडिओ होता. यामध्ये वैशाली म्हणताना दिसत आहे ‘बेबी, मी तुझ्यासाठी एक गाणं गाऊ?’ यानंतर ‘दिल, जिगर, नजर काय आहे मी तुझ्यासाठी जीवही देईल’ हे गाणे म्हणते. इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात काही दिवसांपूर्वी मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून विविध जिल्ह्यात नागरिकांनी अनोळखी लोकांना मारहाण केली होती, त्यानंतर हे कृत्य थांबविण्यासाठी राज्यातील पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते. सांगलीमध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना घडली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एका साधूला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका जणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मंदिरातील एका साधूवर एका इसमाने प्राणघातक हल्ला केला. संबंधित साधू आणि हल्लेखोर हे दोघेही एकाच परिसरात राहणारे आहे. दारूच्या नशेत या इसमाने साधूवर चाकूने हल्ला केला. दारुच्या नशेत ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले…
मुबई : वृत्तसंस्था हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य भारतातील उर्वरित भागांमधून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य आणि लगतच्या नैऋत्य बाजूस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे परिवलन आहे. तसेच…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासोबत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि १४ रोजी घरी एकटीच असताना कुणीतरी अनोळखीने तिला फूस लावत घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. घरातील सदस्य संध्याकाळी घरी आले असता मुलगी आढळून न आल्याने त्यांनी गावात व नातेवाइकाकडे शोध घेतला असता परंतु मिळून न आल्याने त्यांनी लागलीच मारवाड पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी विरोधात पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास मारवाड पोलीस स्थानकाचे सफौ.बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील महिलेचे व तिच्या पतीचे अश्लील फोटो स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरातील ३५ वर्षीय महिलेचे व तिच्या पतीचे पारोळा तालुक्यातील एक महिलेने तिच्या दि १३ रोजी मोबाईलवरील व्हॉटसअप स्टेटस ठेवत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन होईल अशी भाषा वापरून कॉमेंट केल्यामुळे पीडित महिलेने संशयित आरोपी महिलेच्या विरोधात रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात एका ६१ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका ४२ वर्षीय महिला दि १५ रोजी रात्री ८ वाजता रीडिंगहून एका गल्लीतून घरी जात असताना एक ६१ वर्षीय संशयित आरोपी विजय विनायक काळकर हा महिलेची वाट बघत थाबलेला दिसला, महिला पुढे गेली असता तिच्या मागे येत अंधाराचा फायदा घेत तू मला किती दुर्लक्ष करणार आहे, तू माझ्या सोबत ये तुला सुखी ठेवेल असे म्हणत महिलेचा मनाला लज्जा उत्पन होईल असे कृत्य केल्या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात सशयित आरोपी विजय…
मुंबई : वृत्तसंस्था २००४मध्ये आक्रोश मालिकेच्या सेटवर शरद केळकर आणि कीर्ती पहिल्यांदा भेटले ते पहिल्याच नजरेत शरद कीर्तीच्या प्रेमात पडला. या मालिकेनंतर पुन्हा एकदा दोघं भेटले चार-पाच महिन्यांनी. सिंदूर तेरे नाम का आणि सात फेरे मालिकांच्या सेटवर. दोघं एकमेकांच्या जास्त जवळ यायला लागले. मग दोघंही डेटिंगही करत होते. शरद आपला दमदार आवाज आणि अभिनय यामुळे रसिकांच्या मनावर राज्य करतोय. शरदची पत्नी कीर्ती गायकवाडही उत्तम अभिनेत्री आहे. त्याची आणि कीर्तीची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. जाणून घ्या शरद व कीर्तीची लव्हस्टोरी काय आहे ते ? https://www.instagram.com/reel/CPdS-IWABFA/?utm_source=ig_web_button_share_sheet शरद केळकरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, कीर्तीबरोबर तो चार-पाच महिने रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर त्याला जाणवलं,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट अनधिकृत ठरवत ते पाडण्यासाठी आता सार्वजनिक बाधकाम विभागाला तब्बल १ कोटी रुपये खर्च येत असल्याने त्याची जाहीर निविदाच काढावी लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील अनिल परब यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट पाडण्यासाठी आणि ढिगाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसा अंदाजपत्रकीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र या वेळी महसूल, पोलिस सुरक्षा आदींसाठी लागणारा खर्च अंदाजित खर्च १ कोटीवर जाणार आहे. दोन रिसॉर्ट पाडण्यासाठी पूर्वी कन्सल्टंटची नेमणूक करण्यासाठी…

