Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ मानला जाणारा जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह कार्यकर्ते आज दि २१ रोजी शिंदे गटात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रवेश करीत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. धरणगावचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज सकाळी पाळधी येथील शासकीय निवासस्थान गाठत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शिंदे गटात दाखल झाल्याने धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला एक मोठा धक्का मंत्री पाटील यांनी दिला आहे. दि २१ रोजी सकाळी १० वा. हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, गटनेते पप्पू भावे, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, माजी नगरसेवक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर उड्डाण पुलाजवळ एका इसमाच्या खिश्यातून १५ हजार रुपये चोरी केल्या प्रकरणी ४ अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर उड्डाणपूल उतरल्यावर कानळदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कुठल्याही प्रकारची लाईट नसल्याने या अंधाराचा फायदा घेत ४ अनोळखी तरुणांनी लाकूड पेठेतील रहिवासी प्रशांत अशोक पाटील (२८) यास दि १८ रोजी रात्री घरी जात असतांना यांच्या खिश्यातून १५ हजार रुपये काढून पळ काढला. यावेळी त्यांच्या जवळील १५ हजार रुपयाची रोख रक्कम चोरी झाली आहे. या प्रकरणी प्रशांत पाटील यांनी शहर पोलीस स्थानकात धाव घेत ४ अनोळखी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था कोणत्या चित्रपटामुळे नाही तर ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या वर्षापासून अभिनेता शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान सातत्याने चर्चेत आहे. यामुळे शाहरुखच्या अडचणीतही मोठी वाढ झाली होती. आता मात्र या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्यन दिल्ली न खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने एक मोठी माहिती दिल्ली मुख्यालयाला दिली आहे. आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल 26 दिवस तो कोठडीत होता . NCBकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान काही महिन्यांआधीच आर्यनची या केसमध्ये निर्दोश सुटका करण्यात आली मात्र आता या प्रकरणात NCBकडून मोठी माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या ड्रग्ज…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला १०० दिवसापेक्षा जास्त दिवस होवूनही अजूनही मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. पहिला मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा जवळपास महिना – दीड महिन्याने झाला. आता पुढचा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, शिंदे गटातल्या नाराज आमदारांना नवं गाजर दाखवण्यात येणार असल्याची माहिती हाती येत आहे. शिंदे गटातले अनेक माजी मंत्री पुन्हा संधी न मिळाल्याने नाराज आहेत. अनेकजण सातत्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत असतात. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्री आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत.  अजूनतरी मंत्रिमंडळ विस्ताराचा जवळचा मुहुर्त दिसत नाही. त्याऐवजी अशा नाराज आमदारांकडे विविध महामंडळांची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था ”माझ्या गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवून खोट्या केसमध्ये मला अडकवलं, घाणेरडे व्हीडिओ बनवून माझी गाडी आणि घर हिसकावलं… जेवढी ताकद लावायची तेवढी लाव. तुझ्या पैशांपुढे झुकली नाही आणि खोट्या ताकदीपुढेही. ही नारी शक्ती आहे.” अशी पोस्ट करुणा यांनी केलीय. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या करुणा शर्मा यांनी आजही धनंजय मुंडेंवर फेसबुक पोस्ट केलीय. ‘Karuna dhananjay munde’ या त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन आज सकाळी करुणा यांनी एक पोस्ट केलीय. खोट्या केसमध्ये अडकवणं, पैशाच्या जोरावर त्रास देणं; या कारनाम्यांनी मी झुकणार नाही, अशा आशयाची ही पोस्ट आहे. मागील वर्षी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करण्यात आला होता. सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता आणि खर्चसुधार धोरणानुसार पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यात आला होता. पण, आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवार ते शुक्रवार असे ठरवण्यात आलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्यण होण्याचे संकेत आहेत. यामुळे पूर्वीच्या धर्तीवरच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मंत्रालयासह सर्व प्रशासकीय कार्यालये सुरू राहणार असून, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालयांना सुटी राहणार आहे. असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी व शिंदे – फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये चांगलाच सामना राज्यातील जनतेला पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले, त्यांनी काही ना काही उद्देश व लाभ ठरवून गेले आहेत, हे जनतेच्या लक्षात आलं आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात चित्र वेगळं असेल, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची पावसामुळं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सुरु असलेली राजकीय घडामोड पाहता सत्तांतरानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एका व्यासपीठावर आले. पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीपूर्वी एका स्पेशल डिनरला हजेरी लावली. यावेळी शिंदेंनी पवार माझ्या व भाजप नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांची रात्रीची झोप उडेल, अशी मिश्किल टिपणी केली. एकनाथ शिंदेंनी यावेळी कुणाचेही नाव घेतले नाही. पण त्याचा रोख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे. शिंदे म्हणाले – ‘पवार, फडणवीस व शेलार एकाच व्यासपीठावर आलेत. यामुळे काही लोकांची रात्रीची…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत तीचा विनयभंग केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि १६ रोजी मुलीचे आई व वडील शेतात कामानिम्मित गेले असता, संशयित आरोपी संदीप रविद्र पाटील हा पिडीत मुलीच्या घरी येत इन्व्हटरची चिट्ठी मागत मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात संशयित आरोपी संदीप रविद्र पाटील याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी राजू जाधव हे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २७ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत असे की, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय महिला मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. या विवाहितेच्या मुलीच्या वाढदिवसाच्या १५ दिवसानंतर संशयित आरोपी गणेश निवृत्ती सपकाळे(रा. भादली व ह.रा.पुणे) याने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जळगावातील विवाहितेच्या मैत्रिणीच्या घरी तसेच पुणे येथे अत्याचार केले. दि ९ फेब्रुवारी २०२२ व दि २५ मे २०२२ रोजी पुणे येथे तिच्यावर अत्याचार करून पुणे येथील सिव्हील हॉस्पिटल येथे…

Read More