जळगाव : प्रतिनिधी राज्यात शिंदे सरकार व महाविकास आघाडी सरकारमधील नेत्याची आता रोज टीका टिपणी होत आहे, यावर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांनी आज जळगावात विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे. राज्यातील सर्व विरोधक म्हणतात म्हणे कुछ तो होणेवाला है,कुछ तो होणेवाला है असे काही होणार नाही मात्र मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी तुमच्या उरावर बसणार आहे असा इशारा जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात दिला आहे. नेमके काय म्हणाले खडसे? माझ्या पाठिशी कामाच्या आणि संपर्काच्या बळावर जनता उभी राहिली. एकनाथ खडसेंला काही तरी करून जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुलभ करायच्या हा विरोधकांचा प्रयत्न आहे.…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री तसेच जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य नोंदणीस सुरवात करण्यात आली. यावेळी माजी नागराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, रवी दादा, दिलीप अण्णा धनगर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष निलेश चौधरी,युवक शहर अध्यक्ष संभाजी कंखरे,सोशल मीडिया प्रमुख सागर वाजपेयी,किशोर भदाणे,नारायण चौधरी,सुरेश जाधव, पंकज पारधी,राज पारधी, साहेबराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुभाष चौकात बाजार करण्याकरिता आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिला यशोदा संतोष कोळी (रा.कठोरा) यांचे सोने व चांदीच्या दागिन्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शनी पेठ परिसरातील सुभाष चौकात दि २२ रोजी सायंकाळी ७० वर्षीय वृद्ध बाजार करण्यासाठी आली असता तिच्या कापडी पिशवीमधुन सोने व चांदीचे तब्बल २ लाख ११ हजार रुपयांचे दागिने अनोळखी इसमाने चोरून नेले. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने शनीपेठ पोलिसात धाव घेत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.परिश जाधव हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका हॉस्पिटलच्या मालकास धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरोधात खंडणीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एमआयडीसी परिसरातील एका हॉस्पिटल मालकास दि १४ रोजी संशयित आरोपी शोहेब पटेल याने हॉस्पिटलच्या बिलाची पैसे कमी करण्याचे सांगतिले असता, त्याच्या विरोधात दि १६ रोजी एका वृत्तपत्रात खोटी बातमी देत त्यानंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये येवून भेट घेत धमकी देत ५ लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी संशयित आरोपी शोहेब पटेल रा.नाचणखेडा याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे हे करीत आहेत.
अकोला : वृत्तसंस्था जिल्ह्यातील एक मृत युवकाला जिवंत करुन गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून माडला आहे. बुधवारी सायंकाळी एका युवकाचा अंत्यसंस्कार होत असतानाच तो तिरडीवर उठून बसला होता. मात्र, हा केवळ भोंदूगिरीचा प्रकार असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. पातूर तालुक्यातील विवरा गावात ही घटना घडली. मृत झाल्याचा बनाव करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस स्टेशनमध्येच त्याची आरोग्य तपासणी केली असता युवक निरोगी आढळून आला आहे. आता हा प्रकार युवकाच्या कुटुंबीयांनी का केला? याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी एका वृत्संस्थेला दिली आहे. विवरा येथील होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत मेसरे याला दातखिळी येण्याचा…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील कलागुरु नगरात जबरी घरफोडी झाल्याची घटना घडली असून या घरफोडीत सोने लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कलागुरु नगरातील रहिवासी दीपक श्रीराम पाटील यांच्या घरात दि २५ रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखीनी घरात घुसून २० ग्राम सोन्याची चैन, लहान मुलाचा चांदीचा करदोडा हातातील कळे यासह १३ हजार रुपयाची रोकड असा एकूण ७३ हजारा रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि २६ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात विजय तुकाराम पाटील(४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.चंद्रकांत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात राणे परिवार नेहमीच सक्रीय दिसून आपली प्रतिक्रिया देत असतात, नुकतेच नितेश राणे यांनी “नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटा हवा” अशी मागणी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. “ये परफेक्ट है” असे म्हणत राणे यांनी नोटवर शिवाजी महाराजांचा असलेला फोटो शेअर केला आहे. भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापा, अशी अफलातून मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली. त्यानंतर नितेश राणे यांनी महाराष्ट्रातून शिवरायांच्या फोटोंची मागणी केली आहे. https://twitter.com/NiteshNRane/status/1585225623471271937?s=20&t=GqXMWjGoOZSlueaLOx1b3w…
जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात शिंदे सरकारचे मंत्री व आमदार गट मोठा करण्यासाठी धडपड करीत असतानाच जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटातील एका आमदार मात्र नाराज असल्याचे जाणवू लागले आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण होत नाहीत, तोच शिंदे गटातील आमदार एकमेकांना भिडले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटातील मंत्री व आमदारांच्या या नाराजी नाट्यामुळे जळगाव जिल्ह्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्याच सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पुन्हा एकदा मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला, त्याच पक्षातील माजी मंत्र्याच्या मुलासोबत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव एका कार्यक्रमात दिसले,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील टावर चौक परिसरातून दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शहर पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टावर चौक दरम्यान दि २६ रोजी संजय शांतीलाल अलीझाड(५२) हे शहरात कामानिमित आले असता, त्यांची दुचाकी एम.एच.१९.सी.डी.४८९६ या क्रमांकाची कुणी तरी अनोळखीने लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संजय शांतीलाल अलीझाड(५२) यांनी शहर पोलिसात दुचाकी चोरीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.किशोर निकुभ हे करीत आहेत.
दिवाळीमधील लक्ष्मी पूजन झाल्यानंतर सोने चांदीचे भाव स्थिर असतांना भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सोने चांदीचे भावात वाढ पाहायला मिळत आहे. आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या. चेन्नई – 51,980 रुपये दिल्ली – 51,430 रुपये हैदराबाद – 51,280 रुपये कोलकत्ता – 51,280 रुपये लखनऊ – 51,280 रुपये मुंबई – 51,110 रुपये नागपूर – 51,310 रुपये पुणे – 51,310 रुपये सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल…

