Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचं संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध केलंय. पक्षानं महिलांसाठी स्वतंत्र संकल्प पत्र जारी केलं आहे. राज्यात सरकार आल्यास समान नागरी संहिता लागू केली जाईल, त्यासाठी एक समिती स्थापन करून तिच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन भाजपनं आपल्या ठराव पत्रात दिलंय. याशिवाय, टप्प्याटप्प्यानं 8 लाख नोकऱ्यांची निर्मिती, 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचंही भाजपनं जाहिरनाम्यात म्हटलंय. तसेच मुख्यमंत्री योजनेंतर्गत पीएम किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक 3000 जोडले जातील, असंही भाजपच्या ठराव पत्रात म्हटलंय. सध्या या योजनेअंतर्गत केंद्राकडून 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. भाजपनं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अलीकडेच आलियाच्या बेबी शॉवरचे विधी पार पडले. या सोहळ्याला बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कपूर कुटुंबात एका छोट्या परीचं आगमन झालं आहे. आलिया भट्टने एका मुलीला जन्म दिला आहे. पालक म्हणून आलिया आणि रणबीरच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ जोडपे पॅरेंट क्लबमध्ये सामील झाले आहेत. प्रत्येकजण आलिया-रणबीरचे अभिनंदन करत आहे. हे तेच हॉस्पिटल आहे जिथे ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. याआधी आलिया नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला बाळाला जन्म देईल, असे बोलले जात होते, परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीला कपूर कुटुंबाने मुलीचे स्वागत केले आहे. गेल्या महिन्यात झाले होते आलियाचे बेबी शॉवर अलीकडेच आलियाच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. परंतु ऋतुजा लटके यांच्यानंतर ची दुसरी जास्त मते नोटाला मिळण्याच यावेळी दिसून आलं आहे. राज्यात शिंदे व ठाकरे गटाचे भांडण ज्या निवडणुकीपासून सुरु झाले ती निवडणुक म्हणजे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  प रा विद्यालय धरणगाव येथील माजी विद्यार्थी तथा पाचोरा येथील एम एम कॉलेज मध्ये कार्यरत इंग्रजीचे प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांचे नुकतेच शोभा डेज फिमेल कॅरेक्टर्स: अ सायकोअनालीटीकल स्टटी हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी यांनी त्यांना धरणगाव पोलीस स्टेशन येथे सन्मानीत केले. प्रा डॉ अतुल सूर्यवंशी हे इंग्रजी विषयांमध्ये पीएच डी असून नेट-सेट, टीईटी, सेंट्रल टीईटी या परीक्षा उत्तीर्ण आहेत. हैदराबादच्या इंग्लीश अंड फोरेन लग्वेज युनिव्हर्सिटी या विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन द टीचिंग ऑफ इंग्लिश हा कोर्स उत्तीर्ण असून आतापर्यंत त्यांचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फोडून त्यामधील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला असल्याने बँकेच्या प्रशासनातर्फे दि.३ रोजी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एक संशयितास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि ३ रोजी शहरातील विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फोडून त्यामधील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला असल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हाचा तपास हे.कॉ.फिरोज तडवी यांच्याकडे देण्यात येवून त्यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीनुसार अयोध्या नगरातील संशयित आरोपी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध वाळू उपशा करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात दुसऱ्या दिवशीही तहसीलदार यांच्यासोबत वाळू माफियांचा बाजार उठवल्याने वाळू माफियामध्ये जिल्हा प्रशासनाचा धाक निर्माण झाला आहे. जिल्ह्याधिकारी अमन मित्तल व तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह महसूल पथकाने मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास खेडी, आव्हाणे परिसरात रात्री एक ते तीन दरम्यान ही मोहीम राबविली. या कारवाईत दोन डंपर जप्त केले. यामुळे वाळूमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा धसका वाळूमाफियांनी घेतला आहे. गेल्या बुधवारी पहाटे जिल्हाधिकारी मित्तल यांनी वाळू चोरणाऱ्या व त्यांच्या वाहनाभोवती संशयास्पद फिरणाऱ्या तब्बल सात जणांना ताब्यात घेतले असून त्यातील काही जणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क पाठलाग केला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांची शिंदे यांनी भेट घेतली. त्यावरून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र, या चर्चेला अर्थ नाही. शिंदे यांनी केवळ पवारांच्या प्रकृतीची भेट घेतली. यातून काही वेगळे घडणार नाही, अशी सावरासावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

साईकृपा इरिगेशन व ओम साई ठिबक & प्लास्ट कंपनीमध्ये विविध पदासाठी भरती प्रकिया राबविणार येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेवारांकडून आवेदन मागविण्यात येत आहेत. पदांचा सविस्तर तपशील अ.क्र. १. पदाचे नाव lab Assistant Cum production supervisor पात्रता Bsc (Any Stream/Diploma in production/ mechanical) २.    Helper १० वी पात्रता : पात्रताधारक उमेदवारांनी आपला बायोडाटा घेवून समक्ष भेटावे. अर्ज प्रकिया मुलाखत वयोमर्यादा – कमीत कमी २१ अपेक्षित ठिकाण – साईकृपा इरिगेशन, कृष्णा कॉटन जीनिग समोर जळगाव रोड धरणगाव, अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधा. ९६२३९७८२००

Read More

सीआयएसएफमध्ये जवळपास 10 वर्षांच्या सेवेनंतर केरळमधील दोन श्वान निवृत्त झाले आहेत. दोघांनाही कोची विमानतळावर जवानांनी निरोप दिला. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओही समोर आला आहे. अधिकारी या दोन कुत्र्यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय दोन्ही श्वानांनाही पदके देण्यात आली आहेत. यावेळी सीआयएसएफच्या जवानांसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. https://twitter.com/AHindinews/status/1587967544693952513?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587967544693952513%7Ctwgr%5E9ecfcb3a1079c671d7f90e97d71ca377dcadbc41%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Ftrending-news%2Fviral-video-marathi-news-trending-news-2-dogs-of-cisf-retired-after-10-years-of-service-see-video-1117556 निवृत्त झालेल्या कुत्र्यांपैकी एक 10 वर्षांचा लॅब्राडोर कुत्र्याचे नाव स्पार्की आहे. तर दुसऱ्या कुत्रा 11 वर्षांचा कॉकर स्पॅनियल इव्हान आहे. या श्वानांचा त्यांच्या सेवेच्या निमित्ताने पदक देऊन गौरव केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पारंपारिक ‘पुलिंग आउट’ समारंभात त्यांचा समावेश करण्यात आला होता जेथे CISF अधिकारी आणि जवानांनी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलगी दि ३ रोजी संध्या ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर असतांना अनोळखी इसमाने काही तरी फूस देत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून भुसावळ तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.अमोल पवार हे करीत आहेत.

Read More