Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील जनतेमध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. प्रभा आयुर्वेद रथयात्रा १५ रोजी जळगावात येत असल्याने त्यानिमिताने या रथयात्रेच्या माध्यमातून जनतेला वनस्पतींचा परिचय तसेच जनतेसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर हॉटेल मोरको, कोर्टात चौक येथे सकाळी १० ते १२ या वेळेत भरवण्यात येत आहे. रथयात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्हा वैद्य समूह यांचे मार्फत सकाळी साडेसहा ते नऊ काव्यरत्नावली चौक पासून सुरू होणार आहे त्यानंतर प्रत्येक चौकात पुष्पवृष्टी व सामान्य लोकांनी दर्शन घ्यावे यासाठी आयुर्वेद पालखी चे आयोजन करण्यात आले आहे जनतेने आपले आरोग्य निरोगी राहावे या दृष्टिकोनातून या रथयात्रेस दर्शन देऊन उपकृत करावे.…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  येथील  एका ६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेला व तिच्या सुनेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी  कि, शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या ६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेला व महिलेच्या सुनेला संशयित आरोपी उत्तम अमरलाल शिरवाणी याने जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करीत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि ६ रोजी घडली आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय महिलेने एरंडोल पोलिसात धाव घेत संशयित आरोपी उत्तम अमरलाल शिरवाणी याच्या विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील ग्रामीण रूग्णालय परिसरातून एकाची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील पार्किंग मधून दि १२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्याण अनोळखी चोरट्यांनी योगेश चैत्राम पाटील यांच्या मालकीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात फिर्यादी योगेश चैत्राम पाटील(वय २६) यांनी तक्रार देत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.रामदास बेलदार हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्ता अडवून तुकारामवाडीतील तरुणाला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता आकाश ठाकूर (रा. तुकाराम वाडी) हा कासमवाडीतून जात होता. त्यावेळी पीयुष ठाकूर (२०, रा. तुकारामवाडी), कुणाल ऊर्फ दुंड्या किरण कोळी (१८, रा. कुसुंबा), रोहित ऊर्फ भाल्या उत्तम भालेराव (२३, रा. तुकारामवाडी) यांच्यासह एकाने आकाश याला थांबवून अश्लील शिवीगाळ केली व दगड मारला. याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांनी जैनाबाद येथून पीयुष, रोहित आणि कुणाल यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, छगन तायडे,…

Read More

सोशल मिडीयावर तुफान चर्चेत असलेली टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रेटी उर्फी जावेदने आता मोठे विधान केले आहे. आताही ती तिच्या एका प्रतिक्रियेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उर्फीनं आपण जे काही बोललो त्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. उर्फीच्या विरोधात एकानं पोलिसांकडे तक्रार केल्याचे दिसून आले. उर्फी ही सावर्जनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणे, अपुरे कपडे यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. उर्फी ही सोशल मीडियावर कायमच तिच्या तऱ्हेवाईकपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यावर तिनं दिलेली प्रतिक्रिया ही नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. उर्फीनं दिलेली प्रतिक्रिया ही भलतीच टोकदार असल्याचे दिसून आले आहे. https://www.instagram.com/reel/ClQtE-ijGdU/?utm_source=ig_embed&ig_rid=cd2155ca-adde-4195-875d-f5bb78f5f3ff दरवेळी मला माझ्या कपड्यांमुळे ट्रोल केले जाते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात राज्यपाल कोश्यारी व भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा निषेध करण्यासाठी आज शहरातील विविध संघटनानी मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बांभोरीसह महामार्गावर दोन वेळा १० मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना ताब्यात घेत बाजूला नेत वाहतूक सुरू केली. मात्र काहीवेळाने पुन्हा आंदोलक रस्त्यावर आले, यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तालुका पोलिस ठाण्यात नेले. दुपारी उशिरापर्यंत त्याना तेथेच बसवून ठेवण्यात आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय, कोश्यारी की हुशारी नही चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या घोषणा यावेळी देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस, शिंदे सरकारचाही…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी असलेले गजानन पुंडलिक पाटील यांची नुकतीच संजय गांधी निराधार योजनेच्या समितीमध्ये अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र जळगाव जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पारित केले आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यक्त्यांनी अभिनंदन केले आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्याला मिळाला सन्मान ! धरणगाव तालुक्यात गजानन पाटील हे मंत्री गुलाबराव पाटील यांचे 33 वर्षांपासून एकनिष्ठ राहून अनेक सामाजिक राजकीय कामे त्यांच्या हातून घडलेले असल्याने या कार्याचे फळ म्हणून त्यांना आज संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद मिळाले आहे. हे पद मिळाल्यावर सर्व सामान्य जनतेसाठी या पदाचा पुरेपूर कसा फायदा होईल असे काम आपल्या हातून होईल…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले आहेत. हा मुकमोर्चा बेकायदेशीर असून त्यांना अटक करा अशी मागणी गुणरत्न सदवर्ते यांनी केली आहे. पुण्यात पाळण्यात आलेला बंद आणि हा मुकमोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केलीय. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी जोर धरु लागली. याच पार्श्वभुमीवर आज पुण्यात बंद पाळण्यात आला. डेक्कन जीमखाना ते लालमहाल असा मुक मोर्चाही यावेळी काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांची भेट घेऊन ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगल्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे गौरी भिडे नावाच्या महिलेने ठाकरे कुटुंबावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला ठाकरे कुटुंबीयांनी विरोध केला आहे. त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. मात्र आता सोमय्या यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कंत्राटी कामगार असलेला तरुण बेपत्ता होता. लोखंडी पुलाजवळ मंदिराच्या शेजारी सोमवारी त्याचा मृतदेह आढळला. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३६, रा. मेहरुण परिसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना उमाळ्याच्या जंगलातून ताब्यात घेतले. प्रमोद शेट्टी हा शनिवारी घरी आला नाही म्हणून त्याचे वडील सुरेश शेट्टी यांनी रविवारी एमआयडीसी पोलिसात हरवल्याची तक्रार दिली. सोमवारी सकाळी ११ वाजता निमखेडी शिवारात गिरणा नदीवरील रेल्वे पूल महादेव मंदिराजवळ बकऱ्या चारणाऱ्या तरुणांना मंदिरामागे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती तालुका पोलिसांना दिल्यावर निरिक्षक कुंभार, एलसीबीचे निरिक्षक किसन नजन पाटील व होम…

Read More