जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बेळी गावातील झेंडू जी महाराज संस्थान मध्ये सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थांमधील गोशाळेची पाहणी करून गोमातेची पूजन केले तसेच कुंडलेश्वर महादेव मंदिरात पूजा करून संस्थांना व मंदिराच्या विकासासाठी शासन स्तरावर निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थित त्यांना दिले. झेंडूजी महाराज संस्थान बेळी येथे शनिवारी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. झेंडू जी महाराज संस्थान मध्ये हरिनाम सप्ताह सुरू असून याप्रसंगी पालकमंत्री यांनी भक्तगणाशी संवाद साधून संस्थांमधील गोशाळा याची पाहणी केली. तसेच गोमातेचे पूजन करून क वर्गात असलेली ही गोशाळा ब व वर्गात आणण्यासाठी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगावभुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात १ रुग्णाचा काल दि. २५ रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 3 दिवसांत एकूण 794 चाचण्यांमधून १ रुग्ण आढळला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 13 डिसेंबर रोजी ताप, खोकला व श्वासाचा त्रास जाणवू लागला, त्यांनी दि 20 रोजी एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण हा 6 ते 10 डिसेंबर च्या कालावधीत नेपाळ येथे गेल्याचे समजते. त्यांना सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील १४ जन हे निगेटिव्ह आले आहे.रूग्णांची प्रकृती उत्तम आहे. एचआरसीटी रिपोर्ट २४ आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. या…
पाळधी – येथील सुप्रसिद्ध जीपीएस मित्र परिवार सध्या परिसरात खूप चर्चेत आहे, कारण पण तसेच आहे जीपीएस मित्र परिवार म्हणजे आपुलकी, स्नेह, सामाजिक एकोपा या साठी प्रसिद्ध आहे.ग्रुप साठी कायम झटणारे जीप सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रुपच्या सदस्यांसाठी सुरक्षा विमा कवच स्वतःच्या खर्चाने काढून देत ग्रुप मधील सदस्यांची काळजी कशी घ्यावी याचा प्रत्यय आज दाखवून दिला. अल्पावधीतच पाळधी येथील GPS ग्रुप ने इतके नाव कमविले की परिसरातील नागरिक पण याची दखल घेत आहे. ग्रुप तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव त्यात सर्व सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप असो, नवरात्र उत्सव तर पाळधी परिसरात खूप चर्चिला गेला कारण तरुणी, महिला वर्ग यांच्या कला गुणांना वाव…
प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे नागपूरहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती जळगाव शहर व जिल्ह्यातील विकासाचा ध्यास घेऊन विविध विकास प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे वेळेत काम पूर्ण होऊन लोकार्पण होत आहे. निम्न-तापी-पाडळसे सारखे अनेक प्रकल्प जिल्ह्यात वेळेत मार्गी लागणार आहेत. त्यामुळे नुसतं जळगाव शहराचा विकास होत आहे असे नाही तर संपूर्ण जळगाव जिल्हा बदलतोय, विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे काढले. जळगाव शहराचा विकासाचा…
जळगाव लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडी जवळ जुन्या किरकोळ वादातून एका -२६ वर्षे तरुणाचा कोयता व चॉपर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. या घटनेत इतर दोन जण गंभीरित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अरुण बळीराम सोनवणे (वय-२६) रा.समता नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, अरुण सोनवणे याचे काही दिवसांपासून त्याच परिसरात राहणारे इतर तरुणांसोबत किरकोळ वाद होता. दरम्यान या वादाच्या अनुषंगाने आज सकाळी देखील हा वाद झाला त्यानंतर हा वाद काही…
अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला पारोळा तालुक्यातील बोळे येथून अंत्यसंस्कार साठी जात असताना पिकअप कंन्टेनरचा अपघात झाला. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले आहेत. पारोळा तालुक्यातील बोळे येथील २० ते २५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधी साठी जात असताना त्यांच्या पिकअप गाडीला पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई…
सेवानिवृत्ती निमित्त विद्यापीठ कर्मचारी वर्गाचा विद्यापीठ प्रशासनाकडून केला सन्मान! अकोला प्रतिनिधी: मनीष खर्चे शासकीय, निमशासकीय विभाग तथा खाजगी सेवेतील सेवानिवृत्ती हा कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, मात्र ज्या विभागातील सेवेने आपल्याला मानसन्मान, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक बांधिलकी प्रधान केली आहे त्या सेवेतून निवृत्त होताना आनंदाची तथा दुःखाची संमिश्र भावना कर्मचाऱ्यांचे मनात असते असे सांगताना अतिशय सन्मानाने सेवानिवृत्तीला सामोरे जाणे हे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे आयुष्यातील ध्येय असून तो त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने यांनी केले. कुलगुरू डॉ शरद गडाख यांचे संकल्पनेतून सेवानिवृत्तीला सामोरे जाणाऱ्या विद्यापीठ स्तरीय अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना…
पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जळगाव ग्रामीण मधील ७ पुलांसाठी १२ कोटींच्या कामांना मान्यता ! जळगाव प्रतिनिधी :- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव ग्रामीण मधील ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटींच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ आशियाई विकास बँक अर्थासाहित व नाबार्ड अर्थासहित योजनेतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या कामांना मंजुरी मिळाली असल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री ग्रामसडक…
मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती मुंबई/जळगाव,दि.९ नोव्हेंबर (जिमाका) – जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. मंत्रालयातील वॉर रूम येथे आज मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे,…
गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारी माजविणाऱ्या टोळ्यांच्या सदस्यांना हद्दपार करण्याचा सपाटा सुरु असताना आज पुन्हा तीन सराईत गुन्हेगारांना २ वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानक व रामानंदनगर पोलीस हद्दीत दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अशिल शिवीगाळ करणे, घातक हत्यार्याने दुखापत, दमबाजी करणे असे एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे सदरील टोळीने केले आहे. यात हद्दपार प्रस्ताव क्र. ०४/२०२३ प्रमाणे १) स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर वय १९ रा डीएन सी कॉलेज जवळ शंकर अप्पानगर जाळगांव (टोळी प्रमुख), (२) निशांत प्रताप चौधरी वय १९ रा…

