Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । माहेरून प्लॉट घेण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत या कारणावरून तालुक्यातील बिलवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ४ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिलवाड येथील कविता ऊर्फ भैरवी यांचा काही वर्षापुर्वी शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील लहु देवीदास बागुल यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासू जेठ नणंद यांनी कविता हिस प्लॉट घेण्यासाठी तिच्या माहेरून दीड लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. यासह कविताला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. एके दिवशी कविताला तिच्या पतीने मारहाण करून घराच्या बाहेर काढून दिले पैसे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा नगरातून चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाबा नगर परिसरातून (एम.एच.१९ सी. यु. १७५३) या क्रमाकांचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यास त्यानुसार रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख पोलिस नाईक जितेंद्र तायडे यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी आशाबाबा नगर येथे वाळुची वाहतूक करणार्या संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई केली. एक ब्रास वाळूने भरलेले ट्रॉलीसह ट्रॅक्टर असा दोन लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । आतापर्यंत आपण पतीपासून होणाऱ्या छळ बाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील. परंतू कायद्याने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर अधिक प्रमाणावर होत असल्याचेही अनेक किस्से समोर आले आहे. परंतू एखाद्या पत्नीच्या माहेरच्या मंडळीपासून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या तरूणाने काय मार्ग घ्यावा आता हे तुम्हीच वाचा. धरणगाव पोलीस ठाण्याच्या आवारात अश्याच एका तरूणाने बेमुदत उपोषण सुरू करून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. धरणगाव तालुक्यातील हा तरूण असून पत्नीच्या म्हणजेच सासरच्या लोकांकडून होणारा त्रास कमी होवून न्याय मिळावा, कलम ४९८ चा गैरवापर कमी होण्यासाठी त्यात सरकारने दुरूस्ती करावी व पुरूषांच्या बाजूने कायद्याचे शसक्तीकरण व्हावे. महिलांप्रमाणेच पुरूषांसाठी देखील त्यांच्या होणारा अन्याय दुर करण्यासाठी…

Read More

जळगाव जिल्हा बँकेतर्फे देवकर यांनी मांडली भूमिका नवी मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांचा उहापोह येथे झालेल्या एक दिवसीय परिषदेत करण्यात आला. या परिषदेत बँकांच्या अडचणींवर उपाय योजनाही सुचविण्यात आल्या. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली. सर्व जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद वाशी (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सभागृहात आज (दि. 21) झाली. देशाचे सहकार नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. यावेळी श्री. पवार यांनी जिल्हा बँकेच्या कारभारात संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेत…

Read More

धरणगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सर्वपक्षीय शिवजयंती मोठ्या उत्साहाने व नियमाचे काटेकोर पालन करून साजरी करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले. मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार सर्व जातीधर्माचे मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राजा होणे कोणीच शक्य नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली ती तरुणांनी आचरणात आणावे.ते कधीही जातीपातीचे राजकारण करत नव्हते. देसले साहेबांनी मार्गदर्शन करताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज जुने इतिहासकरांनी त्यांचा जो इतिहास समाजापुढे मांडला समाजापुढे तो इतिहास तसा…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते चोपडा रोडवरील गणेश ऑटोपर्यंतच्या कॉक्रीट रोडचे बंद पडलेले काम त्वरीत सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. काही महिन्यापासून सुरू होते परंतु गेल्या दिड महिन्यापासून प्रमुख रहदारीच्या रस्त्याचे हे काम मक्तेदाराने पूर्णपणे बंद केले आहे अपूर्ण कामामुळे नागरिकांची फार मोठया प्रमाणात गैरसोय होत असून रहदारीस अडथळा निर्माण झालेला आहे व दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत,पुढील काळात अपघात होऊन काही जीवित हानी होऊ नये म्हणून काम त्वरीत सुरू करावे अन्यथा काही जिवीत हानी घडल्यास आपणास जवाबदार पकडले जाईल. तसेच सदरील काम अभियंताच्या निगराणीत उत्तम दर्जाचे घ्यावे ही विनंती…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका ६२ वर्षीय वृध्द व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मराठी गल्ली परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची राजमाता पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला रविवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३वाजेच्या सुमारास आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणी वर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. त्यावेळी चंदुलाल मराठे याने आठ वर्षाच्या मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथील रहिवाशी तुषार पाटील हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी युजीसीमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. त्यांनी जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालयात पदवीचे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे तसेच पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Read More

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा नवीन घर घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजपूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर शहरातील इस्लामपूरा येथील माहेर असलेल्या आसमाबी अझरोद्दिन शेख (वय-२८) यांचा विवाह भुसावळ येथील अझरोद्दीन रईसोद्दिन शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार २०१७ मध्ये झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यानंतर पती अझरोद्दीन शेख याने विवाहितेला माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतू आई वडीलांची परिस्थिती नाजूक असल्याने पैश्यांची पुर्तता करून शकल्या नाही. याचा राग आल्याने पती अझरोद्दीन…

Read More

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पी.आर.हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी यांना बहुआयामी कार्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी याच्या हस्ते धरणगाव भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांची रविवारी होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून हे संमेलन जामनेर येथे संपन्न होत आहे. प्रा. चौधरींच्या रुपाने धरणगावात बालकवींचा वारसा पुढे चालू असल्याचे गौरवोद्गार ना. पाटील यांनी काढले. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या संकल्पनेतून धरणगाव भुषण पुरस्काराची सुरवात करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. या प्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, कबचौउमवीचे सिनेट…

Read More