Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । विशेष लेखा परिक्षक असल्याचे भासवून काजू, बदाम आणि गावरानी तूप प्रत्येकी विस किलो प्रमाणे ड्रायफूटचा एकुण ४३ हजाराचा मुद्देमाल घेवून दुकानदाराची केली आहे. आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हापेठ परिसरातील रसाळ चेंबर्स लेवा बोर्डिंग समोर अजय रतनसी सोनी (वय-५८) हे वास्तव्यास आहे. याच ठिकाणी त्यांचे सोनी ड्रायफूट व जनरल स्टोअर्स नावाचे त्यांचे दुकान आहे. ६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोनी व त्यांचा भाऊ संजस रतनसी हे दोघे दुकानात असतांना कैलास फकिरा बिरारे, रा. पोखरण रोड, ठाणे या नावाचा व्यक्ती आला. शासनाचा विशेष…

Read More

जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील २१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगरातील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील हा तरुण फुले मार्केटमधील एका भांड्याच्या दुकानावर कामाला होता. दरम्यान, घरात कोणीच नसल्याने ज्ञानेश्वर याने घरात छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी त्यालाखाली उतरवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागातील तरूणीचे व्हॉट्सअॅपद्वारे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागातील २२ वर्षीय तरूणीचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तरूणाने एकेदिवशी तरूणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला. यात तरूणाने तरूणीला अंगावरचे संपूर्ण कपडे काढण्यास सांगितले. तरुण जसे सांगेल तसेच तरुणीने त्यास करून दाखविले. हा संपूर्ण प्रकार तरूणाने रेकॉर्ड केला व तयार अश्लील व्हिडिओ त्याच्या मित्राला व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला. या प्रकाराने तरुणीची बदनामी झाली. अशी तक्रार तरुणीने मंगळवार…

Read More

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव प्रतिनिधी । कांचन नगरातील ४८ वर्षीय प्रौढाने कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाच्या ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रमेश सुकलाल राजपूत (वय ४८) रा. काचन नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, रमेश राजपूत हे बुधवारी २ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले होते. अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. यावेळी “मला जरा बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो” असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आत मध्ये गेले. बाकी कर्मचारी हे बाहेर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रामदास कॉलनीतील ओंकारेश्वर मंदीर परिसरात महाशिवरात्री महोत्सवनिमित्त मंगळवार १ मार्च रोजी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन झाले. ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयात सकाळी शिवध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, मेजर नाना वाणी, लताताई भोईटे, धीरज सोनी, अॅङ नितीन चव्हाण, अॅङ अनुराधा वाणी, मधुकर भाई सोनार उपस्थित होते. व्यसनमुक्त, विकारमुक्त समाज घडविण्यासाठी शिवप्रतिज्ञा या प्रसंगी मिनाक्षीदीदी यांनी उपस्थितांना दिली. यावेळी शिव महोत्सवात भगवान शिवाचे भावस्वभाव साकारणारे शिव तांडव नृत्याचे यर्थार्थ नृत्य कु. खुशी हीने या प्रसंगी सादर करुन भाविकांचे…

Read More

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांडे डेअरी चौकात बेकायदेशीर गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपी पवन उर्फ माठ्या केशव गावळे (वय-२४) रा. संभाजी चौक, शिवाजी नगर याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील १५ हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पांडे डेअरी चौकात तरूण हातात गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे यांना गोपनिय माहिती मिळाली. मंगळवार १ मार्च रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पो.ना. विकास सातदिवे, सचिन पाटील, छगन तायडे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना अज्ञात तीन जणांनी दारूच्या नशेत येवून तरूणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सिंधी कॉलनी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-२५) रा. शिकलकर वाडा, शिरोसोली नाका, तांबापूर हा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भोलासिंग बावरी हा सिंधी कॉलनीतील चेतन दास हॉस्पिटलजवळी पान टपरीव मित्र सागर हटकर आणि राम हटकर यांच्यासोबत गप्पा मारत होता. त्यावेळी अज्ञात तीन जणांनी दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना तिघांना भोलासिंगला बेदम मारहाण केली. यात एकाने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने…

Read More

फैजपूर प्रतिनिधी ! शहरातील श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या महिला तलाठीचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाला चोरून नेल्याची घटना उघडकला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, लीना चेतन तळेले रा. खिरोदा ता. रावेर ह.मु. श्रीकृष्ण नगर, फैजपूर ह्या पती चेतन अरूण तळेले यांच्यासह वास्तव्याला आहे. त्या चिनावल येथे तलाठी म्हणून नोकरीला आहे. लिना तळेले यांच्याकडे इतर गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने २६ फेब्रुवारी रोजी फैजपूर येथील घराला कुलूप लावून चिनावल येथे कामाला गेले. अतिरिक्त पदभार असल्यामुळे घरी जाण्यास उशीर होईल म्हणून सासरी…

Read More

यावल प्रतिनिधी । कौटूंबिक कारणावरून संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे सायंकाळी घडली. खून करणारा संशयित पती हा स्वत:हून यावल पोलीसात जमा झाला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) रा. थोरगव्हाण ता. यावल असे मयत महिलेचे नाव आहे.पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवाशी इंदूबाई पाटील ह्या पती प्रकाश पांडूरंग पाटील (वय-६५), विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथे शाळा खोलीच्या बांधकामाचे भूमीपूजन जळके येथील विकासोचे माजी चेअरमन प्रविण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वसंतवाडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच गजमल पवार, युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील, वसंतवाडी तंटामुक्तज्ञ समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण , जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे, जेष्ठ नागरिक बाबु चव्हाण तसेच हंसराज राठोड, रामलाल चव्हाण, प्रविण चव्हाण,ममराज चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. जि.प.सदस्य पवन सोनवणे यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करून शाळा खोलीचे बांधकाम त्वरित सुरू केले. त्यामुळे येथील पालकवर्ग व ग्रामस्थ यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

Read More