राजेंद्र पाटील प्रतिनिधी । शहरातील स्पा सेंटरवर काम करणाऱ्या महिलेवर मालकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरियाणा राज्यातील २८ वर्षीय महिला ही कामाच्या निमित्ताने जळगावात वास्तव्याला आहे. दरम्यान रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोव्हेंबर २०२१ पासून महिला नोकरीला आहे. दत्तू लक्ष्मण माने रा. नाशिक हा स्पा सेंटरचा मालक असून सेंटरमध्ये दिपक बडगुजर आणि पंकज जैन हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. २४ फेब्रुवारी रोजी सेंटरचे मालक दत्तू माने हा नाशिकहून जळगावातील सेंटरवर आला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महिला एकटी असतांना दत्तू माने याने…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
बोदवड – प्रतिनिधी । तालुक्यातील येवती येथे विद्यार्थींनीचा पाठलाग करणाऱ्या रोडरोमिओला भर रस्त्यावर विद्यार्थींनींनी चापलाने चांगलेच चोपले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला बोदवड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील येवती येथील विद्यार्थींनी या रोज जामठी येथे दोन किलोमीटर पायी चालत शाळेत जातात. दरम्यान तालुक्यातील बेटावद खुर्द येथील मुलगा बापू दुमाले हा दररोज मुलींना त्रास देत होता. या संदर्भात विद्यार्थींनींनी शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली होती. दरम्यान हा मुलगा शाळेतील नसल्यामुळे शिक्षकासह विद्यार्थीनींनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानुसार पालकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान मंगळवारी १५ मार्च रोजी ६.४५ वाजेच्या सुमार सर्व विद्यार्थींनी ह्या शाळेत नेहमीप्रमाणे जात असतांना पालकांच्या…
यावल प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून अट्रावल रोडवरील शेतकऱ्याच्या शेतातील २ हजार केळीच्या घड कापून सुमारे ६ लाख रूपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शिवारातील अट्रावल रस्त्यावर असलेल्या डॉ. दिनकर वारके यांच्या मालकीच्या शेतात किशोर देवराम राणे यांनी निम्मे हिस्स्याने शेत केले आहे. या शेतात त्यांनी केळीच्या झाडांची लागवड केली आहे. सोमवार १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या शेतातील केळीच्या २ हजार झाडावरील घड कापून सुमारे सहा लाख रूपयांचे नुकसान केल्याची घटना समोर आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी शेतकरी किशोर…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव-फेसर्डी ग्रुप ग्रामपंचायतीला सहा महिने उलटल्यानंतरही ग्रामसेवक मिळत नसल्याने सरपंचासह ग्रामस्थांकडून सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जळगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नंदगाव-फेसर्डी ग्रुप ग्रामपंचायतीला सहा महिने उलटल्यानंतरही ग्रामसेवक मिळालेला नाही. त्यामुळे विविध विकास कामांसह जन्म दाखला, मृत्यू दाखला, उतारे व विविध घरकुल योजनांची कामे रखडली आहेत. ग्रामसेवक मिळावा यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, ग्राम विस्तार अधिकारी हे ग्रामसेवक नियुक्त केला आहे, असे सांगून वेळ मारून नेत आहेत. गेल्या ४ वर्षांपासून ग्रामपंचायतीचे दप्तर ऑडिटच्या नावाखाली जप्त करण्यात आले आहे. नांदगाव-फेसर्डी ग्रुप…
पाचोरा – प्रतिनिधी । सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, ओझर ता. पाचोरा येथील रहिवाशी किशन पंडित सोनवणे (वय-२७) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळुन घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना घरात कोणीही नसतांना झाल्याने सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. वृद्ध आई, पत्नी व मुली बाहेरगावी गेलेले असल्यामुळे किशन सोनवणे हे घरी एकटेच होते. अतिशय होतकरू व मन मिळावु स्वभाव असलेले किशन सोनवणे हे आपल्या नावे असलेली…
चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे ते चितेगाव दरम्यान येथे ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरण्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहेत. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदलाल रामेश्वर कुमावत (वय 35, रा. तांबोळे बुद्रुक ता. चाळीसगाव) हा आपला कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तांबोळे ते चितेगाव दरम्यान खारमाती येथे ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरण्याच्या कारणावरून त्याच्या गावातील बबलू भगवान कुमावत रा. तांबोळे बुद्रुक ता.चाळीसगाव याने हातातील काहीतरी वेगळ्या वस्तूने नंदलाल कुमावतच्या डोक्यात मारली. यामध्ये नंदलाल याला दुखापत झाली. तसेच मारहाण करून शिवीगाळ केली तर…
जळगाव प्रतिनिधी । मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी गेलेल्या तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील वानखेडे सोसायटी साईबाबा मंदिराजवळ भागात राहणारा शुभम कांतीलाल चव्हाण (वय-२०) हा तरुण पाच मित्रांसोबत रविवार १३ मार्च रोजी दुपारी फोटो काढण्यासाठी कांताई बंधारा परिसरात गेला होता. पाच मित्रांसोबत येत असतांना दोन जणांचा पाय घसरून पाण्यात पडले. यापैकी एकाला या मित्रांनी वाचण्यात यश आले, परंतु पाण्यात पडलेल्या शुभम चव्हाण हा पाण्यात बुडाला नेत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा शोध घेण्याचे काम…
गौरव पाटील प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैश्यांसाठी छळ करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार १२ मार्च रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा रोडवरील भिकमचंद जैन नगरात माहेर असलेल्या ऐश्वर्या रोहन पाटील (वय-२४) यांचा पुण्यातील कात्रज येथील रोहन राजकुमार पाटील यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती रोहन याने लहान लहान गोष्टींवरून टोमणे मारने सुरू केले. त्यानंतर विवाहितेने माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. पैश्यांची पुर्तता विवाहिने न केल्यामुळे पती रोहन, सासू व नणंद यांनी गांजपाठ…
जळगाव – प्रतिनिधी । तालुक्यातील कडगाव शिवारात पोकलँडमधुन डिझेल चोरी करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना गुरुवार १० मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कडगाव शिवारात लिफ्ट एरीगेशन स्कीमच्या पंप हाऊसचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी पोकलंडचा वापर करण्यात येत असून या पोकलँड वर मोहम्मद हसनैन नुरमोहम्मद हा चालक म्हणून कामाला आहे. गुरुवारी १० मार्च रोजी सकाळी मोहम्मद हा पोकलेनच्या टाकीमधून २६ लिटर २ हजार ४७० रुपये किमतीचे डिझेल चोरी करताना मिळून आला. याप्रकरणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरील सिव्हिल इंजिनिअर विवेक मधुकर बेदरकर (वय ४२)…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा शिवारात गावठी हातभट्टीवर तालुका पोलीसांनी धडक कारवाई करत हातभट्टी उध्दवस्त केली आहे. याप्रकरणी दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारातील शेतात बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार ११ मार्च रोजी दुपारी तालुका पाोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी दापोरा शिवारात सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टीवर धाडी टाकल्या. याठिकाणी कच्चे व पक्के रसायन असे एकुण १ लाख २६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाला आढळून आला. यातील दारू बनविण्याचे कच्चे व पक्के रसायन पोलीसांनी…

