Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

पाचोरा प्रतिनिधी । सबसीडी बँकेत अदा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच स्विकारणाऱ्या कृषि सहाय्यक अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने पकडले आहे. कारवाईमुळे पाचोरा कृषी विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील भोजे येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण (महाडीबीटी) योजनेंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर आठ एचपीचे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाल्याने बीसीएस पॉवर ट्रिलर खरेदी करण्यात आले व या योजनेंतर्गत मिळणारी ८५ हजारांची सबसीडीची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल तहसिल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या करीता घंटानाद आंदोलन केले व काळ्या फिती लावुन कामकाज केले कर्मचाऱ्यांच्या शासना कडे प्रलंबीत मागण्या संर्दभात टप्प्या टप्प्याने ओदालन केले जात आहे. पुढील टप्पात २८ मार्च ला संप तर ४ एप्रिल पासुन बेमुदत संप कर्मचारी करणार आहे. राज्यातील महसुल विभागातील महसुल सहाय्यकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त असुन एका महमुल सहाय्यकाको २ ते ३ संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तनावात असुन महमुल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करणेस टाळाटाळ होत आहे. तसेच अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सूत गिरणी भाडेतत्वावर देण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना निवेदन देऊन केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील एकमेव रोजगार असणारी सूतगिरणी ही अनेक वर्षांपासून बंद आहे. दरम्यान सुतगिरणीच्या संचालकांनी निर्णय घेऊन विक्री करण्याचा विचार केला आहे. परंतु सुतगिरणी विक्री न करता ती भाडेतत्त्वावर देण्यात यावी. जेणेकरून यावल शहरातील व तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. यावल शहरातील व तालुक्यातील एकेकाळी वैभव समजल्या जाणाऱ्या शेतकरी हिताचा व कामगारांची सूतगिरणी या मोठ्या प्रकल्पावर मालमत्ता जप्तची वेळ आल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रातील उद्योगतीकडे वाटचाल…

Read More

मुंबई प्रतिनिधी । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयनं महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिलाय. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा, अशी मागणीही सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरु होता. यामुळे एकप्रकारे महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली येथून जवळ असलेल्या शिवारातील शेतकऱ्याच्या घराला अज्ञात व्यक्तींनी भरदिवसा आग लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या सुमारे २ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, गणेश पुंडलिक ठाकरे रा. वाल्मिक नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. शिरसोली येथे त्यांची शेती असून शेताच्या बाजूलाच राहण्यासाठी घर आहे. त्याठिकाणी गणेश ठाकरे यांचे आई वडील राहतात. गणेश ठाकरे यांचे भाऊ यांचे १७ मार्च रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने आई वडील हे जळगावात आले होते. शिरसोली येथील घर बंद होते. यादरम्यान २३ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रोजी अज्ञात…

Read More

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गारवा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातप्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गोकूळ उर्फ आण्णा सुकलाल अडकमोल वय 38 रा. नवनाथ नगर,वाघनगर जळगाव, असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गोकूळ अडकमोल रा. नवनाथ नगर, वाघनगर हा कुटुंबासह वास्तव्यास होता. तो जळगाव भुसावळ मार्गावर खाजगी प्रवासी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. १८ मार्च रोजी धुलिवंदन असल्याने गोकूळ मित्रासोबत त्याच्या मूळ गावी नशीराबाद गेला होता. तेथून एकटा हॉटेल गारवा येथे आला. याठिकाणी रात्री ११ वाजेच्या सुमारास महामार्गावर पायी चालत असतांना अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत त्याचा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । मोहाडीरोडवर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीच्या मागे असलेल्या सुजय गणेश सोनवणे (वय१३) रा. मोहाडी ता.जि.जळगाव या मुलाचा चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घटनाच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेवून प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत माहिती अशी की, सुजय सोनवणे हा मुलगा आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान सेंट टरेसा शाळेतून घरी जात होता. त्यावेळीगावाजवळ असलेल्या उताराजवळ (एमएच २८ बी ७७०३) या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या (एमएच १९ डीएम १११) या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, गणपतीनगरातील किराणा व्यावसायिक प्रकाश भिला वाणी (वय ६४) हे १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा अमित वाणी याच्यासोबत त्यांच्या (एम.एच.१९ बी.एफ.१५९९) क्रमांकाच्या दुचाकीवरून गावात आले होते. काम आटोपल्यावर घरी चित्रा चौकातून शिवाजी महाराज पुतळ्याकडे जात असताना भोरटके झेरॉक्स सेंटर समोर त्यांच्या दुचाकीला (एम.एच.१९.ए.पी.२४४८) या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रकाश वाणी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथून अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीचे लोंखडी अँगल व प्लेटा चोरून नेले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील मोकळ्या जागेवर लोखंडी ॲगल आणि लोखंडी प्लेट व इतर बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. हा सामान ७ मार्च ते १७ दरम्यात तिथेच पडून होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीचे लोखंडी प्लेटा आणि लोंखडी अँगल असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुभम किशोरराव चिमोटे (वय-२६) रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ भुसावळ यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी कार्यरत असणारा दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या सर्व कर्जदारांना मार्चअखेर कर्जभरणा करण्यासाठी आवाहन केले आहे. जळगाव जिल्ह्यात दगडी बँक अर्थात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी मार्च अखेर पर्यंत कर्जभरणा करण्याची साठी बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आला आहे. शिवाय तसेच बँक कर्ज भरण्यासाठी दि. २६ व २७ मार्च या सुट्टीच्या दिवशीदेखील बँकेच्या सर्व शाखा सुरु राहणार आहेत. तरी सर्व कर्जदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज भरणा वेळेत करुन, बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन जेडीसीसी बँकेमार्फत करण्यात आले आहे.

Read More