Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील विवाहितेला पैश्यांसाठी शिवीगाळ करून मारहाण करत छळ केल्याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या पूजा रोहित बारगळ (वय-२४) या तरुणीचा विवाह नाशिक येथील रोहित कृष्णा बारगळ याच्याशी झाला. विवाहितेला माहेरहून २ लाख रुपये घरखर्चासाठी आणावे, अशी मागणी रोहित बारगळ याने केली. पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. ननंद, सासू आणि नंदोईभाऊ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता या आडगाव येथे माहेरी निघून आल्या. दरम्यान कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथून तरूणीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, मेघना चैत्राम पाटील (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या तरूणी आपल्या कुटुं‍बियांसह वास्तव्याला आहे. रविवारी २७ मार्च रोजी सकाळी मेघना पााटील ह्या कामानिमित्त मेहरूण येथील महाजन नगरातील बंगाली गल्लीत गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यांनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला परंतू कुठेही मोबाईल आढळून आला नाही. मेघना पाटील यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी…

Read More

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली विकासोच्या पंचवार्षीक निवडणुकीत विद्यमान चेअरमन राकेश फेगडे यांचे संपुर्ण पॅनल विजय झाली. कोरपावली ग्रामपंचायती कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवड झालेल्या सर्व सदस्यांनी एकच जल्लोष केला होता. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीय निवडणूक रविवार २७ मार्च रोजी दुपारी राबविण्यात आली. पंचवार्षीक निवडणूकीत विद्यमान चेअरमन राकेश फेगडे यांच्या भाजपा प्रणित पॅनलचे संपुर्ण उमेदवार विजयी झाले आहे. यात फेगडे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे. यावेळी प्रतिस्पर्धी पॅनलचे नेतृत्व करणारे माजी सरपंच तथा कॉग्रेसचे सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांच्यासह सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. निवड…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जाखणी नगरात बंद घर फोडून २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंगी आकाश दहियेकर (वय-३०) रा. सिंधी कॉलनी जवळ, जाखणीनगर, कंजरवाडा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवार २५ मार्च रोजी रात्री शिंगी दहियेकर यांचे घर बंद असतांना संशयित आरोपी सोनु जगदीश बावरी, मोनूसिं जगदीश बावरी, भोलासिंग जगदीश बावरी रा. शिरसोली नाका, तांबापुर या तिघांनी शिंगी दहियेकर यांचे बंद घराची कडी खोलून आत प्रवेश करत घरातून ५० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम सोन्याची चैन चोरून नेली आहे. यासंदर्भात शिंगी यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील देशीदारूचे दुकान फोडून चोरट्यांनी २ लाखांची रोकड चोरून नेली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील गजानन बाबा कॉलनीत नितीन शामराव तायडे यांच्या मालकीचे देशी दारूचे गोडावून आहे. शुक्रवारी २५ मार्च रोजी दिवसभर काम करून त्याचे सहकारी भुपेश प्रकाश कुळकर्णी रा. देवेंद्र नगर यांनी दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे दुकानाचे गोडावून फोडले व गल्ल्यातील सुमारे २ लाख १५ हजार ५१० रूपयांची रोकड लांबली. दुकानातील कामगार पवन सुभाष चव्हाण हा शनिवार २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता कामावर गेला…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात २९ ते ३१ मार्चतीन दिवसाच्या कालावधीत हवामान विभागाने उष्णता लाट असल्याबाबतचा इशारा दिला आहे. जिल्हावासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रविवारी २७ मार्च रोजी दुपारी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची दहकता वाढली असून मार्च माहिन्याच्या अखेरीस म्हणजे २९, ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात उष्णता लाट असल्याचा इशारा हवामान विभागाने जळगाव जिल्हा प्रशासनाला दिले आहे. नागरीकांनी काळजी घेतांना काय करावे आणि काय करू नये याबाबत सांगण्यात आले आहे. यामध्ये १. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. २. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. ३. बाहेर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । लग्नाच्या कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या इंद्रप्रस्थ नगरातील छायाचित्रकार धनराज उर्फ विक्की प्रकाश चव्हाण (वय-३२) या तरूणाचा नाशिक-मालेगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ठार झाल्याची घटना शनिवारी २६ मार्च रोजी सकाळी ५ वाजता घडली त्यांचा अपघात झाला. याबाबत माहिती अशी की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी धनराज चव्हाण हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा छायाचित्रकार असून त्यांचे क्षण फोटो स्टुडिओचे नावाने दुकान आहे. त्यांना नाशिक येथील लग्नाची ऑर्डर असल्याने ते आपल्या लहान भावासह काही सहकार्‍यांसोबत आपल्या चारचाकीने नाशिक येथे शक्रवारी २५ मार्च रोजी गेले. ऑर्डर झाल्यानंतर काम आटोपून ते शनिवारी २६ मार्च रोजी मध्यरात्री नाशिकहून निघाले. दरम्यान पहाटे ५ वाजेच्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको येथे शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी प्रेमसंबंधावरून तरूणाचा निर्घृण खून करणाऱ्या संशयित आरोपी आकाश सखाराम सोनवणे (वय-२५) रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव याला गेंदालाल मील परिसरातून अवघ्या काही तासात पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी नरेश आनंदा सोनवणे (वय-२८, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) या तरूणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशनशहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. शनिवारी २६ मार्च रोजी…

Read More

यावल प्रतिनिधी । शहरातील भोईटे वाडा चौकात तरूणाला दोन तलवार आणि कुकऱ्यासह यावल पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे यावल शहरात खळबळ उडाली आहे. तरूणाच्या ताब्यातील तलवारी आणि कुकऱ्या हस्तगत केल्या आहे. यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील भोईटे वाडा चौकात एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार असलम खान दिलावर खान, भूषण चव्हाण, सुशील घुगे, राजेश वाडे आणि निलेश वाघ असे पथक तयार करून त्यांना रवाना केले. शुक्रवारी २५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या…

Read More

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली शिवारातील शेत लावलेल्या केळीच्या बागेचा अचानक आग लागल्याची घटना शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी घडली. या आगीत ठिंबक नळ्यासह केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील शेतकरी बाळू पंडित पाटील यांच्या केळीच्या बागेला अचानक आग लागली. ही घटना शनीवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत ठिबक नळ्यासह कापणीला आलेले केळीचे घड जळून मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे निर्दशनास येताच भरत अशोक चौधरी, प्रकाश चौधरी, भागवत यादव महाजन, अशोक बाबुराव चौधरी, अमोल नेहेते, कलींदर तडवी, हुसेन पिंजारी, पूर्वेश चौधरी यांनी आग आटोक्यात आणली. आग…

Read More