जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील राजाराम मंगल कार्यालयात नवजीवन शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामुहिक व्रतबंध सोहळा मंगळवारी १२ एप्रिल रोजी सकाळी घेण्यात आला. याबाबत माहिती अशी की, नवजीवन शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २०२० मध्ये करण्यात आली असून समाज हितासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येते. दरम्यान शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील राजाराम मंगल कार्यालयात मंगळवारी १२ एप्रिल रोजी सामुहिक व्रतबंध सोहळा घेण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हास्तरावर घेण्यात आला असून या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या ठिकाणातील तेरा बटुंची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय जोशी, कृणाल अत्रे, आनंद जोशी, विवेक जोशी, दिपक काळे, देवा काळे, केतन काळे यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवरांनी परिश्रम…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांना विजपुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांना किमान ८ तास अखंडीत विजपुरवठा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करून आणि वेळोवेळी निवेदन देवून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान तीन दिवसांपुर्वी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भेटून तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करावा या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पुर्तता झाली नाही व मागण्यांकडे प्रशासन आणि महाविकास आघाडी दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना विजपुरवठा सुरळीत करावा आणि इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने…
जळगाव प्रतिनिधी । महाबळ रोडवर असलेल्या समाज कल्याण विभागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या अंतर्गत रक्तदान शिबीर उद्घाटन करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक, आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सोमवारी ११ एप्रिल रोजी महाबळ येथील समाजकल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सहकार्याने व पोलीस प्रशिक्षणार्थी प्रमुख सोपान पाटील यांच्या पथकातील…
धरणगाव प्रतिनिधी । जलजीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून मुसळी येथे याच योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. ही पाणी पुरवठा योजना मुसळी गावाला नवसंजीवनी प्रदान करेल असा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जल जीवन मिशन योजने अंतर्गत मुसळी येथे ७६ लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचा व ३२ लाखाच्या गावंतर्गत विविध विकास कामांचा असा एकूण १ कोटी च्या कामांचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपण परिसरातील विकासकामांना प्रचंड…
पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचोरा शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी सकाळी गल्लीतील गणेश पाटील या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात व नातेवाइकांकडे शोधाशोध केली. परंतु मुलगी कुठेही मिळून आले नाही, अखेर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गणेश पाटील या मुलाविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.
वरणगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारे ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी संदीप लखीचंद बनवे (वय-३८) हा तरुण ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्यावर अतिप्रसंग करत जबरदस्ती प्रयत्न करू लागला. तिने हटकले असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला धमकी दिली. याप्रकरणी महिलांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी संदीप लखींचेद बनवे याच्या विरोधात तक्रार दिली आहे.…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या कारवाईने अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. आज कारवाईच्या दुसऱ्या दिवशी देखील पोतोडी शिवारात गावठी हातभट्टी उध्दवस्त केली संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी नुकतीच बदली करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यात सुरू असलेले अवैध धंद्यांवर अंकूश लावण्यासाठी कारवाईचा बडगा उठविला आहे. दरम्यान रविवारी तीन ठिकाणी कारवाई केल्यानंतर आज सोमवारी ११ एप्रिल रोजी दुपारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोतोडी शेत शिवारात सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास स्वत: पो.नि. शेकळे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहू बोरकर, पोहेकॉ संतोष चौधरी, गणेश मनुरे, पोना…
जळगाव प्रतिनिधी । जोशीपेठेतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ३० हजाराची लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे. शहरातील जोशी पेठ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने अर्ज केला होता. या कार्यालयातील शिपाई गोपाळ कडू चौधरी, (वय-५५) रा. जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेज, जळगाव याने आपले कार्यालयातील वरिष्ठांशी घनिष्ट संबंध असल्याची बतावणी करत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. व नोकरी लावून देतो असे सांगून २ लाख १० हजाराची लाचेची मागणी केली. पहिल्या टप्प्यात सोमवारी ३० हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी कारवाईचा धडका लावला आहे. तालुक्यातील अंतुर्ली, नारवेल शेत शिवारातील गावठी हातभट्टीवर कारवाई करत सुमारे १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, नारवेल शेत शिवारात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार होत असल्याची गोपनिय माहिती नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार दोन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी बोरकर, मनुरे मेजर यांच्या इतर १० पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी १० एप्रिल रोजी दुपारी अंतुर्ली व नारवेल शेत शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून सुमारे १ लाख ६५ हजाराचा…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नांदेड ते रोटवद फाटा दरम्यान भरधाव कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालक जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवाशी असलेले पाच तरूण (एमएच १२ एफवाय ०९८८) धरणगावकडून चोपडाकडे जात असतांना चालक भैय्या मधूकर बारी (वय-२४) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चालक भैय्या बारी हा जागीच ठार झाला तर इतर अनिल विठ्ठल बारी (वय-२४), प्रसाद रामदास गुरव (वय-१९), मोना सुनील चौधरी (वय-१८), सुभाष रामलाल भगत (वय-१९) सर्व रा. शेंदुर्णी ता. जामनेर चौघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जळगाव…

