जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील बसस्थानकाजवळील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील बसस्थानकाजवळ स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम आहे. रविवारी ३ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने विटनेर रस्त्यावर पुलाच्या पुढे पंचर दुकानाजवळ दुचाकी पार्क करू लावली. त्यानंतर त्याने स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू गावातील नागरीकांना चोरीची चाहूल लागल्याने अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. याबाबत जळके येथील पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. दरम्यान काही दिवसांपूवी वसंतवाडी गावातून विद्यूत उपकेंद्राजवळ गुरे चोरून नेणारे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
बोदवड प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यासाठी आठ हजाराची लाच प्रकरणात बोदवडचे तहसीलदारांसह चार जणांना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोंपे (32, रा.केअर ऑफ के.जे. पाटील संताजी नगर, मुक्ताईनगर, मूळ रा.शिवकृपा निवास, शारदा नगर, देगलूर, जि.नांदेड), तहसीलदारांच्या वाहनावरील चालक अनिल रावजी पाटील (51, रा.चिखली, ता.बोदवड), बोदवड तलाठी मंगेश वासुदेव पारीसे (31, रा.राजा चंद्रकांत सोसायटी, बोदवड) व खाजगी पंटर शरद समाधान जगताप (25, रा.रूप नगर, बोदवड, ता.बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाळू वाहतूक करणारे ढंपर २६ मार्च रोजी बोदवड तहसीलदारांनी बोदवड तालुका हद्दीतील…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शास्त्री टॉवर चौकात महागाईच्या भस्मासुराची प्रेतयात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भारतात प्रत्येक दिवसाआड पेट्रोल व डिझेल सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे शेतकरी, महिला वर्गाचे जीवन जगणे खूप कठीण झाले आहे. त्यातच घरगुती गॅससह व्यवसायिक गॅसचे दर देखील जास्त प्रमाणावर वाढ झाली आहे. जणू काही केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेला मारण्याची सुपारी घेतली आहे. म्हणून महागाई विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी आणि गेंड्याच्या कातडीचे केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या भस्मासुराचा प्रेतयात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. जळगाव ग्रामीण…
जळगाव प्रतिनिधी । गांधी मार्केट मधील कपड्याचे दुकान मध्यरात्री चोरट्यांनी फोडून ४५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, स्वप्निल संजय भोई (वय-२०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांचे महात्मा गांधी मार्केट येथे फंकी बॉईज नावाचे कपड्याचे दुकान आहे. कपड्याचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ मार्च रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी ६ वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान आज १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान फोडल्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी तातडीने गांधी मार्केट येथे येऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी शटरची खालची पट्टी तोडून आत प्रवेश करत…
यावल प्रतिनिधी । इंधन दरवाढच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने यावल पोलीस ठाण्याच्या समोर महागाईमुक्त भारत आंदोलन व मोदी सारकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने पाच राज्यात निवडणूक सुरू असतांना पेट्रोल- डिझेल व गॅस यांची दरवाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसाधारण व्यक्तींचे कंबरडे मोडले आहे. बेजबाबदार व अर्थहीन शासन कारभाराने संपूर्ण देशाला वेठीस धरले असून जिवनावश्यक वस्तूंपासून ते पेट्रोल-डीझेल, गृहणीचे स्वंयपाक गॅस या प्रत्येक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. या महागाईच्या विरोधात यावल पोलीस ठाण्याच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जिल्हा नियोजन समिती…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील नूतन वर्षा कॉलनीतील बंद घर फोडून रोकडसह सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याबाबत गुरूवार ३१ मार्च रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती श्रीकृष्ण मुजुमदार (वय-६०, रा. नूतन वर्षा कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १२ मार्च रोजी त्या घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घर बंद पाहून संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या व शिक्के आणि १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.…
जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढ विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनासमोर वाहनांची अंत्यसंस्कार विधी करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस डॉ…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथून एकाची रिक्षा चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार ३० माच रोजी जळके येथून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरी रिक्षा जप्त केली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल वाल्मिक सोनवणे (वय-२९) रा. जळके ता. जि. जळगाव हे रिक्षाचालक असून त्यांची रिक्षा (एमएच १९ एक्सू ७५४४) रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी त्यांची रिक्षा घरासमोर पार्क करून लावलेली असताना संशयित आरोपी राहुल भरत जाधव (वय-२४) रा. वराड ता.जि. जळगाव याने काहीही न सांगता घरासमोर लावलेली पार्किंगला…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. के. जी. कोल्हे सिनेट सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी वाघुळदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियंका ब-हाटे, डॉ. राजकुमार लोखंडे हे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकातून प्रा. प्रियंका ब-हाटे यांनी रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. रॅगिंग झाली तर विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्या संदर्भात…
जळगाव प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथून चोरी करण्यात आलेले जेसीबी मशीन विकत घेणा-यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्याला पुढील तपासकामी जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नंदलाल उर्फ करण राजेंद्र मोर्या रा. ऑटो नगर अशोक नगर, जळगाव असे जेसीबी विकत घेणाऱ्या संशयिताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी देवराज गजेबा सोनसाळे यांच्या मालकीची ७ लाख रुपये किंमतीची जेसीबी चोरी झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी उघडकीला आली होती. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान चोरीस गेलेले जेसीबी हे जळगावात विक्री…

