जळगाव प्रतिनिधी । तांबापूरा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । तरसोद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खान्देश अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटीच्या थकबाकीदारांना निवडणूकीस अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी तक्रारदार अनिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खान्देश अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी जळगाव यामधील थकबाकीदार तीन कर्जदार यांनी सोसायटीमधून कर्ज घेतले आहे. परंतू अद्यापपर्यंत मुद्दल रकमेसह व्याजाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. यात किशोर भाऊराव पाटील, अशोक रूपसिंग अलकरी आणि छायाबाई अशोक अलकरी यांचा समोवश आहे. तिघांना तरसोद विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीसाठी अपात्र करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार अनिल संभाजी पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी…
जळगाव प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोरून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश दिवानचंद वलभाणी रा. सीटी कॉलनी, चेतनदास मेहता हॉस्पीटल समोर जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान ते शहरातील भाऊंचे उद्यानासमोर दुचाकी (एमएच १९ बीपी ६६६०) ने आले होते. त्यावेळी उद्यानासमोर दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून लंपास केल्याचे उघड झाले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. बुधवार ६ एप्रिल रोजी सकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर – बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरून गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या वरणगावातील तरुणाला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. अनुराग लक्ष्मण सूनगत वय 20 राहणार वरणगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी क्वार्टर वरणगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहितीवरून कारवाई जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत हा तरुण हातात गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. मंगळवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत (वय-२०) रा.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील दादा वाडी येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, कविता भगवान पाटील (वय-४५) रा. दादा वाडी जळगाव ह्या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ३ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास लहान मुलांचे खेळण्याच्या कारणावरून भांडण झाले. या कारणावरून लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कविता पाटील यांना लक्ष्मी विनोद (पुर्ण नाव माहित नाही.) यांनी तोंडावर चप्पल मारली व शिवीगाळ करून मारहाण केली. यात कविता पाटील ह्या जमीनीवर पडल्याने त्यांच्या डोक्यालाख मुक्का मार बसला आहे. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर रेल्वेउड्डाण पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून ठेकेदारावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी नगर रेल्वेउड्डाण पुलाचे बांधकाम आला गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. या कामास फक्त १८ महिने कालावधी देण्यात आला होता, परंतु सव्वा तीन वर्षात ही सदर पूल वाहतुकीसाठी मोकळा झालेला नाही. आज काल तर कोणी येऊन मक्तेदाराला मुदतवाढ देऊन मोकळा होत आहे. सदर मक्तेदार राजकीय दबाव वापरून काम पूर्ण करण्यास वेळ काढून धोरण अवलंबून वेगवेगळी कारणे देत आहे. वास्तविक या ठेकेदाराला कोणत्याही कामाचा पूर्वानुभव नाही, आणि शर्ती व अटीचा भंग…
भडगाव प्रतिनिधी । बसस्थानक परिसरात एटीएम कार्डच्या मध्यमातून शेतकऱ्याकडून पीनकोड विचारून ४० हजार रूपये लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, भगवान गिरधर पाटील (वय-६०) रा. शिरसमणी ता. पारोळा जि.जळगाव हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ५ एप्रिल रोजी कामाच्या निमित्ताने ते भडगाव शहरात आले होते. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास भडगाव बसस्थानकासमोरील ॲक्सीस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात तीन जन एटीएम जवळ आले. त्यांनी शेतकऱ्याचे कार्ड गोडबोलून अदलाबदली करून घेतले. त्यावेळी त्यांनी कार्डचा पासवर्ड विचारून घेतला. अज्ञात भामट्यांनी एटीएम कार्ड व पासवर्ड वापरून…
जळगाव प्रतिनिधी । शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावेळी शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याबाबत माहिती अशी की, अवचित काळू तायडे (वय-४६) रा. समता नगर, जळगाव यांची सोमवारी ४ एप्रिल रोजी दुपारी अचानक प्रकृती खालवली. डाव्या बाजूने पॅरालिसीस सारखा त्रास होत होता. नातेवाईकांना त्यांना तातडने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रात्री ११ वाजता रूग्णालयात उपचार सुरू असतांना अवचित तायडे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काळे याचा मृत्यू झाला आहे असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असुन संबंधितांवर…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत विशेष उपक्रम मुले व मुली व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन ४ एप्रिल २०२२ रोजी उद्घाटक सामाजित कार्यकर्ता भालचंद्र शंकर चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी व व्याख्याते डॉ. स्नेहल फेगडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियंका ब-हाटे , डॉ. राजकुमार लोखंडे हे उपस्थित होते. ४ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत १० व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जातीय…

