जळगाव प्रविण पाटील । जळगाव तालुक्यातील जळके येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण करीत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील विकासोची पंचवार्षिक निवडणूकीनंतन मंगळवारी ७ जून रोजी सकाळी चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी निवडणूक विकासो कार्यालयात सहाय्यक सहकारी अधिकारी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यात चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त संचालक जगन्नाथ पाटील, सुमित्राबाई चव्हाण, चंद्रशेखर पाटील, भागचंद जैन, अर्जुन पाटील, आधार पाटील, पंडित राखुंडे, आधार पटवळे, अशोक पाटील, इंदुबाई पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण व ताराचंद पवार हे उपस्थित…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
अध्यक्षपदी विरेंद्र एस. सोनकांबळे तर उपाध्यक्षपदी कांचन पी. वाणीधरणगाव (प्रतिनिधी ) – येथील धरणगाव तालुका तलाठी संघटनेची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी विरेंद्र एस. सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ३ रोजी नुकतीच दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्रविण मधुकर बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव तालुका तलाठी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.. नवनियुक्त कार्यकारिणी खालीलप्रमाणे अध्यक्ष – विरेंद्र एस. सोनकांबळे, उपाध्यक्ष – श्रीमती कांचन पी. वाणी,सचिव- सचिन आर. कलोरे, कोषाध्यक्ष- राहूल एस ढेरंगे, सल्लागार- भरत आर. पारधी सह सल्लागार- अविनाश पी. पाटील संघटक-लक्ष्मीकांत व्ही. बाविस्कर महिला प्रतिनिधी- श्रीमती ज्योती के. लोखंडेसभासद – महेंद्र आर. वंजारी,अलताब एन पठाण,आरिफ एस. शेख,…
धरणगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पाळधी येथील निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र महाजन, गटनेते विनय (पप्पू भावे), मोतीआप्पा पाटील, मोहन महाजन, विलास महाजन, प्रशांत देशमुख, भैय्या महाजन, राहुल रोकडे, लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे संपादक गौरव पाटील, महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक प्रविण पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावचे साधारण कुटुंबातील शिवसैनिक ,प.स सदस्य ,आमदार ,जिल्हा प्रमुख , उपनेते , कॅबिनेट मंत्री पालकमंत्री असा प्रवास करणारे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असलेले खान्देशची मुलुख मैदान तोफ गुलाबरावजी पाटील यांचा ५ जून हा जन्म दिवस असल्याने सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! एका साधारण गरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती कॅबिनेट मंत्री पदी थेट विराजमान होतो हे अनेकांना तोंडात बोटे घालणारा विषय जरी असला तरी आपल्या अंगीभूत असलेल्या हजरजबाबीपणा आणि सडेतोड उत्तर देण्याची लकब प्राप्त असलेल्या गुलाबरावांना कोणी त्यांच्या ध्येय पासून रोखू शकले नाहीत. त्यांनी अनेकांशी ,’पंगा’ , घेतला असेल पण तो त्यांचा शिवसैनिकी बाणा होता. राजकारणापलीकडे मैत्री जोपासणारा नेता…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक २०२२ अंतर्गत ७७ गट व १५४ गण यांची प्रारूप प्रभाग यादी जाहीर करणत आली आहे. यासंदर्भात हकरती असतील त्यांनल जिल्हाधिकारी कार्यालयात ८ जून रोजीच्या पुर्वी दाखल करण्यात यावे. याची सुनावणी विभागिय आयुक्त यांच्या कडे १० जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. जिल्हा परिषदगट क्रमांक गटाचे नाव । ग्रामपंचायतींची संख्या । एकूण समाविष्ट गावे चोपडा तालुका१ विरवाडे १३ २४२ अडावद ८१ ६३ अकुलखेडा १७ २२४ लासुर १५ १९५ चहार्डी १६ १८६ वर्डी २१ २५ यावल तालुका७ किनगांव बु ९ १३८ दहिगांव १२ १९९ न्हावी…
जळगाव प्रतिनिधी । एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीने नोटीस बजावली असून पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस असल्याचे समजते. देशात सध्या ईडीचाच बोलबाला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात देखील महाविकास आघाडीचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काही दिवसांपूर्वीच ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागले होते तर खडसेंचे जावई यांना ईडीने अटक केली होती. नुकतेच एक मोठी बातमी समोर येत असून एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीने नोटीस बजावली असून…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामनगरात सट्टा जुगार खेळविणार्या तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून २ हजार ४९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामनगर परिसरात सट्टा जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना पोउनि रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील यांना दिल्यात. त्यानुसार बुधवार १ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पथकाने रामनगर परिसरात सट्टा व जुगार खेळविणार्यांसह खेळणार्यांवर धाड टाकली. याठिकाणाहून पळून जात असतांना रंगनाथ रमेश वाणी (वय-४३, रा.…
धरणगावात शिवसेनेचा मेळावा उत्साहात : आगामी निवडणुकांसाठी फुंकले रणशिंग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथील श्रीजी जिनींगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयोेजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले त्या भाजपच्या खासदारांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याचे सांगत याचे योग्य वेळी उत्तर दिले…
पोकरा योजनेच्या संबंधित अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी गौरव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुक्यातील सोनवद परिसरातील गावांना असलेल्या पोकरा योजनेअंतर्गत असलेल्या अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे तातडीने अधिकार्याची नेमणूक करून प्रस्तावित असलेल्या प्रकरणे मंजूर करण्याची मागणी परिसरातून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पष्टाणे, अनोरा, धानोरा, गारखेडा, बाभळे, उखळवाडी, भामर्डी या ठिकाणी शासनाच्या पोकरा योजनेअंतर्गत कंपनीच्या उमेदवारांचे नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे हवे त्या साहित्याची ऑनलाइन पद्धतीने मागणी करावी लागतात, त्यानंतर कंपनीचे अधिकारी शेतात येऊन त्या ठिकाणी शेतातील फोटो काढून पूर्वसंमती देतात. त्यानंतर शेतातील लागणाऱ्या साहित्यांची खरेदी…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कारागृहात नेत असतांना पोलीसांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला कैदी महेश शिवदास दीक्षे (वय-३०) रा. लोणी बुद्रुक ता. रिसोड जि. वाशिम याला अटक करण्यात आले होते. पुढील कारवाईसाठी कैद्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुरुवारी 19 मे रोजी भुसावळ येथून जळगाव येथील जिल्हा कारागृहात ट्रान्स्फर होण्यासाठी भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पो.कॉ. ईश्वर संजय भालेराव शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात दुपारी १२ वाजता आणण्यात आले होते. कैदी महेश…

