Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मीतीसाठी संदेश देण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. शनिवारी ७ मे रोजी सकाळी स्वाक्षरी मोहीमेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्यात सध्या भोंग्यांचा विषय चांगलाच गाजत आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस मुख्यालयासमोर जळगाव जिल्ह्यात सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मीतीसाठी संदेश देण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार आहे. ही स्वाक्षरी मोहिम शनीवार ७ मे रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया,…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील। जळगाव तालुक्यातील लमांजन, वाकडी कुऱ्हाडदे या तिन्ही गावांची गृप ग्रामपंचायत कार्यालयात लमांजन येथे आहे. या ग्रामपंचायतीवर नऊ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. या संचालक मंडळातील लमांजन येथील सदस्यांनी करभरणा मुदतीत केला नसल्याने त्यांना अपात्र करणेबाबत तक्रार जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे ग्रामस्थांनी तक्रार दिली आहे. ग्रामस्थ गोरख धोंडु पाटील, प्रदिप कैलास पाटील व इतर ग्रामस्थ यांनी अर्जाद्वारे २७ एप्रिल रोजी केली आहे.दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे या तिन्ही गावांची गृप ग्रामपंचायत कार्यालयात लमांजन येथे आहे. या ग्रामपंचायतीवर ९ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. या संचालक मंडळातील लमांजन येथील सदस्यांनी करभरणा…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील :शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनी अंशिता गायकवाड हिची नॅशनल ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. शनिवारी ३० एप्रिल रोजी प्राचार्या गौरी राणे यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. जळगाव तालुक्यातील विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण गायकवाड यांची कन्या अंशिता गायकवाड ही विद्यार्थींनी बेंडाळे महिला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी ३० एप्रिल रोजी तिची राजस्थान येथील उदयपूर येथे होणाऱ्या ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१-२२ साठी कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे महाराष्ट्र संघात निवड झाली असून ती आता राज्याचे नेतृत्व करणार आहे. अंशिताच्या निवडीबद्दल बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे, स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख अनिता…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील : जळगाव तालुक्यातील लमांजन येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची शनिवार ३० एप्रिल रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. लमांजन उपसरपंचपदासाठी निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राधाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ३० एप्रिल रोजी सकाळी घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय बागुल यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी रतीलाल सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागुल यांनी घोषीत केले. याप्रसंगी कमलबाई पाटील, सुमन पाटील, बेबा सोनवणे, सुनीता मोरे, दादा पाटील, महादु पाटील, हिरामण कोळी, रमेश गुंजाळ, बबन आप्पा, राजु धनगर, सुकदेव पाटील, गोरख पाटील यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज | धरणगाव शहरात रमजान ईद निमित्त दिव्यांग मुस्लिम बांधवांना रेशन किट वाटप करण्यात आले. रमजान ईदचे औचित्य साधून दिव्याग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम दिव्याग बांधवांना रऊफ, अस्लम पठाण नजराणा मेहबूब, परवीन हैदर, फातेमा फतू, आरिफ खान यांना एका महिन्याचे रेशन किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, संजय निराधार समितीचे अध्यक्ष तहसीलदार नितीनकुमार देवरे, दिव्यांग महा संघटनेचे संस्थापक पी.एम.पाटील, विलास पवार, चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे यासह इतरांची उपस्थिती होती.

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील लंमाजन, वाकडी, कुराडदे ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीच्या घोटाळ्यासह सतत गैरहजर राहणाऱ्या ग्रामपंचात सदस्यांना अपात्र करण्याचे निवेदन मंगळवारी २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील लंमाजन, वाकडी, कुराडदे या गावाच्या ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा सरपंच व उपसरपंच यांना अधिकार नसतांना धनादेशद्वारे गैरव्यवहार करण्यात आले आहे. या ग्रामसेवक व शिपाई यांनी खोट्या सह्या करून अपहार केला आहे. लमांजन गावातील ग्रामपंचायतीचे तीन सदस्य, वाकडी गावातील ३ सदस्य आणि कुऱ्हाडदे गावातील तीन सदस्य असे एकुण ९ ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत कर भरणा केला नाही…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस स्थानकातील शोध पथकातील पोलिस नाईक किशोर पाटील व पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील हे मंगळवार २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अजिंठा चौकात पेट्रोलिंग करत असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (वय-२५) रा. गोहरी ता.जामनेर ह. मु. कमल पॅराडाईज मंगल कार्यालय, जळगाव हा दुचाकी घेऊन संशयास्पद हालचाल करत असतांना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन…

Read More

जळगाव प्रतिनिधी ।शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घर फोडून घरातील लाखो रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांनी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनीतील साधना आश्रमजवळील कंवरनगरातील रोहीत इंद्रकुमार मंधवानी हे कुटुंबियांसह त्यांच्या आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी अमरावती येथे गेले होते. दरम्यान २६ रोजी ते लग्नकार्य आटोपून घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर त्यांना घरातील लोखंडी कपाटातून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने आणि मिक्सरच्या मोटार असा एकूण ४ लाख ९४ हजारांचा ऐवज लांबविल्याचे दिसून आले. या गुन्ह्यातील…

Read More

जळगाव प्रतिनिधी । भरधाव दुचाकीच्या धडकेत कोळन्हावी येथील ४३ वर्षीय मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव श्रावण सोळंके वय ४३ असे मयत मजुराचे नाव आहे. यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील नामदेव सोळंके हे मजुरीकाम करुन त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. ९ एप्रिल रोजी कामानिमित्ताने ते विदगाव कोळन्हावी रोडने पायी जात असतांना त्यांना समोरुन एम.एच. १९ बी.पी.९९६४ या क्रमाकांच्या दुचाकीने धड‍क दिली होती. या धडकेत नामदेव सोळंके यांच्या डोक्यास तोंडावर गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला होता. मयत नामदेव सोळंके यांच्या पश्चात पत्नी मंगलाबाई तसेच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून सतत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे विविध कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’ अशी…

Read More