कमी वेळेत सूक्ष्म नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरली लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीमध्ये नियोजनात “परफेक्ट” असलेला पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याची व्यक्त होत आहे चर्चाजळगाव : देशाची सर्वोच्च निवडणूक म्हणजेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय वारे वाहू लागले होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने तात्कालीन खासदार उन्मेश पाटील व युवा चेहरा व नियोजनात ज्यांचा हातखंड आहे असे पारोळा नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांनी विचारकरून अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेश होण्याचे चर्चा सुरू असताना सर्वांनी गृहीत धरले होते की ही उमेदवारी उन्मेश पाटील किंवा त्यांच्या परिवारात दिल्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
विजय पाटील जळगाव । प्रतिनिधी । एरंडोल तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील हे मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरणात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. सन १९७८ साली महेंद्रसिंग पाटील हे जनता पक्षाकडून निवडणूक लढवून एरंडोल आणि पारोळा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर ते केवळ १८ महिने आमदार राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये जनता दल पक्षातून पुन्हा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष…
जळगाव विजय पाटील : देशाची लोकसभा निवडणूक आता चौथ्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. रावेर मतदार संघात आपल्या सूनबाईंसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तुतारी सोडून कमळ हाती घेतले आहे. तसे खडसे हे राज्यातले मोठे तसेच कुठली गोष्ट लक्षात ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मधुकरराव चौधरी, हरीभाऊ जावळे, सुरेश जैन, संतोष चौधरी, अशा अनेक नेत्यांचे राजकारण संपविण्याचे काम खडसे यांनी केले हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्यात खडसेंना जड गेले ते गिरीश महाजन. संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक गिरीशभाऊ वेळोवेळी त्यांना पुरून उरले. परंतु यावेळी खडसेंनी थेट दिल्ली गाठत सुनेचे तिकीट मिळविले. आपल्या जुन्या सहकाऱ्यांना जुन्या मैत्रीची आठवण करून देत…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी बाहेरचा उमेदवार लादला. उमेदवार श्रीराम यांच्या मॅनेजमेंटची धुरा दर्जी यांच्यावर सोपवले आहे परंतु चहापेक्षा किटली गरम असा प्रकार या मतदारसंघात झाला असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहे. दर्जीचा वागणुकीचा फटका श्रीरामाच्या बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक वातावरण आहे परंतु सर्व काही पैशाने होत नाही यासाठी उमेदवारास जीवाभावाची टीम देखील आवश्यक असते. परंतु उमेदवार श्रीरामाच्या अवतीभवती दर्जीने कवच केल्याने कोणालाही काही उमजत नाही अशी परिस्थिती उमेदवाराच्या बाबतीत झालेले आहे. रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : विजय पाटील : देशात मोदी शहा यांच्या दंडलशाही विरुद्ध सर्व विपक्ष पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी याची नर्मितिी करण्यात आली या आघाडीमध्ये आम आदमी पार्टी सामील आहे. इंडिया आघाडी मार्फत 2024 लोकसभा एकत्रितपणे संपूर्ण देशात लढण्याचा नर्धिार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील 2024 लोकसभा एकत्रितपणे लढवण्यिाचे ठरले आहे. मात्र रावेर मतदारसंघात आम आदमी पार्टीला महाविकास आघाडी कडून बगल दाखवली जात आहे. रावेर मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवार मा श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या अनुषंगाने आप चे जल्हिाध्यक्ष मिलिंद चौधरी व जल्हिा समन्वय योगेश हिवरकर यांनी सदच्छिा भेट घेऊन आम्ही आपला प्रचार…
जळगाव विजय पाटील : भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज पाटील यांनी हाती शिवबंद बांधून त्यांचे मित्र व भाजपमधीलच पदाधिकारी करण पवार यांच्या पाठीशी उभे राहून भाजप विरुद्ध आता सामना पुकारला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असेल उमेदवार बदलण्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजप कार्यालयात गुरुवारी दुपारपासून बैठकींचे सत्र सुरू पहावयास मिळाले. यावेळी माजी खासदार रे टी पाटील गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दारआड चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी भाजपला राम राम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीतर्फे जळगाव लोकसभा…
धरणगाव – तालुक्यातील आहिरे बुद्रुक येथील रहिवासी पांडुरंग नागो पाटील (वय ६५) यांचे आज शनिवार ता. ३० मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत यात्रा आज दुपारी ४ वाजता राहत्या घरून निघेल. ते दीपक, वासुदेव पाटील यांचे वडील आहे. तर त्याच्या पश्चात पत्नी, दोन सूना, नातू असा परिवार आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका असून विजेच्या कडकडाट सह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे.
ठाकरे गटाचे पालकमंत्रीना आव्हान; जळगाव ग्रामीण मधून सुनील महाजन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक..! जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघांमध्ये ही आता राजकीय गणिताला वेग आला आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन विधानसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. पक्षाने आदेश दिल्यानंतर ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी लोकसभा निवडणूकानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठित नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बाधून तयार असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनिल महाजन यांच्या पत्नी माजी महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून आमदारकी लढविण्याची तयारी दर्शविली. तर दुसरीकडे त्यांचे…
जामनेर : मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नव वर्षात नवीन संकल्पनांसह विविध योजनाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या योजनांमध्ये जीवन संजीवनी योजना, दिपज्योती योजना, मातृवंदना योजना, आधार वड योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या योजनांतर्गत रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. रागिणी पारेख यांच्या सारख्या नामांकित डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा आता जामनेरमध्ये मिळणार आहे. जर एखादा रुग्ण सरकारी योजनेत बसत नसेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा चॅरिटी बेडच्या माध्यमातून त्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात येतील. मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई…

