एकनाथराव खडसे करणारा आज विधान परिषद मध्ये अधिकारी व ठेकेदार, लोकप्रतिनिधींच्या सिंडिकेटची चिरफाड
जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास 99% टेंडर आहे जादा दराने दिले गेले आहे या टेंडर मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून शासनाची जवळपास 400 कोटी ची तिजोरी लुटली गेली आहे. ही रक्कम अधिकारी व ठेकेदारांकडून वसूल करा अशी मागणी करण्यात येणार असून विशेष म्हणजे आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे हे भ्रष्टाचाराची चिरफाड करणार आहेत. विधान परिषदेच्या लक्षवेधीमध्ये चौथ्या क्रमांकाची लक्षवेधी एकनाथराव खडसे यांची आज लागले आहे.
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या प्रमाणात चर्चेत आले असून एकनाथराव खडसे व माजी जि प सदस्य सुभाष पाटील यांनी हा विषय गेल्या दोन वर्षापासून सातत्याने लावून धरला आहे अखेर शासनाला त्यांच्या पाठपुराव्यावरून अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश करावे लागले. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात एकही ठेकेदार बिलो दराने काम घेणारा भेटलेला नाही सर्व टेंडर हे जादा दराने झालेली आहे.
या जादादाच्या टेंडर मध्ये अधिकारी लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांचे सिंडिकेट असल्याने करोडो रुपयाची शासनाची झालेली आहे निपक्षपातीपणे चौकशी लागली तर हजारो कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत पुन्हा जमा होण्याची शक्यता आहे. काही ठेकेदारांची बिले देखील निघालेले आहेत काही ठेकेदार बिल काढण्याच्या तयारीत आहेत मात्र त्यांच्यावर वसुलीची कारवाई होणार का याकडे लक्ष लागून आहे.
एकनाथराव खडसे व सुभाष पाटील यांनी हा विषय तडीस नेण्याचे ध्येय ठेवलेले आहे. विधान परिषदेच्या सभागृहात जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील सिंडिकेटच्या आज आवाज उठवण्याची शक्यता आहे पहा फक्त लाईव्ह महाराष्ट्र.