Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम
    चोपडा

    धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 27, 2025Updated:June 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकप्रतिनिधी प्रशासनाला खिशात ठेवत कामाचा बट्ट्या बोळ

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव, चोपडा धरणगाव रस्त्याचे काम सुरू आहे पारदर्शक सरकारने हे काम चांगल्या पद्धतीने व दर्जेदार व्हावे यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर केले. परंतु टक्केवारीमुळे ठेकेदाराने हे काम निकृष्ट सुरू केले आहे जणू काही चोपडा धरणगाव रस्ता म्हणजे ठेकेदाराचा पैसा कमवण्याचे एटीएम आहे याची प्रचिती जनतेला येत आहे.

    चोपडा धरणगाव रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे जळगाव तसेच धुळे जिल्ह्याला कनेक्ट होणारा हा रस्ता आहे. विशेष म्हणजे काळीशार जमिनीतून या रस्त्याचे काम सुरू आहे. निविदा मध्ये टाकलेल्या नियमावलीनुसार दोन टक्केही काम ठेकेदार करताना दिसत नाही अक्षरशः  शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठेकेदाराची मोठ्या प्रमाणात  अधिकाऱ्यांची सेटिंग असल्यामुळे कुणालाही जुमानत नाही अशा पद्धतीने ठेकेदार या रस्त्याचे काम करीत आहे. काही ठिकाणी मुरूम वापरणे गरजेचे होते परंतु तेवढी तसदी देखील ठेकेदार करत नाहीये. मस्तवाल ठेकेदाराचे अनेक पराक्रम उघडकीस येणार असून गावकऱ्यांनी अनेक किस्से लाईव्ह महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. कुंपणच शेत खात आहे असा हा प्रकार आहे. शासनाचे 70% पैसा हा ठेकेदार प्रशासन यांच्या घशात जात असल्याने हा रस्ता केवळ तकलादू केला जात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावचा तिढा सुटल्याचा दावा अन् रेश्मा काळे नॉट रिचेबल; महायुतीत खळबळ

    June 12, 2026

    कर्जमाफीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण; ४० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विनाअट लाभ, बँकिंग व्यवस्था टिकवण्यासाठीच एकमेव अट

    June 12, 2026

    सराफा दुकानात ग्राहक बनून प्रवेश; ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल लंपास!

    June 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.