मुंबई वृत्तसंस्था । राज्यात महाविकास आघाडीविरोधात सुरू असलेल्या राजकरणात भाजपा फायदा उचलून बंडखोर आमदारांसोत सत्तास्थापन करेल अशी चर्चा सुरू आहे. यातच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक झाल्यानंतर भाजपा वेट ॲण्ड वॉच या भूमीकेत असून सध्या कोणत्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नसल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या ४० आमदार असून अजून काही आमदार शिंदे गटात जाण्याच्या शक्यता आहे. यात उदय सामंत, दादा भूसे, गुलाबराव पाटील असे बडे नेते शिंदे गटात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पडून नवं सरकार स्थापन होई अशीही चर्चा आहे. यामध्ये भाजप या सर्वाचा फायदा घेऊन नवं सरकार स्थापन कऱण्याचीही दाट शक्यता आहे.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी गौरव पाटील: जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथून घरासमोर उभी ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना रविवार, २६ जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली होती. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीला गेलेली दुचाकी धरणगाव शहरापासून स्मशानभूमीजवळ आढळून आली असून पोलीसात जमा केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे अरुण काशीदास जगताप (वय-५३) हे वास्तव्यास आहेत. ते शेती करतात. अरुण जगताप यांचा मुलगा उमाकांत याच्याकडे दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे त्याने त्याची एम.एच.१२ टी.जी. २६३० या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी आढळून आली नाही. याबाबत…
जळगाव प्रतिनिधी । बंडखोर आमदार लताबाई सोनवणे यांच्या जळगावच्या निवासस्थानी सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त तैनात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातले ५ आमदारांचा समावेश आहे. यात चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांचाही समावेश असून त्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने अपात्र करण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे. आमदार लताबाई सोनवणे यांच्या जळगाव शहरातील निवासस्थानी रविवारी सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जळगाव प्रतिनिधी । विधानसभेच्या बैठकीला गैरहजर बंडखोर आमदारांना अपात्रते संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. यात चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील ५ आमदारांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील बंडखोर पाच आमदारांपैकी चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांनाही यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आले आहे. लताबाई सोनवणे यांच्या जळगावच्या निवासस्थानी गेटवर शनिवारी २५ जून रोजी रात्री १०.३० वाजेनंतर ही नोटीस लटविण्यात आली होती. आज सकाळी नोटीस लताबाई सोनवणे यांच्या कुटुंबियांना प्राप्त झाली आहेत. नोटीसवर महाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव यांची स्वाक्षरी आहे. आमदार लताबाई सोनवणे यांचे पती माजी…
नवी दिल्ली वृत्तसंस्था । एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पिटीशन दाखल करण्यात आले. दरम्यान या आमदारांना नोटीसा बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज ना उद्या त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा हे सरकार टिकणार नाही असे बोलले जात होतं. दरम्यान, आम्ही हे अडीच वर्षे सरकार चालविलं आहे. अजूनही सरकार चालेल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. बंडखोर आमदार आल्यावर याचा अंदाज येईल. असे सांगितले. दरम्यान, त्यांच्यावर कारवाई होईल का…
प्रतिनिधी प्रविण पाटील : जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथून घरासमोर उभी ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना रविवार, २६जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वसंतवाडी येथे अरुण काशीदास जगताप वय ५३ हे वास्तव्यास आहेत. ते शेती करतात. अरुण जगताप यांचा मुलगा उमाकांत याच्याकडे दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे त्याने त्याची एम.एच.१२ टी.जी. २६३० या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी आढळून आली नाही. गावात सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने अरुण जगताप यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला…
मुंबई वृत्तसंस्था । शिंदे गटावर वारंवार प्रहार करणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिंदे गटाने एका वृत्तवाहिनीला दिले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे राजकीय नाट्य गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणाताही ठोस निर्णय न घेतल्यास शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदे गटावर प्रहार करत आहे. दरम्यान, त्यांचे सख्खे भाऊ सुनील राऊत हे शिंदे गटाच्या संर्कात असल्याची धक्कादायक माहिती ‘न्यूज18’ ला दिली आहे. ते देखील गुवाहटी येथे जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड…
जालना वृत्तसेवा । राज्यात बंडखोरीचे राजकारण सुरू झाल्याने मविआ सरकार अस्वस्थता पसरली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात सक्रीय झाल्यावर राज्यात नवीन सरकार येणार असल्याचा सुचक विधान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर भाजपतर्फे अतिशय सावध भूमिका घेण्यात आली आहे. भाजपच्या कोणत्याही महत्वाच्या नेत्यांनी नवीन सरकार स्थापन करण्याबाबत विधान केलेले नाही. शिंदे यांचे बंड हा शिवसेनेता अंतर्गत प्रश्न असल्याचे आजवर विविध नेत्यांनी सांगितले. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुप्त भेटीगाठी घेत असले तरी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. त्यांची एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची एकत्र भेट झाली असून यात…
धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकेत २० कोटींचा अपहार झाला असून याबाबत धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. धरणगाव नगरपालिकेच्या २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात जवळपास २० कोटींच्या रकमेची अनियमितता तसेच अफरातफरी नमूद केल्या आहेत. त्या अहवालाच्या अनुषंगाने धरणगाव येथील जागृत जनमंचचे श्री.जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे सचिव, धरणगाव पोलीस स्टेशन, पोलिस अधिक्षक जळगाव यांच्याकडे गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार केली होती. मात्र सर्व ठिकाणी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे फौजदारी रिट याचिका…
मुंबई वृत्तसंस्था । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी करून शिवसेनेच ४१ आमदारांसोबत गुवाहाटीला रवाना झाले आहे. या राजकरणात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकाकी पडले असल्या. त्यांच्या साथीला त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी जोरदार आघाडी घेतली असून बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संवाद साधून मन वळविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे राजकरण डगमगाला लागली आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिवसेनेकडून बंडखोरांना कारवाईचा इशारा देण्यात येत असून दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पतीच्या राजकरणात हाताला हात धरून आघाडी घेतले आहे. रश्मी…

