Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी: शहरातील एसएमआयडी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार १ जूलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) रा. एसएमआयटी महाविद्यालयाजवळ, जळगाव हा तरूण खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. गुरूवार २८ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हेमंत चौधरी हा तरूण घरी असतांना त्याच्या मोबाईलवर ९ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता…

Read More

जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा खुर्द येथील शिवारात ३५ वर्षीय तरूणाचा खून केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गंगापूरी येथील श्याम फकीरा ठाकरे (वय-३५) हा आपल्या पत्नी विद्या यांच्यासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. २४ जून रोजी सकाळी ८ वाजता ते घरातून बाहेर पडले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केल्याचे २५ जून रोजी निष्पन्न झाले. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्या ठाकरे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा…

Read More

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रांजणगाव शिवारातील एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळले. परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.तिघा मायलेकांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीय. शिरपूर येथील महिला इला व मुले महेश व रितेश  गेल्या चार वर्षांपासून रांजणगाव येथील निवासस्थानी आहेत.इला मनोज पावरा (वय २५) व त्यांची दोन्ही मुले महेश मनोज पावरा (वय ११ महिने) व रितेश मनोज पावरा (वय ५) असे मृतांची नावे आहेत. मंगळवारी (दि.२८) रात्री महेश पावरा या बालकाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले. परंतु  दुसरा मुलगा रितेश हेदेखील बेपत्ता होते. त्यांचा . ज्या विहीरीत महेश याचा मृतदेह आढळला त्या विहिरीला पाणी जास्त होते. वेळीच स्थानिक नागरीकांच्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिंदे गटाने बंडाळीची भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात आधीच भूकंप झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. अखेर भाजप आणि शिंदे गटाने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. पत्रकार परिषदेत बोलताना ‘एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील,’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच असल्यानं लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गावाला रामराम केलं. आणि ठाण्यात दाखल झाले आहे. ते तिथेच स्थायिक झाले.ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून ११ वीचे शिक्षण पूर्ण केले. अशातच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी पहिल्यांदा फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार स्थापन होणार असून एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज फडणवीस यांनी केली आहे. आज पदाची शपथ घेतील आणि नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा केली. तसेच नव्या सरकारमध्ये आपण नसणार मात्र सरकारचा चालवण्याची जबाबदारी आपली असल्याचेही म्हटले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची माहिती मिळाली असताना देखील दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदारांची माहिती कशी नव्हती? असे सवालही उपस्थितीत झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरींच्या हालचालींबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तब्बल ४ वेळा क्लपना दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आठ ते…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज;एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात बंडखोरी केलेल्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागलीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचं महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे यांनी सकाळी १० वाजता दोन ट्विट केले आहेत. या दोन ट्विटमध्ये शिंदे यांनी मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:एकनाथ शिंदे यांच्या सोबत अपक्ष आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील होते. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना रस्ता गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट दिल्याचे आता समोर आले आहे. तिकडे मविआ सरकार कोसळले आणि इकडे बच्चू कडू यांची फाईल बंद झाली, त्यामुळे अनेक चर्चा सध्या राजकारणात रंगत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. एकूण १ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार बच्चू कडू यांनी केला होता. हे . बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे. बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फकवणुकीचा गुन्हा देखील…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. जनतेशी त्यांनी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राजीनामा देण्यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही शिवसेनेचे केवळ चारच मंत्री उपस्थित होतो, अशा शब्दात खंत व्यक्त केली. याप्रसंगी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. शेवटी तो न्यायादेवतेचा निकाल आहे, असं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केल.उद्धव ठाकरे…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) गुलाबराव वाघ माझ्या भावासारखे आहेत. त्यांनी कायमच मला सहकार्य केलेय. सोमवारच्या मेळाव्यातही जाण्याबाबत त्यांनी मला विचारले होते, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांनी आज एका दैनिकाशी साधलेल्या संवादात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गुलाबराव पाटील याना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगाव आणि धरणगावच्या शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सोमवारी शिवसेनेच्या मेळाव्यात जाण्याबाबत गुलाबराव वाघ यांनी मला फोन केला. तसेच मी मेळाव्यात जात आहे, याबाबत त्यांनी सांगितले. गुलाबराव वाघ हे भावासारखे असून, त्यांनी आतापर्यंत मला मदतच…

Read More