लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या विरुद्ध मोट बांधण्यासाठी औरंगाबाद रोडवरील एका शोरूम वर काल रात्री डिनर डिप्लोमा सी झाले असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमशीला प्रतिष्ठित जळगाव शहराचे उद्योजक, माजी मंत्री, जिल्हा बँकेचे संचालक तथा काही राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आजारपणानंतर डिनर डिप्लोमाशी असे निमित्त या पार्टीचे असले तरी राजकीय चर्चा मात्र जोरात सुरु आहे.राजू मामाच्या विरुद्ध मोट बांधली गेली असल्याचे समजते. विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमाशीला राजू मामाच्या विरुद्ध जे उमेदवार असणार आहेत ते स्वतः उपस्थित होते. भाजपामध्ये व जनतेमध्ये राजू मामाचे जोरदार वजन आहे परंतु काहींना हे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
परंपरा खंडित होणार की अबाधित राहणार विजय पाटील : जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर हा विधानसभा क्षेत्र एक वेगळेच रसायन आहे या रसायनामध्ये कधी पक्षाला तर कधी अपक्षाला विजय मिळत असतो या विजयात महत्त्वाची भूमिका निभावतात ते जिल्हा परिषदेचे गट या गटातटाचे राजकारणावर सर्व अंमळनेर विधानसभा क्षेत्राचे राजकारण अवलंबून आहे. अमळनेर ची विशेष परंपरा असलेले ज्याला एक वेळा आमदारकीची संधी दिली त्याला दुसऱ्यांदा कधीच देत नाही ही परंपरा यावर्षी अबाधित राहणार की खंडित होणार याकडे सर्वांचे उत्सुकतेचे लक्ष लागलेले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकमेव आमदार व नामदार असलेले अनिल भाईदास पाटील यांना पुन्हा जनता संधी देणार की अपक्षाला पुन्हा डोक्यावर…
जळगाव – शहराला केंद्र व राज्य शासनाची अमृत पाणीपुरवठा योजनेचे कामाचे लोकार्पण मंगळवारी आचारसंहिता लागण्याच्या काही मिनिटा आधी महापालिकेने अचानक घाई गडवडीतून उरकावण्यात आल्याने या योजनेबाबत तसेच प्रशासनाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जळगाव शहराला नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याची अमृत योजनेचे काम 2018 मध्ये शहरात सुरू झाले. दोन वर्षाचा कालावधी जाऊन सुद्धा गेली सहा वर्ष ही अमृत योजना पूर्ण न झाल्यामुळे महापालिका प्रशासन तसेच जैन इरिगेशन कंपनीने घेतलेल्या या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच महापालिकेच्या महासभांमध्येही अमृत योजनेच्या कामावरून खडाजंगी अनेक वेळा पहावयास मिळाली. त्यात अमृत योजनेचे घाईगडबडीत लोकार्पण कार्यक्रम आज खासदार स्मिता वाघ, भाजपचे काही मोजके…
जळगाव शहरात भाजपा नव्हे…’मामा पार्टी’..!जळगाव: जळगाव शहरात नवीन राजकीय समीकरण जुळले असून भाजपा नव्हे..मामा पार्टी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बोटावर मोजण्याइतके काही नगरसेवक सोडले तर मामा पार्टीच्या बाजूने कुणीही नाही. जळगाव शहरातील जनतेने भाजपाला जळगाव महापालिकेत एक हाती सत्ता दिली. पण ही सत्ता देखील मामा पार्टीला सांभाळता आली नाही. शहरात खड्डेमय रस्ते हे काही नवीन नाही. राज्य शासनाने करोडो रुपये निधी दिला परंतु मामा पार्टीने कुठलीही नियोजन न केल्यामुळे गेल्या पाच वर्षात शहराचा विकास हा भकास करून टाकला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ६३ हजाराचे मताधिक्य मिळाले हे मामा पार्टीचे योगदान नव्हे तर भाजपाचे योगदान आहे. परंतु मामा पार्टी याचे…
काळ्या यादीत असलेल्या ठेकेदाराला साडेआठशे कोटीचे टेंडर देणाऱ्या कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांना निलंबित कराराष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारालाईव्ह महाराष्ट्र न्युज : शेततळे निविदा प्रक्रियेत गैरप्रकार करणारे वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांना सेवेतून निलंबित करून निविदा प्रक्रियेची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरचंद्र पवार) ने दिला आहे.यासंदर्भात जळगाव महानगर युवक पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता भदाणे यांची भेट घेवून निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की,तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या नियंत्रणात वाघूर धरण विभाग,जळगाव यांचे अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे शेततळे तयार केले जात आहे. या शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे…
भडगाव तालुक्यात आई-वडिलांसमोरच घडली घटना ! जळगाव / पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका टँकरच्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. १७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दि. १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले…
जळगाव प्रतिनिधी : शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे एका तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. किशोर अशोक सोनवणे वय-३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ, जळगाव, असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर सोनवणे हा आपला परिवारासह वास्तव्याला आहे. किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता. या वादातून हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे हा जेवण करण्यासाठी बसलेला…
जळगाव प्रतिनिधी : शहरातील गणेश कॉलनीत राहणाऱ्या एका तरूणाने राहत्या घरात छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवार २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सनी ईश्वरलाल केसवानी (वय ३६, रा.गणेश नगर, जळगाव)असे मयत उद्योजकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सनी ईश्वरलाल केसवानी हा तरूण आपल्या कुटुंबासह गणेश कॉलनी परिसरात वास्तव्याला होता. जळगाव एमआयडीसी येथे त्याची स्वतःची कंपनी आहे. त्यानुसार तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सनी केसवानी यांची पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी तो एकटाच होता.…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव – तालुक्यातील कडगाव येथील ४७ वर्षीय महिलेचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा भादली रेल्वे लाईनवर घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सरलाबाई ईश्वर पाटील वय ४७ रा. कडगाव ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.जळगाव तालुक्यातील कडगाव येथे वास्तव्याला असलेल्या सरलाबाई पाटील या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा भादली रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक ४३५च्या ११ आणि १३ च्या दरम्यान सरलाबाई पाटील या रेल्वे…
धरणगाव (प्रतिनिधी) सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ व जळगाव ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत नेमका कोणाचा विजय होईल, याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल व विधानसभेत उमेदवार कोण असतील?, ही निवडणूक कशी झाली?, निकालात कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम दिसून येईल,, आदी विषयांवरील चर्चा सुरु आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ म्हटले की, सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव. यावेळेसही पालकमंत्री जळगाव ग्रामीणमधून आपले नशीब आजमावतील हे स्पष्ट आहे. परंतू महाविकास आघाडीतून त्यांच्यासमोर कोण उभे राहणार? आणि तो उमेदवार गुलाबभाऊंसमोर टिकाव धरू शकेल की नाही?, याची देखील चर्चा आतापासून सुरु झाली…

