बळीरामपेठेत समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकमांची पत्रकार परिषद… लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामधील उपचारार्थ दाखल रुग्णांना ‘आहार सेवा’ पुरविण्याचे १२३ कोटीचे कंत्राट मिळाले असून या आहार सेवेच्या नाशिक मंडळातील कामात मोठा अपहार झाला आहे. असा आरोप समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी बळीरामपेठे येथे शुक्रवारी १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी विजय निकम म्हणाले की, नाशिक मंडळातील पाच जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना करण्यात आलेल्या आहार सेवा पुरवठा कामात मोठा अपहार झाला असून या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था, नाशिक कारवाई होतांना उपसंचालक कार्यालयाकडून…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या नराधमाला जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ३० हजार रूपयांचा दंडांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र उर्फ रितेश बापु निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र निकुंभ याला अटक केली होती. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या. बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण १२ साक्षिदार तपासण्यात आले. खटला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांना विमा हप्त्याची रक्कम कर्ज म्हणून देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकने घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिली. रिंगरोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, संचालक संजय पवार, प्रतापराव पाटील, महितापसिंग नाईक, कार्यकारी संचालक तथा व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. जिल्हा बॅकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती करण्यात आली होते. ती सक्ती आता बँकेने ऐच्छीक केली…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील बुस्टर डोसचे मोफत लसीकरण सुरू झाले आहे. या अनुषंगाने शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात शुक्रवार १५ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून मोफत लसीकरणास प्रारंभ झाला आहे. शासनाकडून जेष्ठ नारीकांसाठी मोफत बुस्टर डोस देण्यात येत होता.याच धर्तीवर राज्य शासनाने १८ वर्षावरील नागरिकांना आज शुक्रवार दि. १५ जूनपासून बुस्टर डोसचे मोफत लसीकरणास प्रारंभ करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयांने कोरोनाचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर ९ महिन्यांवरुन ६ महिन्यांवर आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूनं हे अंतर कमी करण्यात आलं आहे. महापालिकेच्या केंद्रांवर कोविशील्ड आणि…
चाळीसगाव प्रतिनिधी । वडगाव ते रहिपूरी दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने मागुन जोरदार धडक दिल्याने सासऱ्याचा मृत्यू झाला तर सुन जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुलसीदास शंकर वाघ (वय-३४) रा. भोरस, ता. चाळीसगाव हे त्यांचे वडील शंकर वाघ आणि पत्नी मिना वाघ यांच्यासोबत गुरूवारी १४ जुलै रोजी दुचाकी (एमएच १९ डब्ल्यू ३६५५) ने सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात वडगाव ते रहिपूरी रस्त्याने जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारी अज्ञात पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शंकर वाघ हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील राहणाऱ्या महिलेला व्हॉटस्ॲपवर अश्लिल मॅसेजेस पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आली आहे. या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ३६ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ती आपला उदरनिर्वाह करते. १३ जुलै रोजी रात्री जेवण करून झोपलेली असतांना तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अनोळखी नंबरवरून तिला मॅसेजेस पाठविले. त्यानंतर अश्लिल फोटो व्हॉटसॲपवर पाठविले. यासंदर्भात गुरूवार १४ जुलै रोजी तरूणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गतीमंद असल्याचा फायदा घेत गावातील नराधमाकडून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली. नराधमाला पोलीसांनी अटक केले आहे. या गुन्ह्याचा गुरूवारी १४ जुलै रोजी नराधमावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही गतीमंद असल्याने ती घरीच असते. १३ जुलै रोजी सकाळी मुलीचे कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त शेतात निघून गेले. दरम्यान, गावातील शांतारा मधनसिंग गायकवाड याने मुलीचा गतीमंद असल्याचा गैर फायदा घेत तिला गावातील बकऱ्यांच्या वाड्यात घेवून गेला. तिथे तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. दुपारी कुटुंबिय…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील जवळपास 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. परंतु उद्धव ठाकरेना अनेक अडचणी सहन करावे लागत आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. ठाकरे सरकारसाठी पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झाले. ठाण्यात शिवसेनेतील 5 नगरसेवक गोपाळ लांडगेंची शिंदे गटाला साथ देणार आहे. नंदनवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला गेला. यापूर्वी 28 नगरसेवक एकनाथ शिंदें गटात सहभागी झाले. ऐरोलीसह आता बेलापूर मतदारसंघालाही खिंडार पडलं आहे. रामदास…
प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील वाकडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रियंका विठ्ठल बाविस्कर (वय-१५) रा. वाकडी ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियंका बाविस्कर ही आपले वडील, तीन बहिणी आणि लहान भावासोबत वास्तव्याला आहे. तिचे वडील शेतात हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार १४ जुलै रोजी सकाळी तिचे वडील शेतात कामाला निघून गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रियंका घरात…
जळगाव प्रतिनिधी । फावड्याच्या दांडने गळा दाबून तरूणाचा खून करणाऱ्या फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचखेडा गावातून अटक केली आहे. त्याने खूनाची कबुली दिली असून जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नथ्थू काळू सुरळकर वय २८ रा. चिंचखेडा ता .जामनेर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तर शाम फकीरा ठाकरे वय 30 रा.गंगापूरी ता. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील गंगापूरी गावातील एक दाम्पत्य फलोद्यानात रानतुळस घेण्यासाठी गेले असता, २५ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पळसाच्या झाडाखाली मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर जामनेर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात हलविला होता. मयत हा गंगापूर गावातील शाम…

