यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जितेंद्र रवींद्र सरोदे यांची महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणेकामी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सेवा, मार्गदर्शन, सहकार्याची भावना आणि महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क जितेंद्र सरोदे यांचा आहे. त्यांच्या या कार्यात अधिक भर पडावी याकरिता आपल्या कार्याची दखल घेत आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेच्या ध्येय, धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गापर्यंत पोहचवून…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रविण पाटील प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची चेअरमन जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोधत निवड करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची कार्यकारिणी रविवारी १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सोसायटीच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रल्हाद मोतिराम पाटील, नेमिचंद ताराचंद जैन, काशिनाथ दशरथ पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, धनराज वसंत पाटील, तुकाराम भगवान पाटील, गंगाधर आनंदा पाटील, अजित मोतिलाल पाटील, सुभाष ओंकार पाटील, शिवाजी काशिराम पाटील, भिमराव शामराव बोरसे,भिकन रामु चिमणकारे , ज्ञानेश्वर सिताराम पटवळे तसेच नवनियुक्त चेअरमन प्रशांत आशोक…
धरणगाव प्रतिनिधी । समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. धरणगाव येथे शिवसेना बैठकीत ते बोलत होते. शिंपी समाज मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजनधरणगाव येथील शिंपी समाज मंगल कार्यालयात शिवसेनेची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने मागील कालखंडात विविध शेतकऱ्यांचा योजना व पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र चे संवेदनशील माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.…
शपथविधी कुठे आणि कसा होणार, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ठरवणार ! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विरोधक टीका करू लागले आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिंडळाचा विस्ताराकडे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार येऊन 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. येत्या 20 किंवा 21 जुलै रोजी मुंबईत मंत्रिमंडळात शपथ होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्यात एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पण, काही मंत्र्यांना…
धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना पदाचा राजीनामा देण्याची सुरुवात झाली आहे. राजीनामे देऊन समर्थकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी सांगितले
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. शिंदे फडणवीस हे सरकार आल्यानंतर आता शिंदे गटाच्या बंडाच्या काळातील नवीन कहाणी समोर आली. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून ऑफर दिली. ठाकरे सरकारच्या गौप्यस्फोट करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेसह 26 आमदार सुरतला गेले नंतर उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या फडणवीस यांना संपर्क साधून डील करण्याचाही प्रयत्न केला होता.उद्धव ठाकरे यांनी फडवीसांना फोन केला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शिंदे यांना बाजूला ठेवा,…
रावेर प्रतिनिधी । १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाळून नेत तिच्यावर शेतात सतत तीन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जीवन सुधाकर पाटील (वय-२१) याने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना तीला फूस लावून दुचाकीवर पळून नेत शेतातील झोपडीत ठेवून सतत तीन दिवस तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समजल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. रावेर पोलीस…
पाचोरा प्रतिनिधी । पुण्याहून परतलेल्या राजधानी एक्सप्रेसखाली आल्याने चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. याबाबत पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, पाचोरा येथील कृषी कॉलनी येथील रहिवासी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस.पी. पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या पुणे येथे मुलीच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. पुणे येथून ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करीत होत्या. त्या पाचोरा रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान फलाट क्रमांक ३ वर उतरल्या. त्या पादचारी पुलावरून न जाता फलाट क्रमांक दोनवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होत्या. त्याचवेळी मुंबईकडे अपमार्गावरून…
धरणगाव गौरव पाटील : – एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून ५० आमदारांनी शिवसेनेपासून वेगळे होत आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपशी युती करून सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील ५ आमदार सामील आहेत. या राजकीय उलथापालथीवर स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि एकनाथराव शिंदे यांचे नेतृत्व मानणारे दोन गट निर्माण झाले आहेत . त्या पार्शवभूमीवर अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . धरणगाव तालुक्यातही अशीच काहीशी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे . मात्र तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि धरणगाव नागरपालिकेतल्या नगरसेवकांनीही आपले सामूहिक राजीनामे जिल्हा…
धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना पदाचा राजीनामा देण्याची सुरुवात झाली आहे. राजीनामे देऊन समर्थकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी सांगितले

