Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू ; पाचोरा रेल्वेस्थानजवळील घटना
    क्राईम

    धावत्या रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू ; पाचोरा रेल्वेस्थानजवळील घटना

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा प्रतिनिधी । पुण्याहून परतलेल्या राजधानी एक्सप्रेसखाली आल्याने चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. याबाबत पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    अधिक माहिती अशी की, पाचोरा येथील कृषी कॉलनी येथील रहिवासी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस.पी. पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या पुणे येथे मुलीच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. पुणे येथून ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करीत होत्या. त्या पाचोरा रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान फलाट क्रमांक ३ वर उतरल्या. त्या पादचारी पुलावरून न जाता फलाट क्रमांक दोनवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होत्या. त्याचवेळी मुंबईकडे अपमार्गावरून रेल्वे जात होती. या गाडीकडे लक्ष नसल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना त्या गाडीखाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुली, जावई, मुलगा असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    फेसबुकवरील जाहिरातीवर विश्वास ठेवला अन् २१ लाख गमावले!

    October 20, 2026

    जळगाव-बांभोरी पुलावर भीषण अपघात; तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, अखेर गुन्हा दाखल !

    October 20, 2026

    काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित!

    October 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.