स्वस्त धान्य दुकानदारांना दिले प्रशिक्षण लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तहसिल कार्यालय धरणगाव येथे हर घर झेंडा अभियानाबाबत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली. या सभेत सर्व शासकीय यंत्रणांनी ऑगस्ट १३ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर झेंडा अभियानात आपला सहभाग नोंदवून सदर अभियानास तालुक्यात जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या सूचना तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी दिल्या.या सोबतच पावर पॉईंट द्वारे स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले.दुकानदार या अभियानात गावागावात नागरिकांना झेंडा विक्री करणार असल्याची माहिती देवरे यांनी दिली. याप्रसंगी स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून याबाबत नियोजन करण्याचे निर्देश ही तहसीलदार देवरे यांनी सर्व उपस्थितांना दिले. तालुक्यात हा उपक्रम…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या विवाहितेला तिने घर बांधण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत या कारणावरुन छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, उस्मानिया पार्क येथील सुरैय्याबी शेख वय ३५ यांचा एरंडोल येथील शेख रहिस शेख सलीम यांच्याशी विवाह झाला आहे. सुरैय्याबी यांनी घरबांधण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत तसेच मुलीच झाल्या या कारणावरुन तिचा पतीसह सासरच्यांनी २००७ ते २०२२ दरम्यान वेळावेळी शिवीगाळ तसेच मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने सुरैय्याबी या माहेरी निघून आल्या. व याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बुधवारी सुरैय्याबी हिचे…
चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव-मालेगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत वेडसर अनोळखी महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आह. मेहुणबारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव-मालेगाव रोडवर असलेल्या वामन गुलाब पाटील यांच्या शेताजवळ एक अनोळखी वेडसर महिला बुधवारी २० जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पायी जात असताना अज्ञात वाहनाने महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी महिला जागीच ठार झाली. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालक हा वाहन न थांबवता फरार झाला. या संदर्भात शेतकरी विष्णू पाटील यांच्या तक्रारीवरून मेहुनबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सर्वेाच्च न्यायालयाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण बहाल करतानाच 15 दिवसांच्या आत निवडणूक जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य निवडणुक आयोगाने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तसेच जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सुरु झाली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतल्याने या प्रक्रियांवर स्थगिती आली होती. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत, आरक्षणासह निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले. जळगाव जिल्ह्यात या पार्श्वभूमिवर निवडणुकांबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, वार्ड रचना, मतदार यादी यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच मतदान…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. विधानसभेतील आमदारांनी शिवसेनेपासून वेगळा गट स्थापन केल्यानंतर किमान १२ खासदारांनीही संसदेत वेगळा गट स्थापन केला आहे. लोकसभाध्यक्षांनी त्याला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यताही दिली आहे. धनुष्य बाण हे चिन्ह पक्षप्रमुख अध्दव ठाकरे यांच्याकडे रहाणार का, याकडेही लक्ष लागले आहे. पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह आपल्याकडेच रहावे यासाठी उध्दव ठाकरे गटाने यापूर्वीच आयोगाककडे धाव घेतली आहे. शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. प्रतिनिधी सभेत एकूण २८२ सदस्य आहेत.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आक्रमक चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेचा एक व्हिडिओ पोस्ट करत खोचकपणे डिवचले आहे. यावर नाना पटोलीनी आता प्रतिउत्तर दिले आहे. तो भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघांनी ट्विट केलेला व्हिडिओ, व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हेच असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसाच टीशर्ट घातलेली एक व्यक्ती एका तरूणीसोबत हॉटेलमध्ये बसलेली दिसतेय. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे. नानांचा हा व्हिडिओ आधी व्हायरल झाला, त्यानंतर आपण ट्विट…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघातात तहसीलदार यांच्यासह 2 जण गंभीर जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर रुग्ण्यालयात उपचार सुरु आहेत. बुलढाणा येथील नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडेचा अपघात. सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोताळा येथील वरुड फाट्यावरील अपघात घडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या प्रशिक्षण व एका मिटिंगसाठी बुलडाणा येथे येत असताना अपघात झाला. रस्त्याच्या कडेला खोल नाल्यामध्ये तायडे यांची गाडी कोसळली या कारमध्ये तहसीलदार राहुल तायडे, वाहन चालक व नांदुरा तहसील कार्यालयातील ऑपरेटर पटेल हे होते. जखमींवर बुलडाणा येथे डॉ. भवटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तहसीलदार राहुल…
आमदार राजूमामा भोळे यांची पाहणी करतांना माहिती जळगाव-प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज नगर रेल्वे उड्डाणपूलाचे काम पुर्ण होणार असून शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांसाठी लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली. गेला अनेक दिवसांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एक ना अनेक अडचणींमुळे गेल्या काळात या कामाला विलंब झाला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेल किंवा शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन ही करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून या पुलाच्या कामाला गती देण्यात आली होती. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह महापालिकेचे…
काय नाना..! तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं…! नाना पटोले यांचा हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालं आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहे. नाना पटोले यांचा ऋ. चेरापुंजी येथील एक खासगी सहलीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शशी शाखा ओव्या विश्वास न तो भाजपच्या नेत्या चित्रा वाघ. यांनी ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणाल्या की, नाना पटोले यांचा एक ‘व्हिडीओ रोमान्स इन चेरापुंजी, मेघालया’ हा आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय व सामाजिक जीवनात वावरत…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर भागातील जळकी मीलच्या मोकळ्या जागेत चौघे जण दारू पित असतांना बाचाबाची झाली. यात दारूच्या नशेत असतांना तिघांनी रमा उर्फ रहीम शहा मोहम्मद शहा याचा चाकूने सपासप वार करून खून केला. पोलीसांनी काही तासातच तिघांना ताब्यात घेतले आहे. रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-२५) रा. गेंदालील मील, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा हा मालधक्क्यावर हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी २० जुलै रोजी कामावर सुटी असल्याने सहकारी पवन किसन लाडे, मनोज जलाल गायकवाड आणि विलास तुकाराम निकम तिघे रा. गेंदालाल मील, जळगाव यांच्यासोबत दुपारी ३…

