लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये भूमिपुत्राचा नारा देत अखंड मराठा समाजाला एकसंघ केले पण पाच वर्षात मराठा समाजाकडे पाहिले नाही आणि मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना वेदना दिल्या यामुळे भूमिपुत्राकडे मराठा पाटलांनी पाठ फिरवल्याचे चित्र या मतदारसंघात निर्माण झाले आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी ज्या श्री चौधरी यांच्यापासून मतदान लांब गेले होते आता मात्र तोच मतदार शिरीष चौधरी यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे यामागे अनेक राजकीय किनारी असून भूमिपुत्राने लोकांचे केलेले अहोलना तसेच विकास कामांमध्ये देखील जगलेरी झाल्यामुळे जनता आता सुरक्षित अंतर ठेवून भूमिपुत्रापासून वागत आहे. भूमिपुत्राला मोठ्या प्रमाणात स्वभावाचा राजकीय फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारात तडवी समाज अंतर ठेवून असून तळवी समाज हा 2019 च्या निवडणुकीत काँग्रेससाठी महत्वपूर्ण ठरला होता आता मात्र तडवी समाज लांब गेल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार समोर अडचणीच्या डोंगर उभा राहिला आहे. चोपडा मतदारसंघात ऐनवेळी तडवी समाजाचा उमेदवार महाविकास आघाडीने बदलवला, यावल येथे तडवी समाजाचा झालेला वाद आणि काँग्रेसच्या उमेदवाराने केलेला हस्तक्षेप यामुळे प्रचंड नाराज तरी समाज झालेला आहे, बामनोद येथे देखील तळवी समाज वादात अडकलेला आहे या सर्व वादाची किनार काँग्रेसच्या उमेदवारा भोवती असल्याने काँग्रेस पासून तळवी समाज जवळपास लांब गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकंदरीत विधानसभेची रचना पाहता…
मुक्ताईनगर, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर बोरगाव तालुक्यातील राजुरा गावाजवळ गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनोद सोनवणे यांची प्रकृती स्थिर असून गोळ्या ह्या त्यांच्या गाडीवर फायर झाल्यात असल्याने ते बचावले आहे. विनोद सोनवणे हे मराठा समाजाचे कार्यकर्ते असून त्यांनी अपक्ष उमेदवारी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दाखल केले आहे. प्रचाराचा पहिलाच दिवस असल्याने ते आज मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील राजुरा गावाला गेले होते दुपारी फोन तीन वाजता ते गावाबाहेर आला असता अज्ञात दोन मोटरसायकल स्वरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला त्यांनी बचाव म्हणून गाडीच्या सीटवर लपले आणि गाडीवर अंदा धुंद गोळीबार केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जामनेर व मुक्ताईनगर मध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाच फटाके फुटले असून तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही अशा सांकेतिक शब्दात सेटलमेंट झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मुक्ताईनगर मतदारसंघात गुजर समाज मोठ्या प्रमाणात आहे याचा फटका मागच्या वेळेस 2019 ला आत्ताच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या ताईंना बसला होता. हा पुन्हा धोका होऊ नये म्हणून मुक्ताईनगर व जामनेर मध्ये अंतर्गत हात मिळवणे झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जामनेर तालुक्यात तुतारी चिन्हावर मराठा समाजाच्या शिक्षकाला घोड्यावर बसवले गेले आणि ऐन वेळेस जामनेर मध्ये माझा काही संबंध नाही अशा शब्दात सरांना सुनावले गेले. एकंदरीत मुक्ताईनगर ची जागा भाऊ तुम्ही…
जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार !जळगाव प्रतिनिधी – म्हसावद येथिल प्रचार दौरा आटोपल्यावर विटनेर येथे ग्रा.पं.चे विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच ललित साठे, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तुत्व व झंझावाती नेतृत्वामुळे अक्ख्या ग्रामपंचायतीने शिवसेनेत प्रवेश करून गाव एकजुटीचे असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे पुन्हा दिसून आले.यांचा झाला प्रवेश विटनेर हे गाव राजकीय दृष्ट्या निवडणुकीचे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्यामुळे त्या कालखंडात विटनेर येथे प. स. सभापती, उपसभापती अशी विविध पद मिळाली होती. विद्यमान…
चाळीसगावात दोन जीवलग मित्र निवडणुकीच्या आखाड्यात चाळीसगावात मविआ मित्रपक्षांमध्ये नाराजी; राष्ट्रवादी अपक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत ! लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभा निवडणूकीत नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळालेली आहे. असे असतांना महाविकास आघाडीच्या उबाठातर्फे ही जागा सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नाराज झाले आहे. शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक झाली. या बैठकीत अपक्ष उमेदवार देण्याचा विचारात असल्याचे समोर आले असून आता मित्र पक्षातील उमेदवाराच चिंता वाढविणारी ठारणार असल्याचे पहायला मिळणार आहे.आमदार मंगेश चव्हाण व माजी खासदार उमेश पाटील हे दोघे एका काळाचे खास जिवलग मित्र. या जिवलग मित्रांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी…
राज्यात गेल्या काही दिवपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु होता. आज शरद पवार यांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात जळगाव जिल्ह्यातील देखील जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर व जामनेर विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले असून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून जळगाव शहरात माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार मोर्चे बांधणी ठाकरे गटात सुरु होती. गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुरु असताना हा तिढा अखेर पूर्ण झाला असून जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आता माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना उमेदवारी फायनल झाली आहे. याबाबत माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन…
जळगाव ग्रामीण मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना जाहीर ! लाईव्ह महाराष्ट्र : राज्यात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपा बाबत खलबते सुरु होते. आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 44 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. यात जळगाव ग्रामीण मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर याना संधी मिळाली आहे. इस्लामपूर – जयंत पाटीलकाटोल – अनिल देशमुखघनसावंगी – राजेश टोपेकराड उत्तर – बाळासाहेब पाटीलमुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाडकोरेगाव – शशिकांत…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : एरंडोल प्रतिनिधी 50 खोके एकदम ओके असे ब्रीद वाक्य महाराष्ट्रात गाजले आहे एरंडोल तालुक्यातील फरकांडे फाट्याजवळ पारोळा येथील गद्दाराच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीत दीड कोटी रुपयांची रोकड मिळून आल्याने खंडबड उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कशासाठी आणली होती हा खुलासा होऊ शकला नाही परंतु हे दीड कोटी रुपये पारोळा येथील गद्दाराच्या मुलाच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या असल्याचे समजते. महसूल विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. राज्यात आज पाच कोटी रुपये कॅश पकडल्याचे उदाहरण समोर असताना जळगाव जिल्ह्यात देखील दीड कोटी रुपये एका गाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
धरणगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळीला सुरूवात करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहे. अशी माहिती धरणगाव निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. यात पालकमंत्री गुलाराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे.जळगाव ग्रामीण विधान सभेच्या निवडणूकीसाठी मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत निवडणूक कार्यालयात इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज विकत घेण्यास सुरूवात केली आहे. यात पहिल्यांच दिवशी पहिला अर्ज शिंदे गटातर्फे गुलाबराव पाटील -१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर-२, विशाल देवकर-२, अपक्ष प्रसाद लिलाधर तायडे-१, शिवाजी पथरू हटकर-१, राहूल लालसिंग राजपूत-१, उन्मेश राजेश वाडेकर-१, साधना निलेश पाटील-१,…

