जगातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16 हजारांहून रूग्ण समोर आली आहेत. इतर देशासह मंकीपॉक्सचा भारतातही प्रसार होत आहे. अलीकडे, केरळमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर, दिल्लीतील एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतात मंकीपॉक्सची प्रकरणे येऊ लागली आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे पाहता जागतिक आरोग्य संघटनेने आधीच इशारा दिला आहे. मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करून, ने सर्व देशांना गंभीर होण्याचे आवाहन केले आहे.ताप आणि अंगात फोड आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत सरकारने मंकीपॉक्सबाबत एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. तीव्र ताप, थकवा, कंप सुटणे आणि अंगभर जखमा अशा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना रेल्वे स्थानकाजवळील जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव हे संगायो योजनेचे फार्म जमा करता. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी २७ जुलै रेाजी त्यांच्याकडे आईचे काम करून…
जळगाव प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघांनी दहशत माजवली आहे.गडचिरोलीत आणखी एकाचा वाघाच्या भ्याड हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हात एकच खळबळ माजली आहे. गडचिरोलीतील दिभना जंगलाच्या आवारात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. नीलकंठ गोविंद मोहर्ले असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. वाघाच्या या हल्ल्यात शेतकरयाचा जागीच मृत्यू झाला. लाकडं आणण्यासाठी हा शेतकरी जंगलात गेला होता. त्यावेळी लपून बसलेल्या वाघानं शेतकऱ्यावर हल्ला चढवला . शेतातून परतात असताना एकटाच जंगलातून असल्याचे त्यावेळी वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. शेतकरी एकटाच असल्याने वाघाच्या तावडीतून बचाव करता आला नाही. वाघाने झडप घालून शेतकऱ्याला रक्तबंबाळ केलं. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यानंतर शेतकऱ्यांचा जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेला…
जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या दिल्यात शुभेच्छा.त्यामुळे त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरुआहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिकांची गर्दी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी हजर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देताना,उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. . शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख नसल्याचे स्पष्ट केले आहे. या शुभेच्छा खोचकपणे दिली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तीर्थक्षेत्र आळंदीत मागील आठ दिवसात डंपरच्या धडकेने दोन मोठे अपघात घडले आहेत. या दोन्ही अपघातांमध्ये दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधितांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे दोन्ही निष्पाप जीव गेल्याचे समजले आहे. आळंदीत पहिल्या अपघातात एकोणीस वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू झाला. तर सोमवारी (दि.२५) दुसऱ्या अपघातात अवघ्या चार वर्षीय चिमुकलीचे जीवन बहरण्याआधीच समाप्त झाले. वास्तविक दोघांचीही कुठलीही चूक नसताना त्यांना हे जग सोडून जावे लागले आहे. निष्पाप जीवांच्या मृत्यूनंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून . आळंदी शहरातील प्रदक्षिणा मार्गावर रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत रस्ते चांगल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज विशेष: कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस आहे. 26 जुलै 1999 याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. या दिवशी दहशतवाद्यांना कठोर धडा शिकवताना भारताच्या बलाढ्य रणांगणांनी पाकिस्तानला धडा शिकवला होता. या युद्धात अनेक योद्धे शहीद झाले, परंतु आपल्या अदम्य साहसाच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रू पाकिस्तानचे उधळून लावले. युद्धात बलिदान देणाऱ्या देशाच्या शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ कारगिल दिन किंवा ‘कारगिल…
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात असलेल्या गीता इंडस्ट्रीज कंपनीतून इलेक्ट्रिक सर्व्हिस वायरचे बंडल आणि अल्युमिनियम कॉईल असा एकूण ५९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सेक्टर मधील ३२ मध्ये असलेल्या गीता इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत इलेक्ट्रिक वायर बनवण्याचे काम होते. दरम्यान १९ जुलै मध्यरात्री कंपनी बंद असतांना संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी याने कंपनीचे शटरचे लॉक तोडून कंपनीतून ५९ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे कॉइल आणि सर्व्हिस वायरचे बंडल असा मुद्देमाल चोरून नेला. हा…
Live Maharashtra news: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कडबनवाडी गावात कार्व्हर एव्हिएशनचे विमान एका शेतात कोसळले. प्रशिक्षणार्थी पायलट हे विमान चालवत असताना शेतात कोसळल्याने हा अपघात झाला. इंदापूर येथील कडबनवाडी गावात 22 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलटच्या विमानाचा अपघात झाला आहे. आज सकाळी 11.30 च्या सुमारास अपघातात घडला भाविका राठोड असे जखमी विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. या अपघातात पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या आहेत. बारामतीत कार्व्हर एव्हिएशनच्या माध्यमातून वैमानिकांना प्रशिक्षण दिले होते. बारामती येथून सकाळी विमानाने कार्व्हर एव्हिएशन उड्डाण केले आणि काही वेळाने अपघात झाला. इंधन संपल्याने विमान क्रॅश झाले. आत्तापर्यंत याबाबत पुष्टी झालेली नाही. अपघातानंतर महिला पायलट स्वतः कॉकपिटमधून बाहेर पडली. महिला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी त्यांना साकडे घातले जाणार आहे.कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना कृषिप्रधान म्हणून ओळखले जाणारे देशामध्ये कांद्याला सतत मातीमोल भाव मिळत असतो. शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आजमितीस शेतकर्यांनी साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला सरासरी नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागातील महिलेला अनोळखी व्यक्तीने मोबाईल अश्लिल व्हिडीओ तसेच फोटो पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार, २३ जुलै रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी महिलेला एका अनोळखी व्यक्तीने १५ जुलै रोजी अश्लील फोटो , अश्लिल व्हिडीओ तसेच व्हॉईज मेसेसेज व रेकॉर्डींग पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत महिलेचा फोटो शेअर करुन महिलेची बदनामी व्हावी असे कृत्य केलं. याप्रकरणी महिलेचे शनिवार, २३ जुलै रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुध्द विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

