एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत बंड केला आहे. एकनाथ शिंदेसह 55 पैकी 40 आमदार , खासदार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. आमदारांच्या या पाठिंब्यामुळे तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. राजकारणात सत्ता संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहे. राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांचा गद्दार म्हणून वारंवार उल्लेख करत आहेत. याच्या दोन महिन्यांनी शिंदे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये बालाजी मंदिराच्या भुमीपुजनाचं निमंत्रण मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबालाही दिलं आहे. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या भुमीपूजनाला…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटात वादप्रतिवाद आणखी वाढले आहेत. पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर शिंदे गटाची बाजू घेत शिवसेनेच्या टीकांना प्रत्युत्तर दिले. अनेक गौप्यस्फोटानंतर त्यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. केसरकर यांनी अनेक खुलासे केले होते. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणे यांनी आखल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला. याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या आरोपानंतर नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. किरण पावसकर शिंदे गटाची बाजू मांडणार असल्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मयूर कॉलनी परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर कॉलनी परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुलगी ही घरात असताना संशयित आरोपी सागर भरत भोई रा. जळगाव याने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे घटनाउघडकीला आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी असताना कुर्बान शेख (पूर्ण नाव माहित नाही) याने अल्पवयीन मुलीला पोस्ट लावून पळवून नेले. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही ). अखेर शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार संबंधित विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहेत.राज्यात शिवसेना आणि भाजप सरकारचा होणारा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. त्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.मंत्रिमंडळ स्थापन न झाल्याने त्याचा परिणाम आता विभागांवर होत आहे.त्यामुळे,मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्र्यांकडे अनेक प्रकारचे अधिकार असतात. पण राज्यत मंत्रीच नसल्याने विविध विभागांची कामे अडली आहेत. मंत्रीच नसल्याने हे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिवांकडे…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद येथील तलाठी दत्तात्रय पाटील यांची मुलगी प्राजक्ता हिच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त जुवार्डी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जुवार्डी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्मशानभूमी परिसरात चिकू, सिताफळ, जांभूळ, मोसंबी यांचे एकुण २५ पर्यावरण पुरक झाडे लावण्यात आले. गेल्यावर्षी याच परिसरात २० झाले लावण्यात आले होते. त्यापैकी १५ झाडांचे संगोपन वृक्षमित्र भालेराव पाटील करीत आहे. वृक्षारोपण करून नवीन कार्यास प्रारंभ केल्याने सर्वत्र उपक्रमाचे कौतूक होत आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” उपक्रम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात शासनाचे निर्देश असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व शाळा/विद्यापीठ व महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यामधून मंगळवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यामध्ये सामील होतील, तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधन सणानिमित्त राखी बनवण्याच्या कार्यशाळा शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आले. कार्यक्रमामध्ये पालकांसह मुलांनी त्यांची कल्पनाशक्ती व सृजनशक्ती वापरून आकर्षक पद्धतीने राख्या बनवल्या. विद्यालयामध्ये पालकांनी राखी बनवण्याचे साहित्य सोबत आणले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली राखी बनवण्याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानुसार स्वतः प्रात्यक्षिक करून बघितले. पालक व विद्यार्थ्यांचे कल्पना कौशल्य पाहून शिक्षकांनी व संस्था संचालकांनी कौतुक केले. प्रात्यक्षिक कार्यशाळा झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक व मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी सर्व राख्यांचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअनुषंगाने मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. एकूण ६०० विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वितरण यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, कंपास पेटी, लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांनी वितरित केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतही व्यक्त केले.गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: उद्योगासाठी योजनेतून वीज डीपी मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रूपयांची मागणी नेरी येथील सहाय्यक अभियंत्याने केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करण्याच्या तयारीत असतांना संशयिताला सुगावा लागल्याने पथकावर चारचाकी वाहन घालून पसार झाला. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सहाय्यक अभियंता शालीग्राम पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील एका तक्रारदाराने लघू उद्योगासाठी वीज डीपीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार १४ लाखांचे कोटोशन लागेल सांगितले. परंतू मी तुम्हाला मोफत वीज डीपी मिळवून देतो यासाठी ६ लाखा रूपये लागतील असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद…

