Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशातील सर्वांत जुन्या पक्षाच्या नव्या प्रमुखाची निवड करण्यात येणार आहे. अद्याप खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानिकारक पराभवानंतर राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अनेक दिवसांपासून गैर-गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरू होती. काही कारणास्तव यात बराच काळ लागल्याने अनेक चर्चा होत आहे. काँग्रेस नेत्यांचा एक मोठा वर्ग गांधी कुटुंबाकडेच अध्यक्षपद देण्याच्या तयारीत आहे. गटबाजीने ग्रासलेल्या पक्षावर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफ नुसार दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. तसेच दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं किंबहुना आत्तापर्यंत आलेल्या १५ लाख हेक्टर शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवेसना-भाजप युतीनं विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती.एनडीआरएफच्या नियमानुसार ६,८०० रुपये मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजे १३,६००…

Read More

जळगाव-प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर भागातील रेल्वे स्टेशनजवळून तरूणाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश दिलीप खर्चाने (वय-३०) रा. हरिओम नगर, जुना आसोदा रोड, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. इलेक्ट्रिकशीअनेचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तो शिवाजीनगर भागाकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका वॉल कंपाऊंडजवळ दुचाकी (एमएच १५ एएफ ७६८१) ने आला होता. त्यावेळी त्याने कंपाऊंडच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिराजवळ दुचाकी पार्किंगला लावून कामानिमित्त निघून गेला. त्यानंतर काम…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आठवले हॉस्पिटल येथे कामानिमित्त आलेल्या महिलेचे त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवण्याचे सांगून अज्ञात दोन जणांनी २० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका गणेश सनसे (वय-४६) रा. कुंभारवाडा, मारुती मंदिरजवळ, अमरधामरोड, जुने नाशिक हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी महिला ह्या जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या होत्या. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील आठवले हॉस्पिटलजवळ उभे असतांना त्यांच्याजवळ दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी सांगितले की “तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवून घ्या] नाहीतर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । वाद मिटवित असतांना अज्ञात पाच जणांनी येऊन चाकू हल्ला करून दोन जणांना जखमी केल्याची घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुशील मनोज जाधव (वय-२०) रा. सुधाकर नगर, एमआयडीसी हा आपला मित्र राकेश गोपाल पाटील यांच्यासोबत मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकावरील माऊली साई टी सेंटर येथे उभे होते. त्यावेळी कालिंका माता मंदिराकडून भरधाव वेगाने दुचाकीवर अनोळखी तीन येत होते. तर चहाच्या टपरीजवळून एक सायकलस्वार जात होता. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने सायकलस्वराला धडक दिली. यामध्ये सायकलस्वराच्या सायकलचे नुकसान…

Read More

चोपडा प्रतिनिधी । महिलेवर झालेल्या अत्याचारातून तिने नवजात बालकाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला रात्री उशीरा चोपडा ग्रामीण पोलीसांनी अटक करण्यात केली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारी ३६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी काम करून आपला उदरनिर्वाह करते. गावातील कैलास गोकूळ पाटील याने नऊ महिन्यांपुर्वी पिडीत महिलेवर दारूच्या नशेत तिच्या घराच्या झोपडीत येवून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. या अत्याचारातून महिलेने पुरूष जातीच्या नवजात बालकाला जन्म दिला. दरम्यान, समाजात बदनामी होईल या भितीपोटी महिलेने नवजात बालकाला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्‍याच्‍या मंत्रीमंडळाचा विस्‍तार शपथविधीचा पार पडला. यात जळगाव जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीची निवड झाली आहे. यामुळे जिल्‍ह्यासाठी आता डबल इंजिन मिळाल्याने विकास वेगाने व्हायला हवा. असा टोला राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. मंत्रीमंडळ विस्तार मुहूर्त मिळाला आहे. या मंत्री मंडळात सहभागी झालेल्या मंत्रांचे आपण स्वागत करून आणि त्यांनी तातडीने विकास कामे हाती घेऊन जनतेच्या समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा ठेवू असल्‍याचे खडसे यांनी म्‍हटले आहे. राज्‍य सरकारच्‍या मंत्रीमंडळाचा विस्‍तार होवून कॅबिनेट मंत्री पदाच्‍या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळात जळगाव जिल्‍ह्यातील भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को व अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा गैरफायदा घेत ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील (५६) आरोपीने पीडितेची वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिच्यावर शारिरिक, लैंगिक अत्याचार केले. ‘जर तु तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. काही काळाने बालिकेला शारिरिक त्रास होऊ लागल्याने तिला उपचारार्थ दाखल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री या पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला दोन मंत्री मिळाल्याने विकास कामांना खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे असे जळगाव ग्रामीण मतदार संघात बोलले जात आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी सकाळी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धरणगाव मतदार संघातील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे उत्साह संचारला आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील वय १७ मुलगा हा त्याच्या घरी असतांना त्यास ७ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेले. मुलगा उशीर होवून पुन्हा घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. अखेर एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read More