राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २० ऑगस्स्ट रोजी घडली. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जळगाव येथील निमकराळ भागातील आडोळ, मांडवा, तिवडी, गीलखेड, दादुलगाव या परिसरात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतातील कामे सुरू असल्याने निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे (वय २२ वर्ष ) मधुकर तुळशीराम उगले (वय ५६ वर्ष) आणि त्यांच्या पत्नी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
कोरोनाची लाट ओसरता आता ठाण्यात स्वाइन फ्लूचं संकट ओढावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तर ठाण्यात तब्बल 400 रुग्णांची वाढ झाली आहे. . राज्यात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने हाहाकार माजला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होता ना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाइन फ्लूने घेतला आहे. ठाण्यात गेल्या महिन्याभरापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत 400 रुग्ण आढळून आले आहे. मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही 138 रुग्ण…
हिमाचल प्रदेशातील रायपूर-कुमालदा परिसरात तसेच मंडी जिल्ह्यात अन्य ठिकाणी शनिवारी पहाटे ढगफुटी झाली. त्यामुळे विविध भागात महापूर, भूख्खलन आणि अपघातामध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे उत्तराखंडच्या विविध भागात ढगफुटीच्या मालिकेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर १० जण बेपत्ता झाले. नदीचे किनारे फुटले आणि पूल वाहून गेले, नदीच्या काठावरील प्रसिद्ध शिवमंदिर असलेल्या टपकेश्वराच्या गुहेतही पाणी शिरले. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत १३ जण मरण पावल्याचे सांगितले जात आहे. सॉन्ग नदीवरील पूल वाहून गेला आणि मसुरीजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलसेल्या केम्पटी फॉल्स धोकादायक रीतीने वाहू लागला आहे. ढगफुटीने खेड्यांतील घरांमध्ये चिखल व पाणी घुसले. ज्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने बाधित लोकांना…
शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यास परवानगी दिली. त्यावेळी, दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना आता क्रीडा कोट्यातील ५ टक्के शासकीय नोकरीत आरक्षणचा लाभही मिळणार असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी सरकारच्या प्रो-गोविंदाच्या निर्णयावरुन शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच फटकारले आहे. अजित पवार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायाचा नसतो, अशा शब्दात त्यांनी आपलं मत मांडलं. जिल्ह्यातील मेळघाट, धारणी या आदिवासी भागाला ते भेट देताऐ, यावेळी दहीहंडी पथकातील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरिल विचारावर त्यांनी भूमिका मांडली. मला विम्याचा मुद्दा पटला. मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांचा विमा देण्याची घोषणा सरकारने केली. कायमचं अपंगत्व आलं…
राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय करता वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिले. आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल.…
जळगाव प्रतिनिधी । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा पाचोरा तालुक्यातील पाथरी गावात माजी सरपंच निलेश प्रेमसिंग पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रे निमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतांना पाचोरा कडे जात असतांना पाथरी या गावातील माजी सरपंच निलेश प्रेमसिंग पाटील, संतोष नेटके तसेच राहुल अरुण पाटील यांनी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपस्थित देवेंद्र चव्हाण, निलेश कडु पाटील, हिरामण आण्णा,बाळु कासे, गोविंदा धनगर व दिपराज जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी पाथरी येथील राहुल अरुण पाटील यांनी माजी मुख्यमंत्री…
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सभेतील घटना धरणगाव-प्रतिनिधी । शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने धरणगाव शहरात युवासेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी गर्दीतून मोबाईल व पाकीट मारणाऱ्यास नागरीकांना पोलीसांच्या हवाली केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आदीत्य ठाकरे हे दौऱ्यावर असून धरणगाव मतदार संघाच्या धरणगाव शहरात त्यांची मोठी सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरीकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान या गर्दीचा फायदा घेवून मोबाईल व पाकीट मारणारा चोरट्याला नागरीकांनी पकडले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील साळवा येथे सेवा संस्थेच्या वतीने महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला मेळाव्यात प्रकल्प समन्वयेक महेंद्रसिंग रावल यांनी सेवा संस्था राबवित असलेल्या पीएससीपी या प्रकल्पाची माहिती देवून मार्गदर्शन केले. धरणगाव तालुक्यातील साळवा गावात सेवा संस्थेतर्फे महिला शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सेवा संस्थेचे प्रकल्प समन्वयक महेंद्रसिंग रावल, शैलेश मांडे, कृषी विशेषज्ञ आशिष शहारे, लेखापाल ममता पाटील, कृषी सखी सिमा नेहते, लिना कोल्हे यांच्यासह गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
माजी अध्यक्षा आणि संचालक मंडळ अडचणीत येण्याची शक्यता जळगाव प्रतिनिधी | जिल्हा दूथ संघाच्या मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह दुग्धजन्य पदार्थ विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी विहीत डीपीआरनुसार काम न केल्याने तब्बल ९ कोटी ९७ लाख रूपयांची अनियमितता आढळून आली आहे. राज्याचे सहकारी संस्था यांच्या उपसचिवांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे आता माजी अध्यक्षा आणि संचालक मंडळाला चौकशीचा सामना करावा लागणार आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह दुग्धजन्य पदार्थ विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी प्रत्येकी २४.७० कोटी म्हणजेच एकूण ४९ कोटी ४० लक्ष रूपयांची मदत प्रदान करण्यात आली होती. याची अंमलबजावणी करतांना…
आदित्यला ठाकरेंच्या दौऱ्याने जळगाव ग्रामीण मतदार संघातील समीकरणे बदलणार Live Maharashtra news- युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर २० रोजी येत असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव येथे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीतर्फे आदित्य ठाकरे यांचा दुपारी १ वाजता जाहीर सत्कार करणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढून विजयी व पराभूत झाले आहेत . त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करणार असल्याने यात धरणगाव तालुका हा गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने त्यांना शह…

