Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

विनायक मेटेंच्या अपघात हा  चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली . मात्र गंभीरबाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मु़ंबई व रायगड पोलिस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. मात्र ही यंत्रणा चुकीची आहे. विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले गेले आहे. भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी लोकेशन मिळण्या करता पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ट्रक चालकांना एका लाईनमध्ये जाण्यास सांगितले तरी ते…

Read More

बेळगांव महात्मा गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्‍तव बसवराज नालतवाड यांनी या रस्त्यावर भरणाऱ्या 22 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वारंवार याचा परिसरात बिबट्या नागरिकांना निदर्शनास येत असल्याने रात्रीची गस्त वाढविण्याची तयारी वनखात्याने केली आहे. बेळगावातील गोल्फ मैदान आणि पर्यावरण पार्कमध्ये गेली महिनाभर बिबट्याचे अधूनमधून दर्शन होत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . सहाच्या सुमारास एका वाहनचालकाला बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे पुन्हा या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव शहरातील 12 आणि ग्रामीण भागातील 9 शाळांचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस आणि वनविभागाच्या…

Read More

राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आता आक्रमक झालेल्या दिसून आले. महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे. ठाकरे घराण्यातील वाद बाजूला ठेवून एकत्र येऊ असे देखील स्पष्ट केले. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’गणपती आमचा किंमत तुमची 2022′ या आयेजित उपक्रमाचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली . शिवसेना कोणाची, उद्धव राज एकत्र येणार का, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी टीकाटिप्पण्या केल्या. देशभरातल्या महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीकाही केली आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, त्यांना जे कँटीनमध्ये तिथे फ्री मिळतं ते आधी बंद…

Read More

मुंबई प्रतिनिधी | विनायक मेटे यांच्या बीड येथील निवासस्थानी छत्रपती संभाजी राजे यांनी मेटे कुटुंबियांचे सांत्वन केले. शिवसंग्राम संघटने’ला राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल. राजकीय पाठबळ मिळाल्यास त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोट्यातून आमदारकी द्यावी, असे मत संभाजी राज्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून शिवसंग्रामच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घ्यावी.…

Read More

मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था बेकार झाली. मुंबई नाशिक प्रवासासाठी पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागत होता. आता मात्र पाच ते सहा तासाहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष दयावे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदू सण साजरे होतात की नाही असे वाटत होते आता मात्र सर्व सण साजरे होतील असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या हितासाठी शिवभोजन ही अतिशय महत्वाची योजना सुरू केली होती. गोरगरीब…

Read More

शहरातील शाहू नगर परिसरातील ट्राफीक गार्डन येथे हातागाडी लावण्यावरून तरूणाला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवारी २० ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात एकावर अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शरीफ सत्तार भिस्ती (वय-३६) रा. शाहूनगर हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शाहू नगरातील रोझ गार्डन येथे हातगाडी लावण्यावरून त्याची आणि वैशाली प्रविण पाटील रा. शाहू नगर, जळगाव याच्या वाद झाला. दरम्यान शरीफ भिस्ती याला महिलेने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता शरीफ भिस्ती याने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर अदखलपात्र…

Read More

रिकामटेकड्या लोकांसोबत राहू नको, असे बोलल्याने एकाने बोलणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी तवा मारुन दुखापत केल्याची घटना आदर्श नगरात शनिवार, २० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणपती नगर परिसरातील आदर्श नगर येथे भूषण नारायण खडके वय ३४ हे वास्तव्यास आहेत. शनिवारी कुशल भरत राणे हा आदर्शनगरात खडके यांच्या घराजवळ उभा होता, यावेळी भूषण हे कुशल यास रिकामटेकड्या लोकांसोबत राहू नको, असे बोलले, त्याचा राग आल्याने कुशल राणे याने भूषण यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुशल याने लोखंडी तवा भूषण यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली, अशा…

Read More

जळगाव शहरातील बीबा नगर येथील घरात शनिवार २० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरातून दागिण्यांसह रोकड असा एकूण ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,बीबानगर येथे प्रमिला सुधाकर चौधरी वय ५६ या वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी घराचा मागच्या खोलीचा रुमचा लोखंडी व लाकडी दरवाजे उघडे ठेवून प्रमिला चौधरी या झोपल्या होत्या. पहाटे १ ते साडेपाच वाजेच्या सुमारास चोरट्याने घराचे दरवाजे उघडे असल्याची संधी साधत घरातील ११ ग्रॅमचा सोन्याचा हार, ३ ग्रॅमचे कानातले, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, १० ग्रॅमचा चांदीचा शिक्का,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी परिसरात दारू अड्ड्याजवळ दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाला चॉपरने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गंभीर हल्ल्यात अक्षय अजय चव्हाण वय-२३ रा.पिंप्राळा दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की, रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपसमोर दारूच्या अड्ड्यासमोर मोबाईलच्या वादातून दोन तरुणांमध्ये वाद झाला.वाद वाढल्याने दोन्ही गटातील १०-१५ तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. भारत बंडू राठोड या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ५.३० च्या सुमारास मोबाईलच्या जुन्या वादातून काही तरुणांचा वाद झाला. मी मध्यस्थी करण्यासाठी गेलो असता आणखी तरुण त्यात पडले. अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार याच्या भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला मारल्याच्या रागातून…

Read More

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच ज्या फेसबुक पेजवरून सीएम योगी यांना धमकावण्यात आले आहे, त्यांचे नाव आत्मा प्रकाश असून यांनी स्वत: पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभागही सक्रिय झाला आहे. आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार…

Read More