एरंडोल उप विभागीय अधिकाऱ्यांनी स्थापन केली चौकशी समिती धरणगाव प्रतिनिधी : खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी करीत त्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशी पथक नेमून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतच्या अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागी विद्यमान सदस्य अशोक शालिग्राम भोलाणकर यांनी खोटे दस्तावेज सादर करून धरणगाव तहसील कार्यालयाकडून मिळविलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून ग्रामपंचायतीचे सदस्यपद मिळविल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री.संजय संतोष कांडेलकर, राजुरा यांनी जळगाव…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
निमखेडी शिवारातील घटना,आरोपी पोलिसांच्या ताब्यात जळगाव शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत जितेंद्रला माहिती कळाली होती, त्याने स्वत:च पत्नीला तरुणासोबत रंगेहाथ पकडले होते. यावरुन जितेंद्र व कविता यांच्यात वाद होत होते, या वादातून कविता ही जितेंद्रला आत्महत्येची तसेच तुमचे सर्वांचे…
गुलाबराव देवकर : जिल्हा परिषदेच्या विरोधात आंदोलनाची भूमिका जळगाव प्रतिनिधी राजेंद्र पाटील : जिल्ह्यातील मजूर संस्थांना सर्व विभागांकडून ३३ टक्के कामे मिळावीत, अन्यथा मजूर फेडरेशनतर्फे संबंधित विभागांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा बँकेचे चेअरमन तथा मजूर फेडरेशनच्या सभेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिला. त्यासोबतच त्यांनी मजूर फेडरेशनच्या वर्षभरातील कामकाजाचे कौतुक केले. जिल्हा मजूर फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. ३०) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत मार्गदर्शन करताना श्री देवकर म्हणाले, की राज्यभरातील बऱ्याच मजूर फेडरेशनची स्थिती राजकीय हस्तक्षेपामुळे व कामे वाटपातील दुजाभावामुळे खराब झालेली आहे. मात्र जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याने फेडरेशन निरंतर…
जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जळगाव जिल्हाधिकारी पदी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्या नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांचे कडून देण्यात आली आहे. डॉ.अभिजीत राऊत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांची बदली नांदेड येथे झाल्याने त्यांच्या जागी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची जिल्हाधिकरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एरंडोल प्रतिनिधी : बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे आज रोजी एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संपन्न झाले. एकदिवसीय जिल्हास्तरीय शिबिराचे उद्घाटन प्रा.डॉ. भरत शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लाळगे यांनी केले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याशिबिर प्रबोधन प्रसंगी स्वातंत्र्याची दोन आंदोलने, आधुनिक भारत, वर्तमान भारत, समाज व्यवस्था, शासन व्यवस्था, दुसरी गोलमेज परिषद, अश्या विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले. दरम्यान, काही संघटना असफल का ठरल्या यावर भाष्य करताना राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव घनश्याम अलामे पुढे म्हणाले, निरूद्देश काम, साधनांचा अभाव, क्रांतीकारी…
सोनवद परिसरात लम्पी आजाराने चार गुरांचा मृत्यू लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील अहिरे बु येथील एका शेतकऱ्याच्या एक बैलास लम्पी आजाराने काल दुपारी त्याचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे जवळ पास नुकसान झाले आहे. बैल दगावल्याची डॉ. जगताप व पशुधन विकास अधिकाऱ्यांना देण्य आली. शेतकरी पांडुरंग नागो पाटील हे शेतात दोघं बैलांना गेल्या पाच दिवसापासून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यातील एक बैलाचा आज मृत्यू झाला असून दुसरा बैल सुद्धा गंभीर अवस्थेत आहे. अहिरे बु आणि सोनवद परिसरात लम्पी आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना लस द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात…
प्रमाणपत्रासाठी ३२ हजारांची लाच घेतांना अटक रावेर प्रतिनिधी । । पेट्रोलपंपाशी संबंधित स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी माप निरीक्षकाला ३२ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची प्रकार समोर आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुनिल रामदास खैरनार (वय-५६) रा. एसएमआयटी कॉलेज, जळगाव असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवाशी असून त्यांनी रावेर येथे ११ महिन्यांच्या करारावर पेट्रोलपंप भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. या पेट्रोल पंपाच्या ४ झोनल मशीन स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त रावेर येथील वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सुनिल खैरनार यांनी ३२ हजाराची मागणी केली. त्यानुसार…
नशिराबाद पोलिसात गुन्हा जळगाव (प्रतिनिधी) ५० वर्षीय व्यक्तीने ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका ५० वर्षीय इसमाने ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस घरी खेळायला बोलवत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बाळू वासुदेव महाजन (वय ५०) यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजेंद्र साळूखे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर जळगावचे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांच्याकडे आले आहे. मुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जूनला घेतली होती. ९ ऑगस्टला भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तेव्हापासून पालकमंत्रीच नियुक्त न झाल्याने अनेक अडचणी येत होत्या.
एरंडोल प्रतिनिधी । वडीलोपार्जीत घराच्या जागेवरून मोठ्या भावाने लहान भावाचा मुसळी मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने संपविल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या…

