Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

विजय पाटील : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून आज अखेर शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी मैदानात उडी घेतली आहे त्यात प्रभाग क्रमांक 9 ड चे भाजपचे उमेदवार डॉ चंद्रशेखर पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ड मध्ये माजी नगरसेवक तथा तरुण तडफदार उमेदवार डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विकास कामे करणाऱ्या चेहऱ्याला पुन्हा संधी प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारलेले डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर पक्षाने…

Read More

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र जळगाव : भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुक उमेदवारांपैकी 22 दिग्गजांचा पत्ता कट होणार असून त्यात बारा निष्ठवंतांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जळगाव शहरातील मातब्बर लोकप्रतिनिधी यांना देखील महापौर पदासाठी बहुमत मिळू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. म्हणजेच भाजपमध्ये गटबाजी असल्यामुळे कुठल्या गटाला जास्त उमेदवार भेटतात याकडे लक्ष लागून आहे. तसेच 22 दिग्गजांना उमेदवारी नाकारली जाणार आहे. त्यात प्रभाग क्रमांक एक मध्ये दोघांना फटका बसणार आहे. या ठिकाणी नितीन भाऊंचे तिघे उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकाची उमेदवारी कट होणार आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये नितीन भाऊंचा वर चष्मा राहणार आहे. प्रभाग क्रमांक…

Read More

विजय पाटील जळगाव – प्रभाग क्रमांक सातमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणाला नवा उत्साह मिळाला आहे. श्री आर्टस् चे संचालक जितेंद्र सुभाष चव्हाण व त्यांची पत्नी कल्पना जितेंद्र चव्हाण यांनी भाजपाकडून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रभागाला अखेर स्थानिक प्रतिनिधी मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.  जितेंद्र चव्हाण हे प्रभाग क्रमांक सातमधील मूळ रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. श्री आर्टस् संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक तरुणांना कला, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रभागातील युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. स्थानिक समस्यांची जाण…

Read More

विजय पाटील जळगाव : भाजपात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकालाच उमेदवारी मिळणार आहे इतर इच्छुक विरोधकांना मिळू नये तसेच निवडणुकीतून बाद व्हावे यासाठी जे इच्छुक आहेत त्यांना फॉर्म भरण्यास भाजपा कडून सांगण्यात आले.उद्या एबी फॉर्म ज्याला द्यायचा त्याला दिला जाईल अशी नामी शक्कल लढून भाजपाने नवी खेडी-खेळत दोंडाईचा पॅटर्न राबवण्याचे जळगावत षड्यंत्र आहे.भाजपातील इच्छुक उमेदवार शिवसेना ठाकरे गटाला व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळू नये यासाठी जे इच्छुक आहेत त्यांना पक्षाचा फॉर्म भरण्याची सूचना करण्यात आली आहे. छाननी च्या दिवशी आपोआपच उमेदवारी अर्ज ए बी फार्म नसल्यामुळे बाद होईल म्हणजेच इच्छुक बंडोखरला कुठली संधी राहणार नाही अशा पद्धतीने…

Read More

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र जळगाव : मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी अर्थात ग स मध्ये सुरू असलेल्या नोकर भरतीवर आक्षेप घेतला.जिल्हा उपनिबंधकांना धारेवर घेतल्यानंतर तात्काळ स्थगिती दिली व ग स प्रशासनामार्फत अहवाल मागितला हे सर्व नाटक गुरुवारी सायंकाळी घडले. सर्वत्र स्थगितीची चर्चा सुरू झाली . मात्र शुक्रवारी तीन मोठ्या बॅगा भरून कागदे रवाना करण्यात आले. आणि किती आर ऑफिसचे मुख्य आजारी असताना तातडीने डी डी आर ऑफिसला पोहोचले. विशेष म्हणजे डी डी आर  ऑफिसमध्ये सर्व कागद मोजली गेले मग स्थगिती उठण्यावर स्वाक्षरी झाली आमदार चंद्रकांत पाटील यांना न जुमानता हा विषय झालेला आहे अशी…

Read More

विजय पाटील जळगाव- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद उफाळले आहेत. ठाकरे गटाने अपेक्षित जागा न दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजता पक्षाच्या कार्यालयात निरीक्षक जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा नेत्यांची बैठक होणार आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व कायम असताना महाविकास आघाडीला अद्याप ताळमेळ साधता आलेला नाही. सोमवारी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुतीने एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र आघाडीत जागावाटपावरून बेबनाव झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत ठाकरे गटाने राष्ट्रवादीने पूर्वी लढविलेल्या जागांवर दावा केला. राष्ट्रवादीने 45 जागांची मागणी केली असता…

Read More

भाजप, शिंदे गटाच्या मुलाखती..!  विजय पाटील : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जळगाव शहरात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तर १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया तर 16 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान निवडणुकीचे वातावरण तापले असून आज भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्या मुलाखती प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. यात मुलाखती देणाऱ्या इच्छुक उमेदवारांना प्रभागातील विविध प्रश्न व तुम्ही किती खर्च करू शकता असे प्रश्न देखील विचारना झाल्याने निष्ठावंत व अनेक वर्षापासून कार्य करणाऱ्या उमेदवार इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात पैसे असलेल्यांनाच उमेदवारी मिळेल का असा मनात प्रश्न निर्माण झाले असल्याचेही दिसून आले. महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून प्रशासकीय…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे १० किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धरणगाव – चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ आज दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे १० किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली असून हि कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड यांच्या पथकातील धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिपीएस मित्र परिवार गेल्या 3 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत असतो या मध्ये थंडीच्या दिवसात निराधार लोकांसाठी उबदार कपडे वाटप तसेच अन्नविना कोणीही भुके राहु नये या साठी दररोज 200 लोकांसाठी भोजन ची सोय,अपंग बांधवांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप,10 वी12वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुरुजन सन्मान सोहळा संत भोजन,जिल्ह्यातील सर्वात मोठा कीर्तन सप्ताह असे अनेक उपक्रम राबविले महत्वाचे म्हणजे पाळधी शहरात कुठेही कोणाच्या घरी दुःखद घटना घडली त्या साठी स्नेहाची शिदोरी पाठविण्यात येते ,,मित्र परिवार चा एक सदस्य सोडून गेला असता त्याच्या प्रथम पुण्यस्मरण निमीत्त पाळधी येथील स्मशानभूमी दत्तक…

Read More

धरणगाव प्रतिनिधी : मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणा ठरल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक दिल्याने या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.या भीषण अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (वय १८ वर्षे) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८ वर्षे) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेट जवळील प्लॉट) येथील रहिवासी होते.मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ रेल्वे ट्रॅकवर मोबाईलवरील लोकप्रिय ॲपसाठी व्हिडिओ (रील) तयार…

Read More