जळगाव – जिल्हा बँक निवडणूक तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादीचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार पक्ष विरोधी कारवाया केल्या. त्यात भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिसाच्या शुभेछा जाहिरातीत चक्क शरद पवार, अजित पवार यांचा फोटो वापरल्याने अखेर संजय पवार यांना बडतर्फ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवाजी गर्गे यांनी बडतर्फ केल्याचे पत्र काढले. सतत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांना बडतर्फे करण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांचे आदेश न ऐकणे, पक्षविरोधात कारवाया करणे यासाठी पवार चांगलेच चर्चेत होते. आज तर त्यांनी चक्क भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना चक्क शरद…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
भर उन्हाळ्यात नेते तापले तर उमेदवार होतोय फितूर धरणगाव – एरंडोल बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार संभ्रमात विजय पाटील – राजकीय विशेष: शेतकरीचा आत्मा असलेली निवडणूक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणूकीत दोन ही पॅनलकडून एकमेकांना आव्हान देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. यासाठी दोन्ही पॅनलचे नेते भर उन्हात दिवसभर प्रचारासाठी मैदान तुफान फटकेबाजी करतांना दिसून येत आहे. पण सायंकाळी मात्र त्यांचेच उमेदवार गावागावात फिरून पॅनलसाठी मत न मागता ‘कारे भो मनावर ध्यानं ठेवजो बाकी कोणले भी दे…’ असे चित्र एरंडोल-धरणगावात चर्चा सुरु झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या धडाक्यात सुरु होती. आज सर्व प्रचाराच्या तोफा…
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पाळधी येथे उभारणार उपबाजार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील धरणगाव/पाळधी/जळगाव प्रतिनिधी दि. 23 – शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी आणि बाजार जवळ येण्यासाठी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाळधी येथे उपबाजार सुरू करण्यासाठी अभिवचन देत आहे. शेतकरी हित केंद्रबिंदू मानून धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कपबशी निशाणी लक्षात ठेऊन सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनल तर्फे धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार उन्मेष पाटील हे होते.…
पो.नि. उद्धव डमाळे यांनी आखला प्लान पोहेकॉ. पवारांसह कोळीनी अशी केली अटक… प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात गेल्या ३३ वर्षांपासून भावाच्या खुनात आरोपी असलेल्याला फरार आरोपीला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कैलास रूपसिंग पाटील (वय ५५) असे नाव असून त्याला धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी प्लान करीत यावर पोहेकॉ. पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांनी गुजरात राज्यातील नवसारीतून अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी कि, तब्ब्ल ३३ वर्षापूर्वी कैलास पाटील याने आपल्या चुलत भावाचा खून केला होत. तेव्हापासूनच तो फरारी होता. कोर्ट प्रत्येक तारखेला पोलिसांना आरोपी अटक का नाही?, याची सतत विचारणा करत होते. त्यामुळे धरणगाव पोलिस…
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील फुलपाट टाकळी या गावातील एका ३० वर्षीय तरुणाने आज दि ६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास शहरातुन धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या गिरणानदीच्या पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. मिळाली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील फुलपाट टाकळी गावातील रहिवासी असलेल्या श्याम भिल (वय ३०) हा तरुण आज दि ६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास बांभोरी नजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून उडी घेतली. यावेळी हि घटना घडत असताना रस्त्यावरील काही लोकांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण त्याने अखेर पुलावरून थेट उडी घेत आपली जीवन यात्रा संपविली. दरम्यान गावातील नागरिकांनी ओळख पटविली…
धरणगाव :तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला हा वाद इतका मोठा झाला की त्या हाणामारीतुन काही जखमी आहेत. घटनास्थळी तीन चारचाकीचे नुकसान होत पोलिसांच्या गाडीवर देखील दगड फेक झाल्याची माहिती आहे. जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील तरुण पायी दिंडीत जात असताना पाळधी गावात दिंडी पोहचताच वाद्य वाजविण्यावरून काही वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दगडफेक झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यासह दोन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत झालेल्या दगडफेकीत तीन चारचाकी आणि एका पोलीस वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम.…
शहरातील ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरातील हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत हॉटेलचे शटर वाकवून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी २७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी गल्ल्यातील १७ हजारांची रोकडसह सीपीयू चोरुन नेला. ही संपुर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शनिपेठेत चेतन अनिल वाणी यांच्या मालकीची ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरात मितवा नावाने हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता चेतन वाणी यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करुन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण करुन ते झोपून गेले. सोमवारी २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते…
धरणगाव : प्रतिनिधी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्यासाठी आले असता मंत्री सत्तार यांच्या ताफ्यावर खोके, कापूस फेकल्याप्रकरणी आता ठाकरे गट अडचणीत आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात १३ पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाले आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पारोळा नाक्याच्या पुढे यश प्रोव्हिजन समोर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानग्रस्त शेतात जाऊन पाहणी करीत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहे. पण यावेळी मंत्री सत्तार यांच्या गाडी वर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खोके फेकल्याने वाद चिघळला होता. जे त्यांनी आंदोलन केले. त्या बाबत कुठलेही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी काढलेली नव्हती तर थेट गाडी वर खोके फेकणे…
राज्यातील ठाकरे गटाला एकामागे एक धक्के मोठ्या प्रमाणात बसत आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी आज नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सुरु असलेली वाटचाल आणि राज्यातील महायुतीचे सरकार करत असलेल्या कामामुळे प्रभावित झाल्यामुळेच आपण पक्षप्रवेश करत आहोत, असे भूषण देसाई यांनी याप्रसंगी सांगितले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी यासमयी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसीलदारपदी नेमणूक झाल्याचे पत्र ९ मार्च रोजी रात्री उशिरा मिळाले आहे. धरणगाव तालुक्यात महसुलाच्या विविध कामगिरीतुन चर्चेत आलेले नितीनकुमार देवरे यांची प्रशासनातील कर्मचारीवर असलेली मजबूत पकड तसेच काम करवून घेत असल्याने जनसामान्यांमध्ये कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती.

