Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘रुद्राक्ष’ महोत्सवात चेंगराचेंगरी ; मालेगावच्या महिलेचा मृत्यू !
    राष्ट्रीय

    ‘रुद्राक्ष’ महोत्सवात चेंगराचेंगरी ; मालेगावच्या महिलेचा मृत्यू !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सीहोर स्थित कुबेरेश्वर धाममधील रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गर्दीमुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रुद्राक्ष घेण्याच्या नादात अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर 3 महिला बेपत्ता झाल्या.

    घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, महोत्सवाच्या ठिकाणी एवढी गर्दी आहे की पायी चालणेही अवघड झाले आहे. रुद्राक्ष न मिळालेले लोक पंडित मिश्रांविरोधात नारेबाजी करत आपल्यापावली माघारी जात आहेत. येथे जवळपास 10 लाख जण जमल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आपला येथील प्रस्तावित दौरा रद्द केला आहे. मंडी ठाण्याचे ASI धर्मसिंह वर्मा यांनी सागितले की, महाराष्ट्रातील नाशिकच्या मालेगाव येथील मंगला बाई (50) नामक महिलेची प्रकृती अचानक बिघडली होती. ती चक्कर येऊन खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातीलच बुलढाण्याच्या एका महिलेसह 3 महिला भाविक बेपत्ता झाल्या आहेत.

    गुरुवारी सकाळची कुबेरेश्वर धाम ते इछावर रोडपर्यंत 7 किमी लांबीचा जाम होता. सीहोर ते इंदूरच्या दिशेने 17 किमी व भोपाळच्या दिशेने 10 किमी लांबीच्या महामार्गावरही जाम होता. गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही ताण आला होता. पोलिस व प्रशासनाच्या टीम व्यतिरिक्त आरएसएस, बजरंग दल, स्थानिक लोक, समिती सदस्य असे एकूण 15,000 लोक व्यवस्था सांभाळत आहेत. कथा पंडाल, अन्न पंडाल, रुद्राक्ष वितरण केंद्र येथे त्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. महोत्सवाच्या सुरक्षेची जबाबदारी ASP गितेश गर्ग सांभाळत आहेत. नगर पोलिस अधीक्षर निरंजन सिंह राजपूत व मंडी ठाण्याचे प्रभारी हरिसिंह परमार यांचीही या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस 2 शिफ्टमध्ये काम करत आहेत. कार्यक्रमस्थळी एकूण 700 पोलिस तैनात करण्यात आलेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; १७ पैकी १६ जागांवर कब्जा !

    June 22, 2026

    पहाटेचा भीषण स्फोट : गॅस सिलिंडर फुटून महिलेचा होरपळून मृत्यू; ९ जणांना नागरिकांनी वाचवले !

    June 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.